Current Affairs of 24 November 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (24 नोव्हेंबर 2015)

देशातील स्मार्ट शहरांसाठी इस्राईलची मदत :

  • केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी मदत करणाऱ्या ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन ॲडव्हायजरी सर्व्हिसेस’ (डीसीएफ) आणि इस्राईलमधील तेल अविव-याफो महापालिकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तेल अविव-याफो शिक्षण महाविद्यालयादरम्यान सहकार्य करार झाला आहे.
  • भारतातील शहरांचे ‘स्मार्ट सिटी’मध्ये रूपांतर घडवून आणण्याच्या प्रक्रियेला आता इस्राईलच्या जगभरात नावाजल्या गेलेल्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पातील तज्ज्ञांचे सहकार्य मिळणार आहे.
  • तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवरील सार्वजनिक क्षेत्रात कामगिरी व्यवस्थापन, प्रकल्प व्यवस्थापन व देखरेख यासाठी मलेशियाच्या पंतप्रधान कार्यालयांतर्गत येणाऱ्या ‘द परफॉरमन्स मॅनेजनेंट डिलिव्हरी युनिट’ (पेमांडू) आणि भारताचा निती आयोग यांच्यात आज सहकार्य करार करण्यात आला.

भारत आणि मलेशिया तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी :

  • द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने पुढील पाऊल टाकत भारत आणि मलेशिया या देशांनी सायबर सुरक्षा, सांस्कृतिक देवाण-घेवाणीसह योजना आणि अंमलबजावणी अशा तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान नजीब तुन रझाक यांच्या उपस्थितीत हे करार झाले.
  • भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक (सर्ट-इन) आणि मलेशियामधील सायबर सुरक्षा या संस्थांमध्ये झालेल्या करारानुसार सायबर सुरक्षेसंदर्भात तांत्रिक साहाय्य करणे, सायबर हल्ल्यांची माहिती देणे, धोरणात्मक चर्चा करणे असे ठरविण्यात आले आहे.
  • दोन्ही देशांच्या सांस्कृतिक मंत्रालयांदरम्यान झालेल्या देवाण-घेवाणीच्या करारांतर्गत शिष्टमंडळाचे नियमित दौरे, कला प्रदर्शन भरविणे, तज्ज्ञ व्यक्तींचा परिषदांमधील सहभाग वाढविणे, अशा मुद्यांना मान्यता देण्यात आली आहे.

मार्च 2016पर्यंत अन्नसुरक्षा कायदा लागू :

  • तमिळनाडू वगळता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी मार्च 2016पर्यंत अन्नसुरक्षा कायदा लागू करण्याची तयारी दर्शविली आहे.
  • सद्यःस्थितीत महाराष्ट्रासह केवळ चौदा राज्यांमध्ये या कायद्याची अंमलबजावणी होत आहे.
  • देशभरातील सर्व राज्यांच्या अन्न सचिवांची परिषद आज दिल्लीत झाली.
  • 2013 मध्ये संसदेने अन्नसुरक्षा कायदा मंजूर केल्यानंतर सर्व राज्यांमध्ये लागू करण्याची मुदत आतापर्यंत तीन वेळा वाढविण्यात आली होती.
  • त्यातील शेवटची मुदत सप्टेंबरअखेर संपली.
  • त्या पार्श्‍वभूमीवर आजच्या अन्न सचिवांच्या बैठकीमध्ये तमिळनाडू वगळता सर्व राज्यांनी मार्च 2016पर्यंत अंमलबजावणीस होकार दिला आहे.
  • यातील उत्तर प्रदेश, मेघालय, जम्मू-काश्‍मीर आणि अंदमान-निकोबारमध्ये जानेवारीअखेरपर्यंत अन्नसुरक्षा कायदा लागू होणार आहे.
  • तर उर्वरित गुजरात, केरळ, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, नागालॅंड हे मार्चपर्यंत लागू करतील.
  • तमिळनाडूमध्ये सरसकट सर्वांसाठी स्वस्त दरात धान्यपुरवठा करण्याची योजना सुरू असल्याने अन्नसुरक्षा कायदा लागू करणे शक्‍य नसल्याचे या राज्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे पासवान म्हणाले.

भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मालिका श्रीलंकेमध्ये :

  • भारत आणि पाकिस्तानमधील बहुचर्चित द्विपक्षीय क्रिकेट मालिका श्रीलंकेमध्ये घेतली जाऊ शकते, असे वृत्त ‘क्रिकइन्फो’ने दिले आहे.
  • अर्थात, दोन्ही बाजूंकडून यास अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान हे दोघेही दुबईत आहेत.
  • यासंदर्भातील अधिकृत घोषणा 27 नोव्हेंबरला केली जाईल.
  • यापूर्वी भारताने 2006 मध्ये शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता.
  • तर 2007 नंतर पाकिस्तानने द्विपक्षीय मालिकेसाठी भारताचा दौरा केलेला नाही.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची भारतरत्नासाठी शिफारस :

  • महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने त्यांच्या नावांची शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला सलग चौथ्यांदा विजेतेपद :

  • सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स टेनिस स्पर्धेचे सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकावित या मोसमाची अखेर विजेतेपदाने केली.
  • जोकोविचने अंतिम फेरीत स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचा 6-3.6-4 असा पराभव केला.
  • जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या जोकोविचने आपला विजेतेपदाचा धडाका कायम ठेवला आहे.
  • एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स टेनिस स्पर्धेच्या 46 वर्षांच्या इतिहासात सलग चौथ्या वर्षी विजेतेपद मिळविणारा जोकोविच हा पहिला टेनिसपटू आहे.
  • यापूर्वी पीट सॅम्प्रास आणि इव्हान लेंडल यांनी पाच वेळा आणि रॉजर फेडररने सर्वाधिक सहावेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळविलेले आहे.
  • जोकोविचचे या वर्षातील हे अकरावे विजेतेपद आहे.
  • त्याने या वर्षात खेळलेल्या 88 सामन्यांपैकी 82 सामन्यांत विजय मिळविलेला आहे.

मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रशांत दामले यांना जाहीर :

  • प्रदीर्घ नाट्यसेवेसाठी दिला जाणारा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार यंदा प्रशांत दामले यांना जाहीर झाला आहे.
  • हृदयनाथ मंगेशकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
  • ‘कार्टी काळजात घुसली’चा 100वा प्रयोग दीनानाथ नाट्यगृहात झाला. त्या वेळी घोषणा करण्यात आली.
  • पुरस्कारांचे वितरण एप्रिलमध्ये मास्टर दीनानाथ यांच्या पुण्यतिथीदिनी गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या हस्ते होणार आहे.

कार्मिक मंत्रालयाच्या शिफारशी :

  • अनुसूचित जाती-जमाती व मागास जातीतील मुलांना जातीचा व अधिवासाचा दाखला मिळण्यात असंख्य अडचणी येत असल्याने यापुढे त्यांच्या जन्म प्रमाणपत्रावरच दलित असा शिक्का मारला जाण्याची शक्यता आहे.
  • सरकारने त्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.
  • सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील शाळांना अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना अधिवास व जात प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे.
  • मुले आठवीत शिकत असतानाच त्यांना शाळेने हे प्रमाणपत्र द्यायचे आहे.

स्वीडनमधील वैज्ञानिकांचे संशोधन :

  • स्वीडनमधील वैज्ञानिकांनी वनस्पतींमध्ये काही सर्किट्स (मंडले) प्रत्यारोपित करून त्यातील पोषके व जलवाहक वाहिन्यांच्या प्रणालीत बदल केले व त्यातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने गुलाबाच्या रोपाची निर्मिती करण्यात आली आहे.
  • वनस्पती व इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान यांचा संगम यात पाहण्यास मिळतो.
  • स्वीडनच्या लिंकोपिंग विद्यापीठातील वैज्ञानिकांनी वनस्पतींमध्ये डिजिटल व अ‍ॅनॅलॉग सर्किट्स प्रत्यारोपित केली आहेत.
  • या प्रकाराला सायबोर्ग वनस्पती असे म्हणता येते.
  • लॅबोरेटरी ऑफ ऑर्गनॅनिक इलेक्ट्रॉनिक्स या संस्थेचे प्राध्यापक मॅग्नस बेरग्रेन यांनी जैविक गुलाबातील काही घटक वापरून प्रथम इलेक्ट्रॉनिक मंडल (सर्किट) तयार केले.
  • त्यात वायर्स, डिजिटल लॉजिक, डिस्प्ले यांचा वापर करण्यात आला होता. वनस्पतींची रचना गुंतागुंतीची असते व त्यांच्यात आयनाच्या स्वरूपातील संदेश व संप्रेरके विशिष्ट कार्ये घडवून आणत असतात.
  • पण त्यांच्या या क्रिया फार हळूहळू चालत असतात. वनस्पतींमध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट वापरल्याने त्यांची ही कार्यक्षमता वाढली व विद्युत संदेश तसेच रासायनिक अभिक्रिया यांची सांगड वेगाने घातली जाऊ लागली.
  • वनस्पती व इलेक्ट्रॉनिक्स यांचा संबंध जोडणारे संशोधन यापूर्वी झालेले नाही.
  • सायन्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
  • यातून आगामी काळात ऊर्जा देणाऱ्या वनस्पती तयार करता येणार आहेत.

दिनविशेष :

  • राष्ट्रीय ग्राहक दिन

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago