Current Affairs of 24 September 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (24 सप्टेंबर 2016)
पुणे विदयापीठ देशात दुसऱ्या क्रमांकावर :
- देशातील पारंपरिक विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यंदा दुसरा क्रमांक पटकावला आहे.
- टाइम्स हायर एज्युकेशन संस्थेने जाहीर केलेल्या रँकिंकमध्ये पुणे विद्यापीठाने पंजाब विद्यापीठाबरोबर संयुक्तपणे दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे.
- देशातील सर्व आयआयटी आणि पारंपरिक विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठ नवव्या क्रमांकावर आहे.
- टाइम्स हायर एज्युकेशन संस्थेतर्फे जगभरातील विद्यापीठांसह भारतातील विद्यापीठांचे रॅकिंग केले जाते.
- तसेच गेल्या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह देशभरातील पारंपरिक विद्यापीठांचे रँकिंग जाहीर करण्यात आले होते. त्यात प्रथम क्रमांकावर जाधवपूर विद्यापीठ आणि द्वितीय क्रमांकावर पंजाब विद्यापीठ होते. तर, तिसऱ्या क्रमांकावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ होते.
- टाइम्स हायर एज्युकेशन संस्थेने मार्च 2016 मध्ये 150 विविध मुद्द्यांवर माहिती मागवली होती.
- तसेच, जागातिक स्तरावरील नामांकित जर्नलमध्ये विद्यापीठामधील प्राध्यापकांचे रिसर्च पेपर आणि रिसर्च पेपरचा दर्जा यांचा आढावा टाइम्स हायर एज्युकेशनने घेतला.
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत 600 ते 800 च्या दरम्यान आहे.
- विद्यापीठाची अध्यापन पद्धती, औद्योगिक कंपन्यांचे विद्यापीठाशी असणारे संबंध, विद्यार्थी व प्राध्यापकांचे संशोधनातील योगदान विचारात घेऊन विद्यापीठाचे रँकिंग निश्चित करण्यात आले आहे.
Must Read (नक्की वाचा):
एक हजार विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण :
- नेहमी पुस्तकाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना शाळांमध्ये धडे शिकविण्याच्या पद्धतीला बाजूला सारून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी (दि.21) जोगेश्वरीच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘हायटेक’ क्लास घेतला.
- निमित्त होते जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना टॅब वाटपाचे.
- येथील बालविकास विद्यालय, श्रमिक विद्यालय, वासुदेव विद्यालयातील आठवीच्या एक हजार विद्यार्थ्यांना आदित्य यांच्या हस्ते टॅबचे वितरण करण्यात आले.
- माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात होणारे आमूलाग्र बदल होत आहेत.
- विद्यार्थ्यांना संगणकीय प्रणालीतून शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना आदित्य ठाकरे यांच्या हस्ते टॅबचे मोफत वितरण करण्यात आले.
- उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
- बदलत्या काळानुसार आपणही बदलले पाहिजे, असा सल्ला विद्यार्थ्यांना देतानाच आदित्य यांनी विद्यार्थ्यांमध्ये बसून टॅबचा वापर कसा करावा तसेच कुठल्या विषयाचा धडा कसा शोधावा? याचे प्रशिक्षणही दिले.
अमेरिका व भारतमध्ये ‘दोस्ती हाऊस :
- दोन देशांतील संबंध सुधारण्यासाठी विविध उपक्रम आंतरराष्ट्रीय पातळीवर राबविले जातात.
- अमेरिकन आणि भारतीय नागरिकांनी एकत्र येऊन विचारांची, माहितीची देवाण-घेवाण करावी यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात आले.
- तसेच यानिमित्ताने वांद्रे-कुर्ला संकुलात यूएस कौन्सुलेटमध्ये ‘दोस्ती हाऊस’ सुरू करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
- दोन्ही देशांतील व्यक्तींना एकत्र येण्यासाठी पूर्वी ज्या ठिकाणी अमेरिकन लायब्ररी होती त्या ठिकाणी हे ‘दोस्ती हाऊस’ तयार करण्यात आले आहे.
- या ठिकाणी काही बदल करून तयार करण्यात आलेल्या या हाऊसमध्ये दोन्ही देशांतील नागरिक एकत्र येऊन शिकू शकतात, कला सादर करू शकतात.
- या पद्धतीने अमेरिकेने 169 देशांत अशाप्रकारे 700 जागा निर्माण केलेल्या आहेत. त्याच धरतीवर हे हाऊस उभारण्यात आले आहे.
- हाऊसमध्ये महत्त्वाची एक बाब म्हणजे लायब्ररी तयार करण्यात आली आहे.
- ‘ट्रॅडिशनल लायब्ररी’त 10 हजार पुस्तके, 700 चित्रपट आणि 130 पिरी ऑडिकल्स उपलब्ध आहेत.
पतधोरण समितीवर तीन जणांची नियुक्ती :
- रिझर्व्ह बँकेचे धोरणात्मक व्याजदर काय असावेत, हे ठरविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पतधोरण समितीवर (एमपीसी) सरकारने तीन सदस्यांची नेमणूक केली.
- रिझर्व्ह बँकेच्या नामित सदस्यांसह व्याजदर ठरविण्याचे काम हे सदस्य करतील.
- महागाईचा दर 4 टक्क्यांवर ठेवण्याचे उद्दिष्ट सरकारने रिझर्व्ह बँकेला दिले.
- तसेच त्यानुसार, व्याजदर ठरविण्याचे आव्हान समितीसमोर असेल.
- रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखाली या समितीवर प्रा. चेतन घाटे (भारतीय सांख्यिकी संस्था), पामी दुआ (संचालक, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स) व प्रा. रवींद्र एच. ढोलकिया (आयआयएम अहमदाबाद) यांच्या नेमणुका सरकारने केल्या आहेत.
केंद्र सरकारची 50 ऑलिम्पिक पदकांसाठी योजना :
- केंद्र सरकारचे ‘थिंक टँक’ असलेल्या नीती आयोगाने 2014 च्या ऑलिम्पिकमध्ये किमान 50 पदके जिंकण्यासाठी ठोस योजना आखली आहे.
- विविध राज्यांत विश्व दर्जाचे प्रतिभावान खेळाडू असताना देखील खेळात चॅम्पियन ठरावेत असे खेळाडू तयार होऊ न शकल्याबद्दल निराशा दर्शवित नीती आयोगाने नव्याने काम सुरू करण्याचे संकेत दिले. यासाठी प्रत्येक स्तरावर सर्वंकष प्रयत्न केले जातील.
- कुटुंब, समाज, शाळा, क्षेत्रीय अकादमी, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये क्रीडा आयोजनापासून स्पर्धांच्या दर्जांवर भर देण्यात येणार आहे.
- अशा प्रयत्नांमधून खेळातील अडथळे दूर होतील, याबद्दल आशावाद देखील व्यक्त करण्यात आला आहे.
- खेळात करिअर बनविणे व्यक्ती आणि राष्ट्राच्या कसे हिताचे आहे, हे समजावून सांगण्यावर नीती आयोगाचा पुढील काळात भर असेल.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा