Current Affairs of 25 June 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (25 जून 2016)

राजकोटला ‘नॅशनल अर्थ अवर कॅपिटल’ पुरस्कार जाहीर :

  • कार्बनचे उत्सर्जन कमी करण्याबरोबर नवीकरणीय ऊर्जा वापरास दिलेले प्राधान्य यामुळे गुजरातमधील राजकोट शहराला “नॅशनल अर्थ अवर कॅपिटल-2016” पुरस्कारने गौरविण्यात आले आहे.
  • “वर्ल्ड वाइल्ड फंड फॉर नेचर”च्या (डब्ल्यूडब्ल्यूएफ) वतीने आयोजित केलेल्या “ग्लोबल अर्थ अवर सिटी चॅंलेज” (ईएचसीसी) स्पर्धेत 21 देशांतील 125 शहरांचा सहभाग होता, त्यातून राजकोटची निवड करण्यात आली आहे.
  • हवामान बदलाविरोधात लढा देण्यासाठी दीर्घकालीन प्रयत्न करणाऱ्या शहरांची निवड ईएचसीसी स्पर्धेतून केली जाते.
  • यंदा राजकोटला हा मान मिळाला असून, विविध देशांतील इतर 17 शहरांनाही नॅशनल अर्थ अवर कॅपिटल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • तसेच या स्पर्धेत राजकोटशिवाय भारतातील 11 शहरांनीही सहभाग दर्शविला होता.
  • डब्ल्यूडब्ल्यूएफग्लोबल कन्सल्टन्सी असेंचरने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शहरांचे प्राथमिक मूल्यमापन केल्यानंतर यासाठी नेमण्यात आलेली 17 सदस्यांची निवड समितीने प्रत्येक देशातील एका शहराची नॅशनल अर्थ अवर कॅपिटलग्लोबल अर्थ अवर कॅपिटल या पुरस्कारांसाठी निवड करते.
  • तसेच या वेळी ग्लोबल अर्थ अवर कॅपिटल पुरस्कारासाठी समितीने फ्रान्सची राजधानी पॅरिस या शहराची निवड केली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 जून 2016)

25 जून हा भारतीय क्रिकेटमधील ऐतिहासिक दिवस :

  • 25 जून 1983 हा भारतीय क्रिकेटमधील ऐतिहासिक दिवस आहे.
  • भारताच्या या विश्वचषक विजयाला (दि.25) 33 वर्ष पूर्ण झाले आहेत.
  • भारताने एकापेक्षा एक सरस खेळाडूंनी भरलेल्या बलाढय वेस्ट इंडिजवर विजय मिळवून जागतिक क्रिकेटमध्ये भारताला एक नवी ओळख मिळवून दिली.
  • तसेच या विजयानंतर भारतात क्रिकेटच्या लोकप्रियतेचा जो प्रवास सुरु झाला तो आजही तसाच सुरु आहे.
  • या विश्वचषकाने फक्त भारतीय क्रिकेटलाच कलाटणी दिली नाही तर, क्रिकेटला एक नवा जगज्जेता मिळवून दिला तसचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांचे वर्चस्व कमी केले.
  • 1983 ची विश्वचषक स्पर्धा सुरुवातीपासून नाटयमय ठरली.
  • भारत, झिंम्बावे या तुलनेने दुबळया संघांनी साखळी फेरीत वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया या बलाढय संघांवर विजय मिळवत धक्कादायक निकालाची नोंद केली.

महाराष्ट्रात विशेष मोहिमेद्वारे स्वच्छता केली जाणार :

  • राष्ट्रीय उद्याने, प्राणिसंग्रहालये, अभयारण्ये, तसेच व्याघ्र प्रकल्पांमध्येही स्वच्छ भारत मोहीम राबविली जाणार आहे.
  • तसेच या विशेष मोहिमेसाठी देशभरातून निवडलेल्या दहा संरक्षित क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि फ्लेमिंगो अभयारण्य यांचा समावेश आहे.
  • सोबतच पर्यटन आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या शंभर स्थळांची विशेष मोहिमेद्वारे स्वच्छता केली जाणार आहे.
  • पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या दहा स्थळांमध्ये मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसचाही (सीएसटी) समावेश असेल.
  • वन आणि पर्यावरण खात्याचे सचिव अजय नारायण झा, तसेच स्वच्छता आणि पेयजल खात्याचे सचिव परमेश्‍वरन अय्यर यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
  • पर्यावरण मंत्रालयातर्फे एक ते 15 जून या कालावधीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते.

ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर :

  • जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा जनमताद्वारे घेतलेला निर्णय म्हणजे ब्रिटनला मिळालेले स्वांतत्र्यच मानले जात आहे.
  • मात्र जनमताचा कौल कळताच जगभरात अर्थकंप झाला.
  • भारतीय शेअर बाजार दणक्यात खाली आले, रुपया घसरला आणि सोन्याच्या किमतीत 2,000 रुपयांनी वाढ झाली.
  • शेअर बाजार आणि रुपयाच्या पडझडीतून भारतीय अर्थव्यवस्थेलाही काही झटके बसले असले, तरी या घटनेचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम तत्कालिक असून, भविष्याचा विचार करता ही घटना भारतीय अर्थकारणाच्या पथ्यावर पडणार असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.

राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या :

  • राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांसह 10 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
  • तसेच यात औरंगाबाद विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्यासह 10 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत.
  • पुणे सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेचे डीआयजी अजित पाटील यांची पदोन्नती होऊन औरंगाबादचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली.
  • महाराष्ट्र स्टेट सिक्‍युरिटी कॉर्पोरेशनचे संचालक कैसर खालिद यांची पदोन्नती होऊन पीसीआरला विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली.
  • औरंगाबाद विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
  • आयपीएस अधिकारी अमोघ गावकर यांची सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती, एसपीएस जी. एम. पाटील यांची नगरचे सहायक पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती, आयपीएस सुनील फुलारी यांची ‘एसआरपीएफच्या ग्रुप पुणे’चे कमांडंट म्हणून नियुक्ती करण्यात आली.
  • नागपूरच्या डीसीपी निर्मला देवी यांची पीसीआर नागपूरच्या पोलिस अधीक्षकपदी बदली, आयपीएस महेश घुर्ये यांची ‘एसआरपीएफच्या ग्रुप 8, मुंबइ’चे कमांडंट म्हणून नियुक्ती करण्यात आली.
  • भरत तांगडे यांची ‘एसआरपीएफच्या ग्रुप जालना’चे कमांडंट म्हणून नियुक्ती, पंजाबराव उगले यांची नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

रियो ऑलिम्पिक संघातून मेस्सीला वगळले :

  • ऑगस्टमध्ये होणाऱ्या रियो ऑलिम्पिकसाठी घोषित करण्यात आलेल्या अर्जेंटिना फुटबॉल संघात स्टार खेळाडू आणि आपल्या देशासाठी सर्वाधिक गोल करणाऱ्या लियोनेल मेस्सी याचा समावेश करण्यात आलेला नाही.
  • अर्जेटिनाचे प्रशिक्षक गेर्राडो मार्टिनो यांनी रियो ऑनलिम्पिकसाठी ज्या 22 सदस्यांच्या संघाची घोषणा केली आहे. त्यात मेस्सीचे नाव नाही.
  • ऑलिम्पिक संघात मेस्सीची निवड न करण्याचा आश्चर्यकारक निर्णय आहे.
  • मेस्सी कोपा अमेरिका चषकात सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने या स्पर्धेत पाच गोल केले.
    पाचवेळच्या वर्ल्ड फुटबॉलर ऑफ द ईअर मेस्सीने 55 वा आंतरराष्ट्रीय गोल करून अर्जेंटिनासाठी सर्वाधिक गोल करण्याचा मान मिळविला.
  • मेस्सीने 2008 च्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावले.
  • तसेच त्याने कोपा अमेरिका चषकात गॅब्रिएल बतिस्तुताचा विक्रम मोडला आहे.

दिनविशेष :

  • मोझांबिक स्वातंत्र्य दिन.
  • 1931 : विश्वनाथ प्रताप सिंग, भारतीय पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1975 : भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहिर केली.
  • 1983 : कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करून पहिला वर्ल्डकप जिंकला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 जून 2016)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago