Current Affairs of 24 September 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (24 सप्टेंबर 2015)
मुकेश अंबानी भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती :
- रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सलग नवव्या वर्षी भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळविला.
- मुकेश अंबानी यांच्याकडे एकूण 18.9 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी संपत्ती आहे.
- फोर्ब्ज मासिकाने प्रसिद्ध केलेल्या भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अंबानी यांना पहिले स्थान देण्यात आले आहे.
- या यादीत दुसऱ्या स्थानावर सन फार्माचे संस्थापक दिलीप संघवी आहेत.
- त्यांच्याकडे 18 अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे.
- विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी 15.9 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
- यंदाच्या यादीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन व बिन्नी बन्सल यांना प्रथमच भारतातील आघाडीच्या 100 श्रीमंत उद्योजकांच्या यादीत सामील होण्याचा मान मिळाला आहे.
- या दोघांकडे प्रत्येकी 1.3 अब्ज डॉलर संपत्ती असून त्यांना या यादीत 86 व्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे.
- देशातील सर्व उद्योजकांची एकत्रितपणे 345 अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे.
- वर्ष 2014 मध्ये हा आकडा 346 अब्ज डॉलर होता.
- यावर्षी भारताचा विकास दर सात टक्क्यांनी वाढणे अपेक्षित होते, परंतु उद्योगपतींच्या संपत्तीतील घसरणीचे प्रमुख कारण शेअर बाजारातील मोठी घसरण व रूपयातील अस्थिरता असल्याचे फोर्ब्सकडून सांगण्यात आले आहे.
- फोर्ब्जच्या यादीतील पहिले दहा अब्जाधीश
- मुकेश अंबानी – (18.9 अब्ज डॉलर)
- दिलीप संघवी – (18 अब्ज डॉलर)
- अझीम प्रेमजी – (15.9 अब्ज डॉलर)
- हिंदुजा ब्रदर्स – (15.9 अब्ज डॉलर)
- पालोनजी मिस्त्री – (14.7 अब्ज डॉलर)
- शिव नाडर – (12.9 अब्ज डॉलर)
- गोदरेज परिवार – (11.4 अब्ज डॉलर)
- लक्ष्मी मित्तल – (11.2 अब्ज डॉलर)
- सायरस पुनावाला – (7.9 अब्ज डॉलर)
- कुमार मंगलम बिर्ला – (7.8 अब्ज डॉलर)
Must Read (नक्की वाचा):
ऑस्कर पुरस्कारासाठी “कोर्ट” या मराठी चित्रपटाची निवड :
- ऑस्कर पुरस्कारांच्या परदेशी भाषा विभागासाठी भारतातर्फे “कोर्ट” या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे.
- पुढील वर्षी हा ऑस्कर सोहळा होणार आहे.
- झू एन्टरटेन्मेंट प्रा. लि. या बॅनरखाली तयार झालेल्या “कोर्ट”ची निर्मिती विवेक गोम्बर यांनी केली आहे.
- चैतन्य ताम्हाणे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.यापूर्वी “कोर्ट‘ला अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
- राष्ट्रीय सुवर्णकमळ मिळवणारा हा चौथा चित्रपट आहे; तर ऑस्करसाठी भारतातर्फे परदेशी भाषा विभागात पाठवला जाणारा हा तिसरा मराठी चित्रपट आहे.
- यापूर्वी “श्यामची आई”, “श्वास”, “देऊळ”आणि “कोर्ट”ला सुवर्णकमळ मिळाले होते.
- “श्वास” तसेच “हरिश्चंद्राची फॅक्टरी” भारतातर्फे परदेशी भाषा विभागासाठी पाठवण्यात आले होते.
- “कोर्ट”हा 2016 च्या ऑस्करसाठी भारतातर्फे परदेशी भाषा विभागातून पाठवण्यात आलेला तिसरा मराठी चित्रपट आहे.
मानवी मंगळ मोहीम राबविण्याचा “नासा”चा घाट :
- वर्ष-दीड वर्षाचा अंतराळ प्रवास व मंगळावरील धोकादायक वातावरण आदी अडचणींवर मात करून मानवी मंगळ मोहीम राबविण्याचा घाट “नासा”ने घातला आहे.
- या मोहिमेचा एक भाग म्हणून “हाय सीज” या आगळ्यावेगळ्या प्रकल्पाला नुकताच प्रारंभ झाला आहे.
- या प्रयोगात सहा तरुण शास्त्रज्ञांनी स्वतःला वर्षभरासाठी छोट्या बंदिस्त जागेत कोंडून घेतले आहे.
- या प्रकल्पाचे नाव “हाय सीज” असून, त्याचा चौथा टप्पा 28 ऑगस्ट रोजी सुरू झाला.
कोल्हापूर जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक :
- रेशन कार्ड संगणकीकरणाच्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत रेशन कार्ड हे आधार कार्डाशी जोडण्याचे काम शासनाकडून सुरू आहे.
- या प्रकल्पांतर्गत आजअखेर 13 लाख 13 हजार 977 लाभार्थ्यांना जोडत कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
त्याखालोखाल 13 लाख 12 हजार 839 लाभार्थ्यांचे लिंकिंग करून नागपूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
अमेरिका, भारत आणि जपान यांनी त्रिपक्षीय कराराचा निर्णय :
- अमेरिका, भारत आणि जपान यांनी मंत्री पातळीवर भागीदारी उन्नत करण्यासाठी त्रिपक्षीय कराराचा निर्णय घेतला आहे.
- यासंदर्भात पहिली बैठक न्यूयॉर्कमध्ये पुढील आठवड्यात होईल.
- आयर्लंडशी द्विपक्षीय संबंध व सहकार्य बळकट करण्यासाठी मोदी यांचा हा दौरा आहे.
- 60 वर्षांनंतर आयर्लंडला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत.
- याआधी 1956 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी आयर्लंडला भेट दिली होती.
जेएनयू कुलगुरूपदी सुब्रह्मण्यम स्वामी :
- आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातकीर्त असलेल्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कुलगुरूपदी भाजपचे ज्येष्ठ नेते, अर्थतज्ज्ञ व माजी केंद्रीय मंत्री सुब्रह्मण्यम स्वामी यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
- जेएनयुचे विद्यमान कुलगुरू प्रा.एस.के.सोपोरी यांच्या कारकीर्दीची मुदत येत्या जानेवारी महिन्यात संपेल.
- रा.स्व.संघाच्या आग्रहामुळे पुण्यात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटच्या प्रमुखपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती झाली.