चालू घडामोडी (25 जून 2015)
आयआयटी खरगपूर संस्थेत एमबीबीएसचा अभ्यासक्रम सुरू केला जाणार :
- आयआयटी खरगपूरची ओळख नामवंत अभियंत्यासाठी असली तरी लवकरच या प्रतिष्ठित संस्थेत एमबीबीएसचा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.
- आयआयटी कॅम्पसला लागून असलेल्या तीन एकर भूखंडावर 400 खाटांचे सुपर स्पेशिलिस्ट हॉस्पिटल उभारले जाणार असून तेथे डॉ. बी.सी.रॉय वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्था 2017 च्या अखेरीस पूर्णत्वात येईल.
- सरकारने या संस्थेसाठी गेल्या वर्षी 230 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या संस्थेत एमबीबीएससारखे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मेडिकल कॉन्सिलची (एमसीआय) परवानगी मागण्यात आली आहे.
- आयआयटी खरगपूर ही संस्था अभियांत्रिकी अभ्यासासाठी जगात प्रसिद्ध असून वैद्यकीय शिक्षणात प्रवेश करणारी ही पहिली आयआयटी संस्था ठरणार आहे.
- स्थानिक रुग्णांची सेवा करण्यासह हे रुग्णालय जैववैधिक, क्लिनिकल आणि अन्य संशोधनाचे कार्य सुरू करेल. औषधांचे डिझाईन आणि पुरवठा यासारख्या महत्वपूर्ण क्षेत्रातील संशोधनातही हे रुग्णालय योगदान देणार आहे.
सिस्टर निर्मला जोशी यांचे निधन :
- नोबेल पुरस्कार विजेत्या मदर तेरेसांचा वारसा पुढे चालविणार्या व कोलकत्ता येथील धर्मादास मिशनरीच्या माजी प्रमुख सिस्टर निर्मला जोशी यांचे 23 जून रोजी हृदयाच्या झटक्याने निधन झाले.
- त्या 81 वर्षांच्या होत्या.
- मदर तेरेसा यांच्या कार्याने प्रभावित होऊन निर्मला जोशी यांनी रोमन कॅथलिक धर्माचा स्वीकार केला होता.
- मदर तेरेसायांचा वारसा पुढे नेणार्या निर्मला यांच्याकडे 1997 मध्ये मिशनरीज ऑफ चॅरीटीजचे प्रमुखपद सोपविण्यात आले होते.
- केंद्र सरकारने 2009 मध्ये त्यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले होते.
चीनने नथुराम खिंडीचा मार्ग केला खुला :
- चीनने कैलास मानसरोवर यात्रेला जाण्यासाठी दूसरा मार्ग खुला केला असून हा मार्ग तिबेटमार्गे नथुराम खिंडीतून जातो.
- पहिली तुकडी 23 जूनला या मार्गावरून रवाना झाली.
- हिमालयातील सिक्कीम नथुला मार्ग समुद्र सपाटीपासून 4 हजार मीटरवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौर्यात हा मार्ग खुला करण्याची घोषणा करण्यात आली होती.
- चीनचे भारतातील राजदूत लिपुलकेश ले येचुंग भारतीय सीमेवरून प्रथमच या मार्गावर आले. या मार्गावर येणारे ते पहिले चीनी अधिकारी ठरले.