Current Affairs (चालू घडामोडी)

Current Affairs of 23 June 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (23 जून 2018)

एकात्मिक जल आराखड्यास मान्यता :

  • राज्यातील महत्त्वपूर्ण अशा कृष्णा, तापी, नर्मदा, पश्‍चिम वाहिनी नद्या व महानदी खोऱ्यांच्या एकात्मिक राज्य जल आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य जल परिषदेच्या पाचव्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
  • राज्यातील सर्वच खोऱ्यांच्या एकत्रित एकात्मिक जल आराखड्याचे काम 15 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिले.
  • सह्याद्री‘ अतिथिगृहात झालेल्या या परिषदेच्या बैठकीस परिषदेचे उपाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री सुभाष देसाई आदी उपस्थित होते.
  • राज्यात गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा, पश्‍चिम वाहिनी नद्या व महानदी या सहा खोऱ्यांचा अभ्यास करून स्वतंत्रपणे जल आराखडे तयार करण्यात आले. यापैकी गोदावरी खोऱ्याच्या जल आराखड्यास 30 नोव्हेंबर 2017 रोजी मान्यता देण्यात आली होती, तर उर्वरित पाच आराखड्यांचे सादरीकरण परिषदेच्या बैठकीत करण्यात आले.
  • सर्व खोऱ्यांचा एकात्मिक जल आराखडा मंजूर होईपर्यंत प्रत्येक खोरेनिहाय आराखड्याची अंमलबजावणी करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. जल आराखडे मंजूर झाल्यामुळे सिंचन प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 जून 2018)

देशात विकासाच्या नवीन संधी निर्माण होणार :

  • एशियन इन्फ्रास्ट्रक्‍चर इन्व्हेस्टमेंट बॅंकेच्या (Asian Infrastructure Investment Bank-AIIB) मुंबईत होणाऱ्या तिसऱ्या वार्षिक सभेच्या निमित्ताने महाराष्ट्रासह देशात विकासाच्या नवीन संधी निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
  • एआयआयबीची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा 25 व 26 जूनला मुंबईत होत आहे. या सभेचे यजमानपद भारताने स्वीकारले आहे. यानिमित्त आयोजित परिषदेत आशिया खंडातील विविध देशांचे शासकीय, खासगी तसेच सार्वजनकि संस्थांमधील प्रतिनिधी यांच्यासह नागरी संघटनांचे प्रतिनिधीदेखील सहभागी होणार आहेत.

  • पायाभूत सुविधांसाठी वित्तीय पुरवठा : नावीन्यता आणि सहकार्य‘ या संकल्पनेवर आधारित या परषिदेमध्ये सर्व प्रतिनिधी आपल्या नावीण्यपूर्ण संकल्पना आणि अनुभवांची देवाण-घेवाण करतील. त्या माध्यमातून शाश्वत विकासासाठी भविष्यात आवश्‍यक असलेल्या गुंतवणुकीवर विचारविनिमय होणार आहे.
  • एआयआयबीमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकाचा भागधारक आहे. सुमारे 100 बिलियन डॉलर्सचे भागभांडवल असलेली ही बॅंक एक ते दीड टक्के व्याजदराने दीर्घ मुदतीचे कर्ज देते. भारतातील मानव विकास निर्देशांक मोठ्या प्रमाणावर उंचावण्यासाठी सहायक ठरू शकणाऱ्या देशातील पायाभूत विकास प्रकल्पांना बॅंकेमार्फत चालना दिली जाणार आहे.

मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रभारी :

  • काँग्रेसने 22 जून रोजी पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले असून महाराष्ट्राचे पक्षाचे प्रभारी मोहनप्रकाश यांची उचलबांगडी करत लोकसभेतील पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांची नियुक्ती केली आहे. खर्गे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.  आगामी लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा महत्वपूर्ण बदल केला आहे.
  • तसेच या बदलाबरोबरच पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी जे डी सिलम आणि महेंद्र जोशी यांना पक्षाचे सरचिटणीस आणि शशिकांत शर्मा यांना सहसरचिटणीस म्हणून नियुक्त केले आहे.

अमित पाटे ‘गोल्डन लॉयन’ पुरस्काराने सन्मानित :

  • नासा गर्ल स्वीटी पाटे यांचे बंधू अमित पाटे यांच्या कंपनीला कान्स फेस्टिव्हलमध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स‘वर आधारित स्पोर्ट टेक्‍नॉलॉजीसाठी मोबाईल श्रेणीकरिता तब्बल दोन ‘गोल्डन लॉयनपुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळविताना त्यांनी गुगल, ऍपल, टोयोटा, ऑडी, वेरिझॉन, पी अँड जी, ऑरेन्ज, नायकी, केएफसी, द टाइम्स आदी नव्वद देशांच्या हजारो नामांकित कंपन्यांना मागे टाकले.
  • अमित पाटे यांना मोबाईल टेक्‍नॉलॉजीसाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स‘ श्रेणीत सादर केलेल्या ‘स्नॅप्टीव्हिटी‘ या तंत्रासाठी गोल्डन लायन पुरस्कार प्राप्त झाला.
  • उच्च गतीचे रोबोटिक कॅमेरे खेळपट्टीवर चालविण्याऐवजी क्रीडाप्रेमींवर फोकस करून जिवंत क्रीडा प्रकाराचा त्यांना अनुभव यावा, यासाठी ‘स्नॅप्टीव्हिटी‘ हे तंत्र अमित पाटे यांच्या स्नॅप्टीव्हिटी लि. या कंपनीने विकसित केले आहे.

डॉ. कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या प्रकुलगुरूपदी नियुक्ती :

  • माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेतील (आयसीटी) प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. रविंद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या प्रकुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुंबई विद्यापीठाचे कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी 22 जून रोजी डॉ. कुलकर्णी यांची नियुक्ती जाहीर केली.
  • तसेच डॉ. रविंद्र कुलकर्णी यांची नियुक्ती विद्यापीठाच्या कुलगुरूंचा कार्यकाळ असेपर्यंत राहणार आहे.

दिनविशेष :

  • 23 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय विधवा दिन आणि संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन आहे.
  • क्रिस्टोफर लॅथम शॉल्स यांना टाईप-राइटर च्या शोधासाठी 23 जून 1868 मध्ये पेटंट मिळाले.
  • 23 जून 1894 रोजी पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली.
  • भारतीय क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांचा जन्म 23 जून 1901 रोजी झाला.
  • भारतीय नभोवाणी मुंबई येथे 23 जून 1927 रोजी सुरु.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 जून 2018)

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago