Current Affairs of 23 November 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (23 नोव्हेंबर 2017)

आठवड्यांतून चार दिवस खुले राहणार राष्ट्रपती भवन :

  • भारताचे प्रथम नागरिक असणाऱ्या राष्ट्रपतींचे निवासस्थान अर्थात राष्ट्रपती भवन सर्वसामान्य जनतेसाठी आता आठवड्यातून चार दिवस खुले राहणार आहे.
  • राष्ट्रपती सचिवालयाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या चार दिवशी सर्वसामान्य जनतेला राष्ट्रपती भवनाला भेट देता येणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत भवन खुले राहणार आहे.
  • राजपथवरील गेट क्र. 2, हुक्मीमाई मार्गावरील गेट क्र. 37 आणि चर्च रोडवरील गेट क्र. 38 या ठिकाणांहून राष्ट्रपती भवनाला भेटीसाठी आलेल्यांना प्रवेश तसेच बाहेर पडता येणार आहे.
  • आगामी काळात वेबसाईटवरून ऑनलाईन बुकिंगच्या माध्यमांतून राष्ट्रपती भवन पाहण्यासाठी बुकिंगही करता येणार आहे. भवन पाहण्यासाठी प्रति व्यक्ती 50 रुपये इतके शुल्क आकारले जाते. 8 वर्षांखालील बालकांना येथे प्रवेश निशूल्क आहे.
  • भारतीय नागरिकांना राष्ट्रपती भवनातील प्रवेशासाठी आपले छायाचित्र असलेले ओळखपत्र तर परदेशी नागरिकांना आपला मुळ पासपोर्ट दाखवणे बंधनकारक आहे.

औरंगाबादेतील कंपनीचा जपानी बँकेशी करार :

  • जगभरात सॉफ्टवेअर उत्पादनात दबदबा अमेरिकेचा. भारतातील दिग्गज कंपन्याही तेथूनच सॉफ्टवेअर आयात करतात. हा इतिहास पुसण्याचा प्रयत्न औरंगाबादने केला असून, मराठमोळ्या तरुणांनी तयार केलेली सॉफ्टवेअर लवकरच जपानच्या बाजारात दिसणार आहेत. यासंदर्भात औरंगाबादेतील ‘फाइंड अ‍ॅबिलिटि सायन्सेस’ कंपनीने अलीकडेच सॉफ्टबँक या जपानी कंपनीशी करार केला आहे.
  • बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या आनंद माहूरकर याने मोठ्या पगाराची नोकरी सोडून 2010 साली कंपनीची स्थापना केली. अमेरिकेतील बोस्टनमध्ये कंपनीचे मुख्यालय आहे. माहूरकर यांनी त्याचवर्षी कंपनीचे औरंगाबादेतही एक कार्यालय सुरू केले.
  • तसेच आनंद यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अंबाजोगाईत झाले. आई-वडील दोघेही शिक्षक. औरंगाबादेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग केले. पुढे पुण्यात नोकरी केली. त्याचवेळी संगणकाचे ज्ञान घेतले. नंतर औरंगाबादेत नोकरी केली.
  • औरंगाबादेतील एमआयटी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि जेएनईसीच्या माध्यमातून अभियांत्रिकीच्या तरुणांना प्रशिक्षण दिले जाईल. स्किल डेव्हलपमेंट केले जाईल. याच तरुणांना पुढे आपल्या कंपनीत सामावून घेतले जाईल. असे महुरकर यांनी सांगितले.

भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी :

  • भारत आणि रशिया यांची संयुक्त निर्मिती असणारे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्राह्मोसची Brahmos 22 नोव्हेंबर रोजी भारतीय हवाई दलाच्या सुखोई 30MKI या जेट विमानावरुन यशस्वी चाचणी करण्यात आली.
  • सुमारे अडीच टन वजनाच्या या क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरात चाचणी घेण्यात आली. आजवर उपग्रह प्रक्षेपण वाहनाच्या माध्यमांतून क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.मात्र, भारताने पहिल्यांदाच जेट विमानाचा अशा प्रक्षेपण वाहनासारखा वापर करुन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेऊन इतिहास घडवला.
  • मध्यम पल्ल्याच्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी भारताच्या अंतराळ संशोधन कार्यातील मैलाचा दगड मानला जात आहे. हवेतून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणारे हे क्षेपणास्त्र दहशतवाद्यांची ठिकाणे अचूकरित्या भेदू शकते. हवेतून दहशतवाद्यांचे असे अड्डे उध्वस्त करण्याबरोबरच जमिनीखालील बंकर्सही उद्धस्त करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे. भारत आणि रशिया यांच्यातील संयुक्त निर्मिती असणाऱ्या ब्राह्मोसच्या अशा आणखी दोन चाचण्या घेण्याचा भारताचा मानस आहे.

मूल दत्तक घेण्यासाठी प्राधिकरणाकडे नोंदणी करणे बंधनकार :

  • मुले दत्तक घेऊन नंतर त्यांना वाईट वागणूक दिली जाण्याच्या काही घटना सामोऱ्या आल्यानंतर आता जे पालक मुले दत्तक घेतील त्यांना हिंदू दत्तक कायद्यानुसार बालक दत्तक स्रोत प्राधिकरणाकडे नोंदणी करणे बंधनकार करण्यात येणार आहे.
  • संबंधित पालक हे बाल न्याय कायदा 2015 अनुसार मुले दत्तक घेऊ शकतात. हिंदू, बौद्ध, जैन व शीख यांना त्यांच्या दत्तक मूल प्रक्रियेस हिंदू दत्तक कायद्यानुसार अधिकृतता देऊ शकतात.
  • बाल न्याय कायद्यात मुलाचा स्रोत व पालकांची पाश्र्वभूमी तपासण्याची तरतूद आहे पण हिंदू दत्तक कायद्यात ही तरतूद नाही त्यामुळे अनेक लोक त्याचा गैरफायदा घेतात असे दिसून आले आहे.
  • तसेच त्यामुळे आता महिला व बालविकास मंत्रालयाने हिंदू दत्तक कायद्यात काही सुधारणा करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवण्यासाठी तयार केली असून त्यात पालकांना मूल दत्तक घेताना त्याची नोंदणी मूल दत्तक स्रोत प्राधिकरणाकडे करणे अनिवार्य करण्यात येणार आहे. सध्या या प्रस्तावाचा मसुदा विविध मंत्रालयांकडे अभिप्रायार्थ पाठवण्यात आला आहे.

भारतात आयआयटी बॉम्बे अव्वलस्थानी :

  • ‘क्वॅककॉलिर्स सायमंड्स’च्या (क्यूएस) ब्रिक्स (ब्राझील, रशिया, इंडिया, चीन, साउथ आफ्रिका) क्रमवारीत आयआयटी बॉम्बे भारतात अव्वल ठरले आहे, तर ब्रीक्समध्ये आयआयटी बॉम्बेने नववा क्रमांक पटकावला आहे. आयआयटी बॉम्बे ‘क्यूएस’च्या क्रमवारीत आशियात 34व्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे.
  • जून महिन्यांत क्यूएसच्या जागतिक क्रमवारीत आयआयटी बॉम्बे 179 क्रमांकावर होते. आयआयटी बॉम्बेची कामगिरी यंदा क्रमवारीत सातत्याने पुढे जाताना दिसत आहे. ब्रीक्स 2018 ची क्रमवारी क्यूएसने 22 नोव्हेंबर रोजी जाहीर केली, त्या वेळी आयआयटी बॉम्बे देशात अव्वल असल्याचे जाहीर केले.
  • ‘रिजन युनिव्हर्सिटी’ क्रमवारीत ब्रीक्समध्ये आयआयटी बॉम्बे 3 टक्क्यांमध्ये आहे. रिजन युनिव्हर्सिटीमध्ये तब्बल 9 हजार विद्यापीठे, संस्थांचा सहभाग होता. आयआयटी बॉम्बेचे काम वाखाणण्याजोगे असल्याचे निदर्शनास आले आहे.
  • 2016-17 च्या क्रमवारीच्या तुलनेत आयआयटी बॉम्बे चारने पुढे जाऊन अव्वल होण्याचा मान पटकावला आहे. 100 पैकी आयआयटी बॉम्बेने 83.6 गुण मिळविले आहेत.

दिनविशेष :

  • मराठी लेखक ‘कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर’ यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1872 मध्ये झाला.
  • 23 नोव्हेंबर 1937 हा दिवस भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ ‘जगदीश चंद्र बोस’ यांचा स्मृतीदिन आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago