Current Affairs of 25 May 2015 For MPSC Exams

यूपीएससी पूर्वपरीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ :
- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्वपरीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून प्रारंभ झाला.
- यावेळेस प्रथमच उमेदवारांना नागरी सेवा आणि भारतीय वन सेवा असे दोन वेगळे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून, या दोन्हीपैकी एक अथवा दोन्ही पर्याय निवडण्याची मुभा उमेदवारांना असणार आहे.
- तसेच याआधीच परीक्षा देण्याची निर्धारित मर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय लोकसेवा आयोगाने घेतला असून, यामध्ये 2011 मध्ये परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचाही समावेश असेल.
- यंदा 23 ऑगस्ट रोजी 71 केंद्रांवरील तीन हजार ठिकाणांवर पूर्वपरीक्षा घेतली जाणार असून, यासाठी परीक्षार्थींना केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज भरावे लागतील.
- लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरून उमेदवारांना आपले अर्ज भरता येतील.
Must Read (नक्की वाचा):
गणितज्ज्ञ जॉन नॅश यांचे अपघाती निधन :
- गणितज्ज्ञ जॉन नॅश यांचे आज अपघाती निधन झाले.
ते 86 वर्षांचे होते.
- निर्णय क्षमतेच्या अभ्यासासाठी (गेम थिअरी) 1994 मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल मिळविले होते.
- नॅश यांच्या आयुष्यावर आधारित “अ ब्युटिफुल माइंड” हा चित्रपट प्रचंड गाजला होता.
दिनविशेष :
- 1886 – क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचा जन्म.
- 1915 – राष्ट्रपिता महात्मा गांधीनी अहमदाबादजवळ साबरमती आश्रमाची स्थापना केली.