चालू घडामोडी (25 एप्रिल 2017)
के. विश्वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर :
- भारतीय चित्रपटसृष्टीत अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार हिंदीबरोबरच दाक्षिणात्य इंडस्ट्रीत मोलाची कामगिरी करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते के. विश्वनाथ यांना जाहीर झाला आहे.
- नवी दिल्लीत तीन मे रोजी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. दहा लाख रुपये रोख, सुवर्ण कमळ आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- चित्रपटसृष्टीत मोलाची कामगिरी करणाऱ्या तंत्रज्ञ, तसेच कलाकारांना भारत सरकारतर्फे दरवर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो.
- सन 2015 चा पुरस्कार मनोज कुमार यांना मिळाला होता. आता सन 2016 च्या दादासाहेब फाळके पुरस्काराचे मानकरी के. विश्वनाथ ठरले आहेत.
- के. विश्वनाथ यांना यापूर्वी पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार व अकराहून अधिक फिल्म फेअर पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. तसेच 1992 मध्ये त्यांचा पद्मश्रीने सन्मान करण्यात आला आहे.
मलेरियाच्या पहिल्या लसीकरणासाठी आफ्रिकेची निवड :
- मलेरियाला प्रतिबंध करण्यासाठी तयार केलेली जगातील पहिली लस घाना, केनिया आणि मलावी या आफ्रिका खंडातील तीन देशांमध्ये दिली जाणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) जाहीर केले. या तीन देशांमध्ये मलेरियाचा धोका अधिक असून, पुढील वर्षीपासून या लसीची प्रायोगिक स्तरावर चाचणी सुरू होणार आहे.
- अद्यापही डॉक्टरांपुढे मलेरियाचे मोठे आव्हान असून, जगभरात या रोगामुळे दरवर्षी वीस कोटी जण आजारी पडतात. यापैकी पाच लाख जणांचा मृत्यू होतो. मृतांमध्ये बहुतांश जण आफ्रिकेतील लहान मुले असतात.
- मलेरिया पसरण्यास कारणीभूत असलेल्या डासांपासून संरक्षण करण्यासाठी येथे मच्छरदाणी आणि डास मारण्याचा फवारा असे दोन उपाय योजले जातात, त्यामुळे ग्लॅक्सो स्मिथ क्लिन या कंपनीने आरटीएस (अथवा मॉस्क्युरिक्स) ही लस तयार केली आहे.
- तसेच ही लस हा मलेरियावरील अंतिम उपाय नसला तरीही योग्य काळजी घेत त्याचा वापर केल्यास हजारो जणांचे आयुष्य वाचविण्याची लसीची क्षमता आहे, असे ‘डब्लूएचओ’चे विभागीय संचालक डॉ. मात्शिदिसो मोएती यांनी सांगितले.
संरक्षण खर्चात भारताचा पाचवा क्रमांक :
- संरक्षणावर 2016 मध्ये सर्वाधिक खर्च करणाऱ्या पहिल्या 15 देशांत भारताचा पाचवा क्रमांक असून, या अवधीत भारताच्या संरक्षणावरील खर्चात 8.5 टक्के वाढ झाली आहे, असे स्टॉकहोमस्थित इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.
- या अहवालानुसार भारताने 2016 मध्ये संरक्षणासाठी एकूण 55.9 अब्ज डॉलर खर्च केले. पहिल्या पंधरात पाकिस्तान नाही. पाकिस्तानने 2016 मध्ये 9.93 अब्ज डॉलरचा खर्च केला.
- भारताच्या संरक्षण खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. 2016 मध्ये अमेरिकेच्या संरक्षण खर्चात 1.7 टक्के, तर चीनच्या खर्चात 5.4 टक्के वाढ झाली आहे.
- 2016 मध्ये जगभरातसंरक्षणावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या पाच देशांत अमेरिका, चीन, रशिया, सौदी अरब आणि भारताचा समावेश आहे.
इस्त्रोकडून ‘शुक्र मिशन’ची तयारी सुरू :
- आपल्या ग्रहमालेतील ‘शुक्र’ या ग्रहाची रहस्ये उलगडण्यासाठी भारताने तेथे यान पाठविण्याची योजना अद्याप प्राथमिक स्तरावर असली तरी भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) याची जय्यत तयारी सुरु केली असून ‘व्हिनस मिशन’मध्ये कोणते वैज्ञानिक प्रयोग करावेत याविषयीचे प्रस्ताव पाठविण्याचे देशभरातील वैज्ञानिकांना आवाहन केले आहे.
- ‘इस्रो’ने त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध केलेल्या माहितीनुसार ‘शुक्र’ ग्रहाच्या दिशेने पाठवायच्या उपग्रहाचे वजन अंदाजे 175 किग्रॅ एवढे असण्याची अपेक्षा असून त्यावर 500 वॉट वीज उपलब्ध असेल.
- तसेच हा उपग्रह 500 बाय 60 हजार किमी अंतराच्या लंबवर्तुळाकार कक्षेतून ‘शुक्रा’भोवती घिरट्या घालेल. काही महिन्यांनी ही कक्षा कमी होईल.
दिनविशेष :
- 25 एप्रिल 1740 हा मराठा साम्राज्याचे पेशवे थोरले बाजीराव पेशवे यांचा स्मृतीदिन आहे.
- प्रसिध्द सुएझ कालव्याच्या बांधकामास 25 एप्रिल 1859 मध्ये सुरुवात झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा