Current Affairs (चालू घडामोडी) of 25 April 2015 For MPSC Exams
Current Affairs On (25 April 2015) In English :
Commercial Court Approved The Installation :
- Cabinet Professional Court ( Commercial Court ) has approved to be established.
- The government has announced to set up to solve the dispute -business disputes independent court.
- In business to dispute or court will be decided within 90 days.
- Business appointment and tenure of judges of the Court shall be 2 years old.
- There are currently 16 across the country fell to 884 thousand cases pending business.
- And will not cooperate with the investigation and prosecution and punishment to the party inquiries.
Yutiesa Mobile Ticket App Updates :
- Yutiesa mobile ticket app has been updated to the Ministry of Railways.
- This app will be unreserved railway ticket is saved the trouble to draw even easier to stay in the ranks to stand.
- And has been taken based on the GPS system for this app.
China And Pakistan Signed 51 :
- Jinping Chinese President said the agreement with Pakistan 51 Pakistan meeting.
- If billions of dollars and it is the financial agreement will Corridor from Kashmir side effect of the way the agreement is to increase China’s neighbors in the region.
- 3 thousand km The length of the Pakistan – China formally inaugurated with President Jinping said China Economic Corridor.
- Pakistan ”Nishan- e-Pakistan” the highest civilian honor awarded by the President of Pakistan to mamanuna Hussain Jinping.
2015 Pulitzer Prize Declared:
- Pulitzer Prize in journalism is going to be given to the surety.
- New York Times has won the Pulitzer Prize three of 2015.
- The New York Times got ibolacompanion of reporting for West Africa Awards International reporting Los Angeles Times article also criticized lekhabaddala won two awards.
- Besides the US, the Wall Street Journal and Washington each received a prize posta.
‘Umar 1’ Terrorist Organization Tehrik Taliban’s Test :
- ‘Umar 1’ or self missile traciteharike Taliban Pakistan or Pakistani terrorist organization has been test.
- ‘Umar 1’ Main Specifications –
- This missile is immediately match circumstances and can separate his portion.
“Eunuchs Individuals Rights – 2014″ Bill In The Rajya Sabha Approval:
- “Eunuchs individuals rights – 2014” bill was approved by the Rajya Sabha to voice vote.
- This bill was Eunuchs rescue the country’s legal right to receive common as citizen.
- DMK leader Tiruchi Siva said that the bill was presented on February 27.
- 45 years a private bill is approved by the Rajya Sabha.
- Features bill –
- Bill of rights Eunuchs of 10 cases and 58 clauses.
- This Eunuchs carry basically right, the National Commission found them, he suffered instructions to legally shield, Eunuchs children’s education and jobs on the national level to set policy To provide, to give students the right to education children Eunuchs general, and to give them the tools of self-employment, education, social security, and other important provisions are the exchange to establish a separate employment center.
The Chairman Of The National Committee Chandrasekhar Rao’s choice :
- Telangana Rashtriya Samiti (TRS ) president of Chandrasekhar Rao was elected again.
Online Visa Facilities For Hindus In Pakistan :
- The government has started the online visa facilities to minority Hindus in India and Pakistan.
- Pakistani Hindus were forced to sign papers in India already.
- Will continue to submit documents to the facility by 1 August 2015.
- Then that would be the use of the online facility.
Indiko Remedies Chairman Suresh Way The Lifetime Achievement Award :
- S version of the well-known businessman and sixth anniversary way indiko Remedies Chairman of Goa plebiscite was awarded the honor of the people.
- Goa Chief Minister Pratap Singh Rane Laxmikant Parsekar and the opposition, has been awarded the Lifetime Achievement Award.
- The ceremony Modern Digi zone ( industry ) , Parag Rangnekar (Environment), Shraddhanand School ( Education), b Service Center ( community service ) puspagraja ( literature) gajendranatha haladanakara ( art and culture) and Vision Care Hospital ( health) of
- Performance of the sector has been pronounced their glory and honor award plebiscite.
Discretion Became The Idol Of The US Surgeon General:
- The US Surgeon General became the idol of the American conscience.
- US public health officials were in charge of discrimination with the image of the young with the post.
- This 19th US Surgeon General are idols.
Must Read (नक्की वाचा):
चालू घडामोडी (25 एप्रिल 2015) मराठी :
व्यावसायिक न्यायालय स्थापनेस मंजुरी :
- केंद्रीय मंत्रिमंडळाने व्यावसायिक न्यायालय (कमर्शियल कोर्ट) स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे.
- केंद्र सरकारने व्यावसायिक वाद-विवाद सोडवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
- आत व्यावसायिक वाद-विवादांबाबत या न्यायालयाअंतर्गत 90 दिवसांच्या आत निर्णय देण्यात येणार आहे.
- व्यावसायिक न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती आणि कार्यकाळ 2 वर्षांचा असेल.
- देशभरात सध्या 16 हजार 884 व्यावसायिक खटले प्रलंबित पडले आहेत.
- तसेच तपास आणि चौकशीस सहकार्य न करण्याऱ्या पक्षावर दंड आणि कारवाई करण्यात येणार आहे.
युटीएस मोबाइल तिकिट अॅप अपडेट :
- युटीएस मोबाइल तिकिट अॅप रेल्वे मंत्रालयाकडून अपडेट करण्यात आले आहे.
- या अॅपद्वारे रेल्वेचे अनारक्षित तिकीट काढणे अगदी सोपे होणार असून रांगांमध्ये उभे राहाण्याच्या त्रास वाचणार आहे.
- तसेच या अॅपसाठी जीपीएस सिस्टिमचा आधार घेण्यात आला आहे.
चीनने केले पाकिस्तानशी 51 करार :
- चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी पाकिस्तान भेटीत पाकिस्तानशी 51 करार केले.
- तसेच त्यात अब्जावधी डॉलरचा आर्थिक कॉरिडॉरचा करारही आहे तर या कराराचा मार्ग पाकव्याप्त काश्मीरमधून जाणार असल्याने या भागात भारताच्या शेजारी चीनचा प्रभाव वाढणार आहे.
- 3 हजार कि.मी. लांबीच्या पाक – चीन आर्थिक कॉरिडॉरचे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी औपचारिक उद्घाटन केले.
- पाकिस्तानचा ‘निशान-ए-पाकिस्तान’ हा सर्वोच्च नागरी सन्मान पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुसेन यांनी जिनपिंग यांना प्रदान केला.
2015 चे पुलित्झर पुरस्कार जाहीर :
- पत्रकारिता क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्याना पुलित्झर पुरस्कार देण्यात येतो.
- न्यूयॉर्क टाइम्सने 2015 चे तीन पुलित्झर पुरस्कार पटकावले आहेत.
- इबोलाच्या साथीबद्दलच्या वृत्तांकनासाठी पश्चिम आफ्रिकेतील न्यूयॉर्क टाइम्सला आंतरराष्ट्रीय वृत्तांकनाचा पुरस्कार मिळाला.
- लॉस एन्जल्स टाइम्सने लेख तसेच टीकात्मक लेखाबद्दल दोन पारितोषिके पटकावले आहेत.
- याशिवाय अमेरिकेतील दि वॉल स्ट्रीट जर्नल आणि वॉशिंग्टन पोस्टलाही प्रत्येकी एक पारितोषिक मिळाले.
‘उमर 1’ ची तेहरिके तालिबान दहशतवादी संघटनेकडून चाचणी :
- ‘उमर 1’ या स्वनिर्मित क्षेपणास्त्राची तेहरिके तालिबान पाकिस्तान या पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेकडून चाचणी घेतण्यात आली आहे.
- ‘उमर 1’ची प्रमुख वैशिष्ट्य
- परिस्थितीनुसार हे क्षेपणास्त्र तत्काळ जुळविताही येते आणि त्याचे भागही वेगळे करता येतात.
“तृतीयपंथीय व्यक्तींचे हक्क – 2014” विधेयकास राज्यसभेत मंजूरी :
- “तृतीयपंथीय व्यक्तींचे हक्क – 2014” विधेयक राज्यसभेने आवाजी मतदानाने मंजूर कराण्यात आले.
- तृतीयपंथीयांनाही देशाच्या सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच कायदेशीर अधिकार मिळावेत त्यासाठीचे हे विधेयक होते.
- हे विधेयक द्रमुकचे नेते तिरूची सिवा यांनी 27 फेब्रुवारीला सादर केले होते.
- राज्यसभेने तब्बल 45 वर्षांनी एखादे खासगी विधेयक मंजूर केले आहे.
- विधेयकातील ठळक वैशिष्ट्ये
- तृतीयपंथीयांच्या हक्कांबाबतच्या या विधेयकात 10 प्रकरणे व 58 कलमे आहेत.
- यात तृतीयपंथीयांना मुळात जगण्याचा अधिकार मान्य करणे, त्यांच्यासाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करणे, त्यांना त्रास देणाऱ्यांना कायदेशीररीत्या शिक्षा करणे, तृतीयपंथीयांच्या मुलांच्या शिक्षण व नोकऱ्यांसाठी देशपातळीवर धोरण आखून तरतूद करणे, तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना सामान्य मुलांबरोबर शिक्षणाचा हक्क देणे, त्यांना स्वयंरोजगाराची साधने व शिक्षण देणे, सामाजिक सुरक्षा, वेगळे रोजगार केंद्र विनिमय स्थापणे आदी महत्त्वाच्या तरतुदी आहेत.
राष्ट्रीय समितीच्या अध्यक्षपदी के. चंद्रशेखर राव यांची निवड :
- तेलंगणा राष्ट्रीय समितीच्या (टीआरएस) अध्यक्षपदी के. चंद्रशेखर राव यांची पुन्हा निवड करण्यात आली.
पाकिस्तानमधील हिंदूंसाठी ऑनलाइन व्हिसा सुविधा :
- केंद्र सरकारने पाकिस्तानमधील अल्पसंख्याक हिंदूंना भारतामध्ये येण्यासाठी ऑनलाइन व्हिसा सुविधा सुरू केली आहे.
- पाकिस्तानमधील हिंदूंना यापूर्वी भारतामध्ये प्रवेश करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागत होती.
- 1 ऑगस्ट 2015 पर्यंत कागदपत्रे जमा करून सुविधा सुरू राहणार आहे.
- त्यानंतर केवळ ऑनलाइन सुविधेचा वापर करता येणार आहे.
इंडिको रेमेडिजचे चेअरमन सुरेश कारे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान :
- लोकमतच्या गोवा आवृत्तीच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्ताने सुविख्यात उद्योगपती आणि इंडिको रेमेडिजचे चेअरमन सुरेश कारे यांना लोकमत गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.
- गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि विरोधीपक्षनेते प्रताप सिंह राणे यांनी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले.
- या सोहळ्यात मॉडर्न डिजी झोन (उद्योग), पराग रांगणेकर (पर्यावरण), श्रद्धानंद विद्यालय (शिक्षण), गो सेवा केंद्र (समाज सेवा) पुष्पाग्रज(साहित्य) गजेंद्रनाथ हळदणकर (कला आणि संस्कृती) आणि व्हिजन केअर हॉस्पिटल (आरोग्य) यांचा त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल लोकमत गौरव पुरस्काराने सन्मान केला गेला.
विवेक मूर्ती बनले अमेरिकेचे सर्जन जनरल :
- भारतीय अमेरिकन विवेक मूर्ती हे अमेरिकेचे सर्जन जनरल बनले.
- अमेरिकेतील सार्वजनिक आरोग्याचे इन्चार्ज असणारे विवेक मूर्ती या पदावर असणारे सर्वात तरुण अधिकारी ठरले आहेत.
- मूर्ती हे अमेरिकेचे 19 वे सर्जन जनरल आहेत.