Current Affairs of 23 November 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (23 नोव्हेंबर 2016)
2016 मध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आर. आश्विन :
- जागतिक कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन 2016 मध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.
- अश्विनने यंदा न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर 900 मानांकन गुणांचा आकडा गाठताना क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते.
- अश्विनने इंग्लंडविरुद्ध संपलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात पाच तर दुसऱ्या डावात तीन बळी घेतले. त्याने या कसोटीत एकूण 8 बळी घेत यंदा बळींची संख्या 55 केली.
- अश्विनने श्रीलंकेचा फिरकीपटू रंगना हेराथला (54 बळी) पिछाडीवर सोडले.
- 2016 या वर्षांत तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (46 बळी) आहे.
- इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (41 बळी) चौथ्या तर पाकिस्तानचा लेग स्पिनर यासिर शाह (40 बळी) पाचव्या स्थानी आहे.
Must Read (नक्की वाचा):
जब्बार पटेल यांना गदिमा पुरस्कार जाहीर :
- साहित्य, चित्रपट, कलाक्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा गदिमा पुरस्कार यंदा दिग्दर्शक जब्बार पटेल यांना जाहीर झाला आहे.
- गदिमांच्या 39 व्या स्मृतीदिनी, 14 डिसेंबर हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती गदिमा प्रतिष्ठानचे विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी दिली.
- गदिमाच्या पत्नी विद्या माडगूळकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार वीणा तांबे यांना, गीतकार नंदेश उमप यांना चैत्रबन पुरस्कार, गायिका आर्या आंबेकरला विद्या प्रज्ञा पुरस्कार उदगीरच्या ऋतुजा कांकरेला विशेष गदिमा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
एम.जी. के. मेनन यांचे निधन :
- प्रख्यात वैज्ञानिक, इस्त्रोचे माजी अध्यक्ष आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे माजी संचालक प्रा. एम.जी. के. मेनन (वय 88) यांचे 22 नोव्हेंबर रोजी निधन झाले.
- प्रो. मेनन यांचा देशाच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासात खूप मोठा वाटा होता. विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या मंत्रिमंडळात ते विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्रीही होते.
- पद्मभूषण, पद्मविभूषण किताबांचे मानकरी असलेल्या प्रो. मेनन यांनी नियोजन आयोगाचे सदस्य, पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार, कौन्सिल ऑफ सायन्स अॅण्ड इंडस्ट्रीअल रिसर्चचे उपाध्यक्ष अशा अनेक पदांवर काम केले होते.
- रॉयल सोसायटी ऑफ लंडनचे तसेच इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे प्रो. मेनन फेलो होते.
भारतात स्थापन होणार एनबीए अॅकॅडमी :
- नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनने (एनबीए) 22 नोव्हेंबर रोजी महत्त्वपूर्ण घोषणा करताना भारतात पहिली एनबीए बास्केटबॉल अॅकॅडमी सुरू करण्याचा विचार असल्याचे सांगितले.
- दिल्ली येथे सुरू असलेली ही अॅकॅडमी सुरू होणार असून तीमध्ये भारतातील अव्वल बास्केटबॉलपटूंना प्रशिक्षणाची संधी मिळेल, अशी माहिती एनबीएने दिली.
- ही अॅकॅडमी भारतातील पहिली एनबीए अॅकॅडमी ठरणार असून, जगातील पाचवे एलिट ट्रेनिंग सेंटर ठरेल. पुढील वर्षी एप्रिल 2017 मध्ये भारतातील अॅकॅडमीला सुरुवात करण्याचा एनबीएचा विचार आहे.
- तसेच या उपक्रमासाठी सगळी तयारी केलेल्या एनबीए एक निवड शिबिर आयोजित करणार असून, त्याद्वारे पहिल्या 24 निवडक खेळाडूंचा गट निवडण्यात येईल.
दिनविशेष :
- मराठी लेखक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1872 रोजी झाला.
- 22 नोव्हेंबर 1937 हा भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांचा स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा