Current Affairs (चालू घडामोडी) of 25 March 2015 For MPSC Exams
अ.क्रTable of Contents |
ठळक घडामोडी |
1. | 62 व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा |
2. | डॉ. माधव गाडगीळ यांना ‘टायलर पुरस्कार’ जाहीर |
3. | वादग्रस्त कलम ’66 अ’ रद्द |
62 व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा :
- दिल्लीत 62 व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
- चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित ‘कोर्ट‘हा चित्रपट सर्व भाषांमधील सर्वोकृष्ट चित्रपट ठरला आहे.
- तर रवी जाधव दिग्दर्शित ‘मित्रा‘ला सर्वोकृष्ट लघुपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
- मराठी भाषा श्रेणीत किल्ला हा सर्वोकृष्ट चित्रपट तर एलिझाबेथ एकादशी हा सर्वोकृष्ट बालचित्रपट ठरला.
- हिंदी चित्रपटांमध्ये ‘क्वीन‘ला सर्वोकृष्ट चित्रपट तर कंगणा राणावतला सर्वोकृष्ट अभिनेत्री पुरस्कार जाहीर झाला.
Must Read (नक्की वाचा):
डॉ. माधव गाडगीळ यांना ‘टायलर पुरस्कार’ जाहीर :
- ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ आणि केंद्र सरकारच्या पश्चिम घाट पर्यावरण अभ्यास समितीचे अध्यक्ष डॉ. माधव गाडगीळ यांना ‘टायलर पुरस्कार‘ जाहीर.
- पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘टायलर पुरस्कार‘ दिला जातो.
- तसेच अमेरिकी सागरी पर्यावरणतज्ज्ञ डॉ. लुबचेंन्को यांनाही हे परितोषिक जाहीर झाले आहे.
- दोन लाख अमेरिकी डॉलर असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- अमेरिका, भारत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संवर्धन आणि शाश्वत धोरणांच्या विकासासाठी कार्यरत राहिल्याबद्दल आणि त्यासाठी नेतृत्व केल्या बद्दल दोघांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
- इंटरनॅशनल टायलर प्राईझ एक्झिक्युटिव्ह कमिटी आणि अमेरिकेचा साऊथ कॅलिफोर्निया विद्यापीठाचा वतीने हा पुरस्कार दिला जातो.
- 24 एप्रिल रोजी या दोघांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
वादग्रस्त कलम ’66 अ’ रद्द :
- सोशल नेटवर्किंग साईट्सवर एखादी आशेपार्ह पोस्ट टाकण्याप्रकरणी दाखल करण्यात येणारे वादग्रस्त कलम ‘66 अ‘ रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला आहे.
- माहिती व तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत येणारे हे कलम रद्द करण्यात आले आहे.
दिनविशेष :
- 1904 – हिंदुस्थानात पहिला सरकार कायदा अस्तित्वात आला.
- 1983 – जगातील अत्याधुनिक सागरी संशोधन करणारी बोट ‘सागरी कन्या’ हिचे जलावरण.