चालू घडामोडी (24 ऑगस्ट 2015)
साठ शहरे “सौर शहरे” योजनेंतर्गत विकसित केली जाणार :
- महाराष्ट्रातील नागपूर, कल्याण-डोंबिवली, ठाणे, औरंगाबाद, नांदेड आणि शिर्डी, तसेच गोव्यातील पणजीसह देशातील साठ शहरे अपारंपरिक व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या “सौर शहरे” योजनेंतर्गत विकसित केली जाणार आहेत.
- प्रत्येक राज्यातील 50 हजार ते 50 लाख या लोकसंख्येदरम्यानच्या किमान एक आणि कमाल पाच शहरांचा यात समावेश आहे.
- या प्रकल्पांतर्गत मंजुरी मिळालेल्या 50 पैकी 46 शहरांचा विकास आराखडा (मास्टर प्लॅन) तयार करण्यात आला आहे.
- यामध्ये महाराष्ट्रातील सहाही व गोव्यातील पणजी या शहरांचा मास्टर प्लॅन तयार आहे.
- यासाठी 23.70 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यातील 6.11 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
- अशा प्रकारचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाने जून 2009 मध्येच 26 सल्लगार संस्थांची नियुक्ती केली आहे.
- आठ प्रमुख शहरे ही “मॉडेल सौर शहरे” म्हणून विकसित केली जात आहेत.
- यातील नागपूर, चंडीगड, गांधीनगर आणि म्हैसूर या शहरांना आधीच परवानगी देण्यात आली आहे.
- त्यासाठी प्रत्येकी साडेनऊ कोटी रुपयांचे अर्थसाह्यदेखील देण्यात आले आहे, तर अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी तेवढीच रक्कम (साडेनऊ कोटी रुपये) स्थानिक स्वराज्य संस्था (महापालिका), राज्य सरकार, स्थानिक प्रशासन किंवा खासगी सार्वजनिक भागीदारी यामार्फत देण्यात आले आहेत.
सुषमा स्वराज इजिप्त आणि जर्मनी दौऱ्यावर :
- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज रविवारी इजिप्त आणि जर्मनी या दोन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या.
- या दौऱ्यात व्यापार आणि गुंतवणुकीबरोबरच उभय देशांतील संबंध अधिक वृद्धिंगत होण्यावर भर दिला जाणार आहे.
- चार दिवसांच्या दौऱ्यादरम्यान स्वराज प्रथम इजिप्तला जाणार असून, राजधानी कैरो येथे अध्यक्ष अब्दुल फतेह अल सीसी यांची भेट घेणार आहेत.
- त्याचबरोबर इजिप्तचे परराष्ट्रमंत्री समेह हसन शौकरी यांच्याशीही चर्चा करणार आहेत.
- याशिवाय सुषमा स्वराज अरब देशाच्या लीगचे महासचिव नाबिल अलअराबी आणि अन्य नेत्यांची भेट घेणार आहेत.
- परराष्ट्रमंत्री म्हणून सुषमा स्वराज यांचा पहिलाच दौरा आहे.
ब्रिटनचा दूतावास सुरू करण्याचा निर्णय :
- इराणची राजधानी तेहरान येथे तब्बल चार वर्षांनंतर ब्रिटनचा दूतावास सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- इराणवर लादण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधांच्या विरोधात 2011 मध्ये येथील ब्रिटिश दूतावासासमोर झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर हा दूतावास बंद करण्यात आला होता.
- इराणच्या वादग्रस्त आण्विक कार्यक्रमासंदर्भात सुरक्षा समिती व इराणमधील प्रदीर्घ चर्चा यशस्वी झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
- तेहरानमध्ये पुन्हा सुरू करण्यात येत असलेला ब्रिटिश दूतावास हा जागतिक राजकारणामध्ये इराणच्या झालेल्या यशस्वी पुनरागमनाचा आणखी एक संकेत असल्याचे मानले जात आहे.
तंबाखूसेवनाने होणाऱ्या मृत्यूपैकी तीन चतुर्थांश मृत्यू एकट्या भारतात :
- जगभरात तंबाखूसेवनाने होणाऱ्या मृत्यूपैकी तीन चतुर्थांश मृत्यू एकट्या भारतात होतात, असे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे.
- यामध्ये सिगारेटद्वारे तंबाखूचे होणारे सेवन वगळून फक्त तंबाखू चघळण्याच्या दुष्परिणामांचा अभ्यास केला गेला आहे.
- जगभरात दरवर्षी सात कोटींहून अधिक नागरिक तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या रोगांमुळे मृत्युमुखी पडतात.
- यापैकी एकट्या भारतात तीन चतुर्थांश मृत्यू होत असून, लाखो लोक अद्यापही त्याचे दुष्परिणाम भोगत आहेत. जगभरात तंबाखूमुळे सर्वांत अधिक, म्हणजे 85 टक्के मृत्यू दक्षिण आशियात होतात.
- यापैकी 75 टक्के मृत्यू एकट्या भारतात होतात.
- जगभरातील 115 देशांमध्ये तंबाखूचे सेवन केले जाते. तंबाखूमुळे एकूण 113 रोग होत असल्याचे निदान झाले आहे.
खासगी सर्च इंजिन गुगलपेक्षाही 47 टक्के अधिक अचूक :
- शाळेतील मुलाने प्रोजेक्टसाठी तयार केलेले खासगी सर्च इंजिन गुगलपेक्षाही 47 टक्के अधिक अचूक असल्याचा दावा करण्यात आला आहे.
- अनमोल टुकरेल (वय 16) असे या मूळ भारतीय वंशाच्या मुलाचे नाव असून, त्याने हा प्रकल्प गुगल सायन्स फेअरकडेही पाठविला आहे.
- इंटर्नशिपसाठी बंगळूर येथील एका कंपनीत आला असताना अनमोलला खासगी सर्च इंजिनची कल्पना सुचली.
- हे सर्च इंजिन तयार करण्यासाठी अनमोलचे काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. यासाठी त्याने गुगलसह पायथॉन लॅंग्वेज आणि स्प्रेडशीट प्रोग्रामचा वापर केला.
- अनमोलने तिसरीत असतानाच कॉम्प्युटर कोडिंग करण्याचे तंत्र आत्मसात केले होते.
- त्यामुळे या सर्च इंजिनसाठीचे कोडिंग त्याने 60 तासांत पूर्ण केले.
‘मन की बात’ हा कार्यक्रम 30 ऑगस्टला :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी ‘मन की बात’ हा रेडिओवरून जनतेशी संवाद साधण्याचा कार्यक्रम 30 ऑगस्टला होणार आहे.
- ‘मन की बात’ कार्यक्रमात चर्चा करण्यासाठी विविध विषयांचा समावेश करण्यात येणार आहे.
- मोदींनी यापूर्वी काळा पैसा, शेतकरी, परीक्षा अश्या विविध विषयांवर ‘मन की बात’या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला आहे.
- त्यावेळी त्यांनी रेडिओद्वारे महिन्यातून एकदा किंवा दोनदा जनतेशी संवाद साधणार असल्याचे सांगितले होते.
स्मार्ट सिटी योजनेसाठी यादी एक सप्टेंबरपर्यंत जाहीर :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेसाठी शंभर शहरांची यादी केंद्र सरकार एक सप्टेंबरपर्यंत जाहीर करणार असल्याचे केंद्रीय नगर विकासमंत्री वेंकय्या नायडू यांनी सांगितले.
- यापैकी काही मानकांच्या आधारावर 20 शहरांना प्राधान्य देण्यात येईल. ही मानके यादीतील इतर शहरांना आणि इतर इच्छुक शहरांनाही पाठविण्यात आली आहेत.
- नागरिकांना सुधारित सुविधा, उत्तम प्रशासन, पारदर्शी व्यवहार या आधारावर शहरांना पूर्णत्वाचा दाखला आणि गुण दिले जाणार आहेत.
- सुधारणा झाल्यानंतर विशेष पथकाद्वारे या शहरांची तपासणी केली जाईल.
- याच पथकाला निधी पुरविण्याचे अधिकार असणार आहेत.
जलयुक्त शिवार योजनेला आमीर खानची 11 लाख रुपयांची मदत :
- राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ठरलेल्या जलयुक्त शिवार योजनेला हातभार लावण्याच्या भूमिकेतून अभिनेता आमीर खानने 11 लाख रुपयांची मदत केली आहे.
- आमीर खानच्या सामाजिक योगदानाबदल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खान यांचे आभार मानले.