चालू घडामोडी (23 जुलै 2017)
महिला वर्ल्डकप- प्रत्येक खेळाडूला मिळणार 50 लाखांचं बक्षीस :
- भारतीय महिला क्रिकेट टीममधील प्रत्येक खेळाडूंला बीसीसीआय प्रत्येकी 50 लाखांचं बक्षीस देणार आहे. तर सपोर्टिंग स्टाफला 25 लाखांचं बक्षीस बीसीसीआयने जाहीर केलं आहे.
- आयसीसी महिला विश्वचषकातील कामगिरीबद्दल बीसीसीआयने महिला खेळाडूंना बक्षीस जाहीर केलं आहे.
इंडस चंद्रावर जगातील पहिलं खासगी स्पेसक्राफ्ट पाठविण्याच्या तयारीत :
- बंगळुरूतील ‘इंडस’ ही संस्था लवकरच अवकाश क्षेत्रात मोलाची कामगिरी करायला सज्ज झाली आहे.
- या वर्षअखेरपर्यंत चंद्रावर जगातील पहिलं खासगी स्पेसक्राफ्ट पाठविण्याच्या तयारीत इंडस ही संस्था आहे.
- या टीमचं खासगी स्पेसक्राफ्टचं संपूर्ण काम पूर्ण झाल्यावर हे क्राफ्ट एका पीएसएलव्हीद्वारे श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपित केलं जाणार आहे.
- तसेच एक कॉलिफिकेशन मॉडेल तयार केलं असून ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्याची कठोर तपासणी केली जाइल.
भारतीय महिला संघाला आठवे स्थान :
- एक गोलची आघाडी घेतल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाला आयर्लंडविरुद्ध 1-2 ने पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे भारतीय संघाला महिला हॉकी विश्व लीग सेमीफायनलमध्ये आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
अमेरिकेकडून ‘आझाद काश्मीर’ म्हणून उल्लेख, भारताने नोंदवला निषेध :
- अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने आपल्या दहशतवादी अहवालात पाकिस्तानव्याप्त काश्मीरचा ‘आझाद जम्मू काश्मीर’ असा उल्लेख केला आहे.
- सोबतच भारताला टार्गेट करण्यासाठी दहशतवादी या भागाचा वापर करतात असंही या अहवालातून सांगण्यात आलं आहे. ‘कन्ट्री रिपोर्ट ऑन टेररिझम 2016’ नावाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. भारताने याप्रकरणी अमेरिकेकडे आपला निषेध नोंदवला आहे.
निवृत्तीच्या दिवशीच मिळणार प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन :
- सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्यांना आता एक खूशखबर आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच प्रॉव्हिडंट फंड (पीएफ) आणि पेन्शनची रक्कम देण्यात येणार आहे.
- पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी अॅक्ट 1972 नुसार, कंपनी किंवा एखादी संस्था कर्मचाऱ्याला ग्रॅच्युटीची त्याची रक्कम 30 दिवसांच्या आत मिळण्यासाठी योग्य ती कार्यवाही करेल. यामुळे इपीएफओचा सदस्य निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखाने आणि समाधानाने घालवू शकेल.
- देशात सध्या सुमारे 48.85 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 55.51 लाख पेन्शनधारक आहेत.
पंतप्रधान वय वंदना योजना :
- पंतप्रधान वय वंदना योजना (पीएमव्हीव्हीवाय) असे नाव असलेल्या या योजनेचा शुभारंभ अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थमंत्रालयाचे मुख्यालय असलेल्या ‘नॉर्थ ब्लॉक’ मध्ये शुक्रवारी सांयकाळी केला.
- यापूर्वी मोदी सरकारने ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) आणली होती.
- त्याच्या जोडीला ‘पीएमव्हीव्हीवाय’ असेल. या योजनेतून मिळणाऱ्या परताव्याला वस्तू व सेवा करातून (जीएसटी) वगळण्यात आले आहे. तसेच ‘एलआयसी’ मार्फत ही योजना चालविली जाणार आहे.
जगभरातील उपग्रह प्रक्षेपणातून 600 कोटी कमावले :
- भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) अनेक देशांच्या उपग्रहांचे प्रक्षेपण करुन कोट्यवधींची कमाई करत आहे.
- पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेइकलच्या (पीएसएलव्ही) माध्यमातून एकाचवेळी 28 देशांचे 209 उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम इस्रोच्या नावावर आहे.
- इस्रोने 23 जून रोजी पीएसएलव्ही सी 38 च्या मदतीने कार्टोसेट-2 मालिकेतील उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
- तर 2013 ते 2015 या कालावधीत इस्रोने 600 कोटींची रग्गड कमाई केली आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी नवी निवृत्तीवेतन योजना
- ज्येष्ठ नागरिकांसाठी आणखी एक नवी निवृत्तिवेतन योजना
- दहा वर्षांसाठी 8.30 टक्के व्याजदर अर्थमंत्री अरुण जेटलींकडून शुभारंभ करण्यात आली.
- ज्येष्ठ नागरिकांसाठी नरेंद्र मोदी सरकारने आणखी एक नवी निवृत्तिवेतन योजना (पेन्शन प्लान) आणली असून त्यामध्ये दहा वर्षांच्या कालावधीसाठी आठ टक्क्यांचा (वार्षिक दर 8.30 टक्के) व्याजदर मिळणार आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांना आकर्षक पर्याय देणारी असू शकते.
- आठ टक्क्यांचा घोषित व्याजदर आणि ‘एलआयसी’ला प्रत्यक्षात देता येणारा व्याजदर यांच्यातील फरकाची रक्कम केंद्र सरकार भरणार आहे.
- एलआयसीच्या कोष्टकानुसार, दरमहा एक हजार रुपये निवृत्तिवेतन मिळविण्यासाठी दीड लाख, तर पाच हजार रुपये मिळविण्यासाठी साडेसात लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक करावी लागेल.
- त्यासाठी 3 मे 2018 पर्यंतची मुदत आहे. ही गुंतणवूक ऑनलाइन अथवा ऑफलाइनही करता येईल.
- तीन वर्षांनंतर 75 टक्के कर्जही काढता येईल. त्याशिवाय मुदतीआधीच योजना बंद करता येऊ शकते. त्या स्थितीमध्ये गुंतवलेल्या रकमेच्या 98 टक्के रक्कम परत मिळेल.
- दहा वर्षांच्या कालावधी संपताना विमाधारकाला संपूर्ण रक्कम व निवृत्तिवेतनाचा शेवटचा हफ्ता मिळेल आणि दहा वर्षांच्या कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास गुंतविलेली रक्कम लाभार्थ्यांने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला मिळेल.
वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये आठ भारतीयांना पात्रता :
- बॅडमिंटनमध्ये महाशक्ती होण्याच्या दिशने वाटचाल करीत असलेल्या भारताला पुढील महिन्यात होणाऱ्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये पुरुष व महिला एकेरीमध्ये चार पात्रता स्थान मिळाले आहेत.
- भारताने महिला एकेरीचे सर्व चारही कोटा स्थान मिळविले आहेत. राष्ट्रीय चॅम्पियन रितूपर्णा दास व तन्वी लाड यांच्यासह पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी कोटा स्थान मिळविले आहेत.
- भारत, चीन व जपान याच देशांना महिला एकेरीमध्ये चार कोटा स्थान मिळाले आहेत.
- पुरुष एकेरीत सैयद मोदी आंतरराष्ट्रीय चॅम्पियन समीर वर्मासह अजय जयराम, किदाम्बी श्रीकांत व साई प्रणीत यांनी पात्रता मिळविली आहे.
- चीन, डेन्मार्क व हाँगकाँग यांनीही चार पात्रता स्थान मिळविली आहेत.
- चीनच्या संघात गत चॅम्पियन चेन लोंग, लिन डॅन, शी युकी व तियान हुवेई यांचा समावेश आहे.
- डेन्मार्क संघात एंडर्स एंटोंसेन, व्हिक्टर एक्सेलसन, यान ओ योर्गेंसेन व हँस ख्रिस्टयन व विटिंगुस यांचा समावेश आहे.
- बीडब्ल्यूएफ विश्व चॅम्पियनशिप ग्लास्गोमध्ये 21 ते 27 ऑगस्ट या कालावधीत खेळल्या जाणार आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा