Current Affairs of 25 April 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (25 एप्रिल 2016)

सलमान खान रिओ ऑलिम्पिकचा ब्रॅन्ड अॅम्बॅसिडर :

  • भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) रिओ ऑलिंपिकसाठी सदिच्छा दूत म्हणून अभिनेता सलमान खान याची निवड केली.
  • तसेच त्याचे नाव समारंभपूर्वक जाहीर करण्यात आले. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्याऐवजी सलमानला पसंती देण्यात आली.
  • या दोन अभिनेत्यांच्या तुलनेत तरुणांशी जास्त जवळचे नाते आणि क्रीडाप्रेमी अशी प्रतिमा यामुळे सलमानच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
  • सलमान 50 वर्षांचा असून, देशभरात बॉडीबिल्डिंग करणाऱ्यांसाठीही तो प्रेरणास्थान आहे.
  • सुलतान या आगामी चित्रपटात त्याने कुस्तीपटूची भूमिका केली आहे.
  • लहान गावातून आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळविणाऱ्या स्पर्धकाची कथा यात आहे.
  • आयओए मुख्यालयात (दि.22) झालेल्या कार्यक्रमात महिला बॉक्‍सर एम. सी. मेरी कोम, हॉकी कर्णधार सरदार सिंग, रितू राणी, नेमबाज अपूर्वी चंडेला, तिरंदाज दीपिका कुमारी, टेबल टेनिसपटू मनिका बात्रा असे नामवंत क्रीडापटू उपस्थित होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 एप्रिल 2016)

राज्यातील 32 हजार शाळांचे डिजिटलायझेशन :

  • जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाने लोकसहभागातून फळा आणि खडूविना सुरू केलेल्या डिजिटल स्कूल शाळेची संकल्पना ‘डिजिटल कार्यप्रेरणा व कार्यशाळेच्या माध्यमातून’ राज्यभर पसरली आहे.
  • राज्यातील 32 हजार 342 शाळांचे डिजिटलायझेशन झाले, त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील 309 शाळांचा समावेश आहे.
  • शहापूर तालुक्यातील पष्टेपाडा या शाळेतील शिक्षक संदीप गुंड यांनी लोकसहभागातून पहिली डिजिटल शाळा सुरू करून त्याद्वारे मुलांना शिक्षण देण्याचा आगळावेगळा प्रयोग यशस्वी केला.
  • तसेच त्यामुळे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यापासून 30 किलोमीटर दूर असलेल्या पष्टेपाडा या आदिवासी दुर्गम भागातील मुले टॅबद्वारे शिक्षण घेत आहेत.
  • तसेच या उपक्रमाची दखल घेत राज्य सरकारने संपूर्ण राज्यातील शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
  • त्यानुसार, शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल कार्यप्रेरणा व कार्यशाळेच्या माध्यमातून राज्यातील 33 जिल्ह्यांत गुंड यांनी 67 कार्यशाळांमधून तेथील शिक्षकांना डिजिटल शाळेची संकल्पना काय आहे, ती कशी राबवली जाते, त्याचे महत्त्व काय? हे पटवून दिले.
  • त्यासाठी कसे वातावरण असावे, कोणकोणती साधने वापरावीत तसेच आपल्याकडे असलेल्या साधनसामग्रीचा प्रभावीपणे कसा वापर करता येतो, याचे मार्गदर्शन केले.

पतंजलीला ‘सीआयएसएफ’ चे सुरक्षा कवच :

  • योगगुरू रामदेवबाबा यांच्या मालकीच्या हरिद्वारमधील पतंजली फूड पार्कच्या सुरक्षेची जबाबदारी आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) सोपविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
  • रामदेव यांच्या पतंजली फूड पार्कच्या भोवती ‘सीआयएसएफ’च्या सुमारे 34 सशस्त्र कमांडोंचा 24 तास खडा पहारा असणार आहे.
  • देशातील इन्फोसिससारख्या अगदी बोटावर मोजता येतील येवढ्याच खासगी क्षेत्रातील उद्योगांना केंद्राकडून ‘सीआयएसएफ’ची सुरक्षा पुरविण्यात येते, त्यात आता रामदेव यांच्या पतंजली फूड पार्कचा समावेश झाला आहे.
  • सहायक कमांडंट दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ‘सीआयएसएफ’च्या 34 कमांडोंचे पथक पतंजली फूड पार्कच्या सुरक्षेसाठी 24 तास तैनात करण्यात आले आहे.
  • केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर 22 मार्चपासून पंतजलीच्या फूड पार्कला ‘सीआयएसएफ’कडून सुरक्षा पुरवली जात आहे.
  • पतंजली फूड पार्क आणि हर्बल पार्क लिमिटेडकडून ‘सीआयएसएफ’च्या सैनिकांसाठी राहण्याची सुविधा पुरविण्यात आली असून, या सुरक्षेचा खर्चही दिला जाणार आहे.

जागतिक बॅंकेकडून जलसंकटावर उपाययोजना :

  • दुष्काळाच्या झळा कायम झेलणाऱ्या मराठवाडा व पश्‍चिम विदर्भातील तब्बल 6000 गावांचा जलसंधारणाच्या माध्यमातून सर्वसमावेशक उपायांनी अक्षरशः कायापालट करण्याबाबत एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी राज्य सरकारने जागतिक बॅंकेबरोबरचा एक करार अंतिम टप्प्यात आणला आहे.
  • राज्याला तातडीच्या योजनेअंतर्गत जागतिक बॅंक 5000 कोटींचा कर्जपुरवठा करण्यास तयार आहे व या योजनेतून या संपूर्ण परिसरावरचे जलसंकट दूर होऊ शकते, असे माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
  • राज्यातील यंदाचा भीषण दुष्काळ व त्याअनुषंगाने केलेल्या उपाययोजनांबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी उजनी व जायकवाडीसह 5 मोठ्या धरणांतील प्रचंड गाळ काढणे, बेकायदा वीज कनेक्‍शनवर धडक कारवाई करणे, उसाची शेती ठिबक सिंचनावर आणण्याबाबत उत्पादकांची मानसिकता तयार करणे, पाणीचोरी रोखणे, अशा अनेक उपाययोजनाचा उल्लेख केला.
  • राज्यात गेल्या काही वर्षांत ठेकेदारी केंद्रित व कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारे मोठमोठे सिंचन प्रकल्प राबविले गेले; पण जलसंधारणाच्या अत्यंत दूरगामी पण ‘छोट्या’ कामांना टाळेच लावले गेले, असेही निरीक्षण त्यांनी नोंदविले.
  • जागतिक बॅंकेच्या माध्यमातून मराठवाड्यातील निम्म्या म्हणजे 4000 गावांसाठी व पश्‍चिम विदर्भातील 2000 गावांसाठी जलसंधारणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविला जाणार असल्याचे सांगताना फडणवीस यांनी हा करार अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले.
  • तसेच यासाठी बॅंकेने तात्त्विक मान्यता मागेच दिली व तापमानबदल निधीतून व तुलनेने अतिशय जलद म्हणजे केवळ दीड वर्षात कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचेही ते म्हणाले.

1 मेपासून ‘वन एम्प्लॉई, वन ईपीएफ अकाऊंट’ ही योजना :

  • एकापेक्षा जास्त खाती आणि मुदतपूर्व पैसे काढण्यापासून कर्मचाऱ्यांचे मन वळविण्यासाठी प्रॉव्हिडंट फंड विभागातर्फे लवकरच येत्या 1 मेपासून ‘वन एम्प्लॉई, वन ईपीएफ अकाऊंट’ ही योजना सुरू करण्यात येणार आहे.
  • प्रॉव्हिंडट फंड विभागाच्या 21 एप्रिल रोजी झालेल्या अंतर्गत बैठकीत ‘वन एम्प्लॉई, वन ईपीएफ अकाऊंट’ या योजनेचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • तसेच या योजनेंतर्गत राज्य सरकार व राज्य सरकारांच्या अखत्यारीतील स्थानिक स्वराज्य संस्थांसारख्या विविध शासकीय सेवांमधील कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिंडट फंड सेवेमध्ये समाविष्ट करण्याच्या दृष्टीने विभागातर्फे अधिक सक्रियपणे काम होणार आहे.
  • प्रॉव्हिडंट फंड विभागाचे केंद्रीय आयुक्त व्ही.पी. जॉय यांनी सांगितले की, बहुतांश वेळा लोक नोकरी बदलताना प्रॉव्हिडंट फंडातील पैसे काढून घेतात.
  • नोकरी बदलली अथवा अन्य काही कारणासाठी मुदतपूर्व पैसे काढण्यापासून त्यांना परावृत्त करण्याच्या दृष्टीने विभागातर्फे विशेष व्यवस्था निर्माण केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर :

  • मराठी व बॉलीवूड इंडस्ट्री गाजविणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिला न्यूयॉर्कमधील ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय श्रेणीतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
  • ‘मॅडली’ या शॉर्टफिल्ममधील भूमिकेसाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे.
  • सहा दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या शॉर्ट फिल्मच्या ‘मॅडली’ या 20 मिनिटांच्या भागात राधिका झळकली आहे. राधिकाने मराठीमध्ये लय भारी, तुकाराम, पोस्टकार्ड तर बॉलीवूडमध्ये शोर इन दि सिटी, मांझी:द माउंटन मॅन, बदलापूर, तरअहल्यासारख्या शॉर्टफिल्मने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिल्म फेस्टिव्हलमध्येही तिची दखल घेतली गेली.
  • ‘ट्रिबेका’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये एखाद्या भारतीय अभिनेत्रीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • तसेच या फिल्म फेस्टिव्हलसाठी जगभरातून हजारो फिल्म्स पाठवल्या जातात.

दिनविशेष :

  • 1874 : गुग्लियेमो मार्कोनी, इटलीचा संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ, रेडिओ संशोधक यांचा जन्म.
  • ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड ऍन्झाक दिन.
  • पोर्तुगाल क्रांती दिन.
  • इटली फेस्ता देला लिबरेझियोन (स्वातंत्र्य दिन).
  • फेरो द्वीपसमूह स्वाझीलँड ध्वज दिन.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 एप्रिल 2016)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago