Current Affairs of 25 May 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (25 मे 2018)
कार्ल मार्क्सच्या हस्तलिखीतांचा लिलाव :
- जगात सर्वात जास्त ज्यांचे साहित्य वाचले गेले आणि जाते असे जागतिक विचारवंत म्हणजे कार्ल मार्क्स. यांच्या ‘दास कॅपीटल’ या जगप्रसिद्ध ग्रंथाच्या हस्तलिखीतांचा तब्बल 5.23 लाख डॉलरना (3.34 दशलक्ष युआन) लिलाव करण्यात आला.
- कार्ल मार्क्स यांची 200 वी जयंती निमित्ताने हा लिलाव करण्यात आला. 1850 ते 1853 या तीन वर्षाच्या काळात मार्क्स यांनी 1 हजार 250 पानी हस्तलिखीते लिहीली होती. त्यांनतर त्याचे ‘दास कॅपीटल’ ग्रंथामध्ये रुपांतर करण्यात आले.
- चिन मधील ‘फेंग लुन’ या उद्योगपतीने ही हस्तलिखीते लिलावासाठी उपलब्ध करून दिली. या ग्रंथाचे एकूण तीन खंड आहेत. त्यातील पहिला खंड 1867 मध्ये कार्ल मार्क्स यांच्या हयातील प्रसिद्ध झाला.
- 1883 मध्ये मार्क्स यांचा मृत्यू झाल्याने पुढील दोन खंड त्यांचा मित्र ‘फ्रेडरिक एंगेल्स’ आणि इतर सहकाऱ्यांनी मिळून प्रकाशीत केले. त्यातला दुसरा खंड 1885 आणि तिसरा 1894 मध्ये प्रकाशीत करण्यात आले. 19व्या शतकात या ग्रंथांमधील तत्त्वज्ञानाच्या आधारावर जगभरातील अनेक देशांमध्ये साम्यवादी राजवटींचा उदय झाला होता.
Must Read (नक्की वाचा):
देशातील सर्वोत्कृष्ट उद्योजिकांमध्ये श्वेता कुलकर्णीची निवड :
- भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि आयआयएम बेंगलोर यांनी जगभरातल्या हौशी खगोलप्रेमींना खगोलशास्त्राचे ऑनलाईन प्रशिक्षण देणाऱ्या पुण्याच्या श्वेता कुलकर्णीची देशातील सर्वोत्कृष्ट उद्योजिकांमध्ये निवड केली आहे.
- खगोलशास्त्राच्या प्रचार आणि प्रसारामध्ये गेली सहा वर्ष काम करणारी श्वेता ही देशातील सर्वोत्कृष्ट शंभर महिला उद्योजिकांपैकी एक ठरली आहे. आयआयएमबी अंतर्गत एनएसआरसीइएल मार्फत राबवल्या जाणाऱ्या ‘वूमन स्टार्टअप प्रोग्रॅम’ मध्ये भारतातील सात हजार महिला उद्योजिकांपैकी सर्वोत्कृष्ट शंभर महिला उद्योजिका निवल्या गेल्या.
- दोन टप्प्यांमध्ये झालेल्या या निवडीत महाराष्ट्रातून निवडल्या गेलेल्या दहा सर्वोत्कृष्ट महिलांपैकी पुण्यातून श्वेता ही एकमेव महिला आहे. या निवडीनंतर श्वेता नुकतीच बेंगलोर येथे प्रशिक्षण घेऊन आली आहे. तिच्या कामासाठी तिला आयआयएम नागपूर तसेच भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाकडून आर्थिक मदत आणि मार्गदर्शन मिळणार आहे.
- आपल्या देशात खगोलशास्त्र या विषयाबद्दल फारशी जागरूकता आढळून येत नाही त्यासाठी श्वेता जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. याविषयी बोलतांना श्वेता म्हणाली, ‘खगोलशास्त्र म्हणजे आपल्या भोवतालच्या भौतिक विश्वाचा अभ्यास, हे एक प्रचंड आणि आकर्षक आव्हान आहे.खगोलशास्त्र हा एक गुंतागुंतीचा आणि न कळणारा विषय आहे असे समजण्याचे कारण नाही.’
‘डेटामेल’ सेवा आता कोरियन भाषेतही उपलब्ध :
- डेटा एक्सचेंज टेक्नॉलॉजी या भारतीय आयटी कंपनीने कोरियासाठी ‘डेटामेल‘ ही ईमेल सेवा सुरू केली आहे. या डेटामेलचे वैशिष्ट्य असे की, या ईमेल सेवेवर स्थानिक भाषेतूनच ईमेल अॅड्रेस तयार करता येतील. दक्षिण कोरियातील सेऊल येथे या सेवेची नुकतीच घोषणा करण्यात आली.
- डेटामेल सेवेचे वैशिष्ट्य असे की, यापूर्वीही या कंपनीने स्थानिक भाषांमधून ईमेल अॅड्रेस तयार करण्याची सोय केली आहे. अरेबिक, रशियन, थाय आणि चीनी भाषांमधून ईमेल सेवा उपलब्ध करून दिली आहे.
- डेटा एक्सचेंज टेक्नॉलॉजी ही जागतिक स्तरावर स्थानिक भाषेत ईमेल सेवा उपलब्ध करून देणारी पहिली भारतीय आयटी कंपनी आहे. आता कोरियन भाषेतही ही सेवा उपलब्ध होईल. ही ईमेल सेवा व्यक्तींसाठी निःशुल्क आहे, तर कोर्पोरेट क्षेत्रासाठी शुल्क घेतले जाते.
- तसेच ही सेवा अॅपमार्फत इन्स्टॉल करता येऊ शकते. डेटामेलमध्ये ‘सिक्रेट किपर’ नावाचे वैशिष्ट्य आहे, ज्यात तुमचे ऑनलाईन तपशील, पासवर्ड सुरक्षित राहतील.
- जागतिक स्तरावर ईमेल अॅड्रेससाठी इंग्रजी भाषेचे वर्चस्व आहे. कोरिया ही जगातील एक मोठी बाजारपेठ असल्याने डेटामेल सेवेसाठी कोरियन भाषेची निवड केली गेली. या सेवेचा मोठा उपयोग हा तेथील गतिशील अर्थव्यवस्थेला तसेच सॅमसंग, एलजी, ह्युंडाई, लॉटी अशा अनेक कंपन्यांना होईल. सध्या ही कंपनी 15 भारतीय भाषांसहित चीनी, अरेबिक, थाय, सिरिलिक वगैरे भाषांमध्ये ईमेल अॅड्रेस पुरवते आहे.
केनियाच्या खासदाराचे सदस्यत्व रद्द :
- बोगस पदवी सादर केल्याप्रकरणी केनियाच्या एका खासदाराचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. फ्रँकलिन मिथिका लिनतुरी असे या खासदाराचे नाव आहे. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची (बामू) बोगस पदवी सादर केली होती.
- वर्ष 2016 मध्ये नॅशनल अलाइन्स पक्षाच्या उमेदवारीवर मेरू इयंबे शहरातील दक्षिण मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली होती. निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या पदवीवर त्याच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने आक्षेप घेतला होता.
- तसेच त्याआधारे या प्रकरणाच्या तपासाचे काम इंटरपोलकडे सोपवण्यात आले. तपासाअंती त्यांना विद्यापीठाने पदवी बहाल केलेली नाही, असा जबाब विद्यापीठ प्रशासनाने गुन्हे शाखेकडे नोंदवला आहे.
- फ्रँकलिन यांनी 2001 मध्ये विद्यापीठाच्या बहिःस्थ बी.कॉम अभ्यासक्रमास प्रवेश घेतला होता. त्यासाठी औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयात अर्ज भरला होता.
एबी डीव्हिलियर्सचे अविश्वसनीय विक्रम :
- क्रिकेटच्या मैदानातली आकडेवारी ही प्रत्येक खेळाडूच्या कर्तृत्वाची मोजपट्टी असते. हा निकष लावला आणि कामगिरी बघितली तर एबी डीव्हिलियर्सच्या निवृत्तीमुळे क्रिकेटप्रेमींनी नी विशेषत: टीम दक्षिण अफ्रिकेने काय गमावलेय हे लक्षात येईल. आपल्या नावावर अविश्वसनीय असे विक्रम नोंदवणाऱ्या एबीने 23 मे रोजी निवृत्ती जाहीर केली आणि सच्च्या क्रिकेटप्रेमींना वाईट वाटले आणि एबीडीचे विक्रम डोळ्यासमोरून तरळले.
- एकदिवसीय सामन्यामध्ये सगळ्यात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम डीव्हिलियर्सच्या नावावर आहे. त्याने अवघ्या 16 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलेय. त्याचप्रमाणे एकदिवसीय सामन्यामध्ये सगळ्यात जलद शतक व सगळ्यात जलद दीडशतक झळकावण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. एबीडीने 31 चेंडूंमध्ये शतक तर 64 चेंडूंमध्ये दीडशतक झळकावण्याचा विक्रम केलेला आहे.
- केवळ टी-20 व एकदिवसीयच नाही तर कसोटी फॉरमॅटमध्येही एबीडीने नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. कसोटीमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
- तसेच त्याने 278 नाबादची खेळी केली आहे. तर आयसीसी क्रिकेट रँकिंगमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 935 इतके गुण कमावणारा तो दक्षिण अफ्रिकन खेळाडू आहे. साउथ अफ्रिकन क्रिकेटर ऑफ दी इयर हा मानाचा पुरस्कार एबीडीने 2014 व 2015 अशा दोन वेळा पटकावला आहे.
दिनविशेष :
- क्रांतिकारक रास बिहारी घोष यांचा जन्म सन 1886 मध्ये 25 मे रोजी झाला.
- स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक, बंगाली कवी काझी नझरुल इस्लाम यांचा 25 मे 1899 रोजी जन्म झाला.
- कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वोच्च शिखर प्रथमच 25 मे 1955 मध्ये जो ब्राऊन आणि जॉर्ज बॅन्ड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी सर केले.
- चिनी सरकारने विल्यम शेक्सपिअरच्या साहित्यावरील बंदी 25 मे 1977 रोजी उठवली. सुमारे 10 वर्षे ही बंदी अमलात होती.
- विख्यात बंगाली साहित्यिक सुभाष मुखोपाध्याय यांना 1991चा ज्ञानपीठ पुरस्कार 25 मे 1992 रोजी जाहीर झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा