चालू घडामोडी (24 जून 2016)
अनिल कुंबळे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक :
- भारताचे माजी कर्णधार आणि देशातील सर्वाधिक यशस्वी फिरकीपटू अनिल कुंबळे यांची (दि.23) टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली.
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत कुंबळे यांची नवे भारतीय प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची घोषणा केली.
- तसेच ते वर्षभराच्या कालावधीसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळतील.
- बीसीसीआयने प्रशिक्षक निवडण्यासाठी पारदर्शी प्रक्रियेचे पालन केले.
- बीसीसीआयने जाहिरात प्रकाशित केल्यानंतर 57 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातून कुंबळे यांची निवड करण्यात आली.
- 57 उमेदवारांमधून सुरुवातीला 21 उमेदवारांची निवड करण्यात आली.
नासाच्या स्पर्धेत सहभाग घेणार भारतीय टीम :
- नासाच्या प्रतिष्ठित जागतिक स्पर्धेत भारतातील विद्यार्थ्यांचा एक गट सहभाग घेत आहे.
- रिमोट संचलित वाहनांचे डिझाइन आणि वाहने तयार करणे, यावर आधारित ही स्पर्धा आहे.
- भारताच्या गटात अभियांत्रिकीच्या 13 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
- मुंबईस्थित मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंटचा ‘स्क्रू ड्राइवर्स’ नावाचा हा गट विविध देशांतून आलेल्या 40 अन्य गटांसोबत स्पर्धा करील.
- ह्युस्टनमध्ये (दि.23) या स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात चीन, स्कॉटलंड, रूस, अमेरिका, कॅनाडा, आयर्लंड, मेक्सिको, नॉर्वे, डेन्मार्क, इजिप्त, तुर्की आणि पोलंड आदी देशांचा सहभाग आहे.
दारूगोळा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना एसबीआयद्वारे वित्तपुरवठा :
- सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असणारी भारतीय स्टेट बँक दारूगोळा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना वित्तपुरवठा करीत असल्याचे उघड झाले आहे.
- अशाप्रकारे दारूगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या जगभरात 158 बँका आहेत.
- तसेच त्यातील स्टेट बँक ही पहिलीच भारतीय बँक ठरली आहे.
- ‘डच कॅम्पेन ग्रुप पॅक’द्वारा जारी करण्यात आलेल्या यादीमध्ये स्टेट बँकेचे नाव आहे.
- गुंतवणूक करणाऱ्या अन्य बँकांमध्ये जेपी मॉर्गन, बारक्लेज, बँक ऑफ अमेरिका, क्रेडिट सूस आदी नामवंत बँकांचाही समावेश आहे.
- तसेच या बँकांनी जून 2012 ते एप्रिल 2016 पर्यंत क्लस्टर बॉम्ब तयार करणाऱ्या सात कंपन्यांमध्ये 2800 कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे.
नव्या बॅडमिंटन रँकिंगचे अनुक्रमाणिका जाहीर :
- भारताच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकांच्या आशा सायना नेहवाल आणि पी़व्ही़सिंधू (दि.23) जाहीर झालेल्या नव्या बॅडमिंटन रँकिंगमध्ये अनुक्रमे आपल्या सहाव्या आणि दहाव्या स्थानावर कायम आहेत़.
- सायनाने नुकतेच दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचा किताब जिंकला होता़ सिंधूचे मात्र यावर्षीच्या सुरुवातीला मलेशियामध्ये किताब जिंकल्यानंतर प्रदर्शन चढ उताराचे राहिले आहे, मात्र आॅलिम्पिकपूर्वी जवळपास दीड महिन्यापूर्वी ती टॉपटेनमध्ये आली आहे़.
- पुरुषांमध्ये किदांबी श्रीकांत अकराव्या आणि अजय जयराम 24 व्या स्थानावर कायम आहेत़ पुरुष दुहेरीमध्ये मनू अत्री आणि बी़ सुमित रेड्डी 21 व्या तर महिला दुहेरीमध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा 16 व्या स्थानावर कायम आहेत.
ऑगस्ट मध्ये होणार ‘आयएफएफएम’ महोत्सव :
- मेलबर्न येथे येत्या 11 ऑगस्ट ते 20 ऑगस्टदरम्यान रंगणाऱ्या ‘इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न’मध्ये ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हे मुख्य अतिथी राहणार आहेत.
- तसेच या दरम्यान होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ऋषी कपूर यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
- महिला सक्षमीकरणही यंदाच्या महोत्सवाची थीम आहे.
- इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्नची अॅम्बेसिडर विद्या बालन हिची महोत्सवातील उपस्थिती राहणार आहे.
- एकंदर दहा दिवसांच्या या महोत्सवात वेगवेगळ्या रंगारंग कार्यक्रमांची उधळण होणार आहे.
दिनविशेष :
- 1860 : लंडन येथील सेंट थॉमस र्ग्नालयात पारिचारिका प्रशिक्षणाला सुरुवात झाली.
- 1863 : इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा जन्म.
- 1961 : आशियातील पहिले ध्वनी वेगी विमान भारतात तयार झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा