चालू घडामोडी 23 जून 2015
शाहू पुरस्कार ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांना जाहीर :
- राजर्षी शाहू मेमोरिअल ट र्स्टतर्फे दिला जाणारा शाहू पुरस्कार ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांना जाहीर झाला.
- जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी पुरस्काराची घोषणा केली.
- प्रा.एन.डी.पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 26) सायंकाळी सहा वाजता शाहू स्मारक भवन येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे.
केंद्र सरकारचचा खरेदीसाठी कार्ड वापरणाऱ्यांना प्राप्तिकरात सवलत देण्याचा प्रस्ताव :
- काळ्या पैशाला प्रतिबंध तसेच क्रेडिट किंवा डेबिट कार्डाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने खरेदीसाठी कार्ड वापरणाऱ्यांना प्राप्तिकरात सवलत देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
- तसेच कार्डाच्या वापरावर विशेषत: पेट्रोलपंपावर आकारण्यात येणारे अतिरिक्त शुल्क आणि रेल्वे तिकीट खरेदीवरील ‘उलाढाल प्रभार’ रद्द होण्याचे संकेत या प्रस्तावात सरकारने दिले आहेत.
- रोकडविरहित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल आणि करचोरीची प्रवृत्ती कमी करण्यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
- तसेच 1 लाख रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करण्यास प्रोत्साहित करण्याचे सरकारने प्रस्तावित केले आहे.
- सध्या विविध संस्थांकडून इलेक्ट्रॉनिक व्यवहाराकरिता आकारले जाणारे शुल्क आणि प्रभार रद्द करून, अशा व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश यामागे आहे.
- तसेच दुकानदारांसाठीही 50 टक्क्य़ांहून अधिक विक्री व्यवहारांकरिता डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा स्वीकार केल्यास करामध्ये सवलत देण्याचाही प्रस्ताव आहे.
- इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्यवहार पूर्तता करणाऱ्या व्यापाऱ्यांना मूल्यवर्धित करात (व्हॅट) 1 ते 2 टक्के सवलत देण्यात येणार आहे.
- एखाद्या व्यक्तीला कर्जासाठी सुधारित क्षमता मिळण्यासाठी ‘उलाढाल इतिहास’ तयार करणे, करचोरीचे प्रमाण कमी करणे आणि बनावट चलनाला आळा घालणे, हा यामागील उद्देश आहे.
- या प्रस्तावावर सरकारने 29 जूनपर्यंत प्रतिक्रिया मागवल्या आहेत.
सुवर्ण रोखे (स्वर्ण बाँड) योजनेचा मसुदा जाहीर :
- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2015-16 चा अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा केली होती.
- लोकांनी सुवर्ण रोख्यांमध्ये गुंतवणूक करावी यासाठी सरकारने सुवर्ण रोखे (स्वर्ण बाँड) जारी करण्याच्या योजनेचा मसुदा जाहीर केला आहे.
- सुवर्ण रोखे (स्वर्ण बाँड) योजनेची वैशिष्ट्ये :
- हे रोखे सोन्याच्या किमतीशी संलग्नित व डी-मॅट (कागदविरहित) स्वरूपाचे असतील.
- हे रोखे सरकारच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक जारी करील. हे रोखे जारी करणारी मध्यस्थ संस्था एजन्सीला वितरणाचा खर्च आणि कमिशन अदा करील. नंतर यावर होणारा खर्च सरकारकडून दिला जाईल.
- हे रोखे भारतात राहणाऱ्या नागरिकांनाच दिले जातील. या रोख्यात किती गुंतवणूक करायची याचीही मर्यादा असेल.
- कोणतीही एक व्यक्ती एका वर्षात 500 ग्रॅम्सपेक्षा जास्त खरेदी करू शकणार नाही. सरकार या रोख्यांवर छोटेसे व्याजही देईल व त्याचा दर सोन्याच्या कर्जावर आंतरराष्ट्रीय व्याज दराशी जोडला जाईल.
- हे रोखे 2,5,10 ग्रॅम किंवा अन्य प्रमाणाचे असतील. त्यांच्या किमान मॅच्युरिटीचा कालावधी पाच ते सात वर्षांचा असेल. रोख्यांच्या मॅच्युरिटीवर सोन्याच्या किमतीएवढे रोख पैसे दिले जातील.
- सरकारने या योजनेवर 2 जुलैपर्यंत मते, सूचना मागितल्या आहेत.
- देशात वर्षाला 800-900 टन सोन्याची आयात होते. आयातीत वस्तूंपैकी पेट्रोलियमनंतर सोन्यावर सर्वात जास्त पैसा खर्च होतो. स्वर्ण रोख्यांमध्ये गुंतवणूक झाल्यास सोन्याची मागणी कमी होऊन व्यापार तोटा नियंत्रणात राहील.
भूतान, बांगलादेश व नेपाळ या देशांशी भारताचे वाहन करार :
- सार्क गटातील भूतान, बांगलादेश व नेपाळ या देशांशी 16 जून रोजी भारताने वाहन करार केला.
- हा करार भूतानची राजधानी थिंपू येथे झाला.
- भारतीय उपखंडातील देशांमध्ये भारतीय मालाची वाहतूक सुलभरीत्या व्हावी, जेणेकरून भारताचा व्यापार-उदीम शेजारी राष्ट्रांशी वाढावा यासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
- याचबरोबर या करारामुळे प्रवासी वाहतुकीलाही या देशांमध्ये चालना मिळणार आहे. केंद्रीय वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी भारतातर्फे या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी तिन्ही देशांचे वाहतूकमंत्री उपस्थित होते.
- वैयक्तिक, प्रवासी व मालवाहू वाहनांसाठी झालेल्या या करारामुळे प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक या दोन्हीसाठी फायदा होणार आहे.
- या तीन देशांप्रमाणेच म्यानमार व थायलंड यांच्याबरोबरही असा करार करण्याविषयी बोलणी सुरू आहेत. या देशांशी असा करार झाल्यास आशिया खंडातील देशांमध्ये आर्थिक सहकार्याचा मार्ग मोकळा होईल.
- या करारामुळे या देशांशी व्यापार करताना वाहुकीचा खर्च कमी होईल. तसेच या देशांच्या मार्गे भारतात आणण्यात येणाऱ्या मालाची वाहतूक विनाअडथळा केली जाईल. या देशांचा भारताशी संपर्क अधिक प्रभावीरीत्या वाढीस लागण्यास मदत मिळेल.
विकिपीडिया आता पुस्तकरूपात स्वरूपात उपलब्ध होणार :
- विकिपीडिया आता छापील स्वरूपात उपलब्ध होणार आहे.
- याच्या 7,600 खंडाचे काम पूर्ण झाले असून, त्यांची किंमत पाच लाख अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.
- न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या ग्रॅज्युएट सेंटर आणि स्टेटन आयलंड कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेल्या मायकल मँडीबर्ग यांनी इंग्रजीतील विकिपीडियावरील माहिती त्याच्या लेआऊटसह तयार केले आहे. ही छापील प्रत त्यांनी लुलू.कॉम या साइटवर उपलब्ध करून दिली आहे.
अल्ट्रा-हाय-नेट-वर्थ कुटुंबांच्या संख्येनुसार भारत जगभरात चौथ्या स्थानी :
- समृद्धीचे परिमाण मानल्या जाणाऱ्या अल्ट्रा-हाय-नेट-वर्थ (यूएचएनडब्ल्यू) कुटुंबांच्या संख्येनुसार भारत जगभरात चौथ्या स्थानी असल्याची बाब एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.
- बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या ‘ग्लोबल वेल्थ 2015- विनिंग ग्रोथ गेम’ या अहवालात या बाबीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.