चालू घडामोडी (25 नोव्हेंबर 2016)
एअरटेलने सुरू केली देशातील पहिली पेमेंट बँक :
- एअरटेल या मोबाइल कंपनीने डिजिटल आणि पेपरलेस बँक सुरू केली असून, देशातील ही पहिली पेमेंट बँक ठरली आहे.
- तसेच याव्दारे ग्राहकांना एअरटेलच्या गॅलरीतून रोख रक्कम काढण्याची मुभाही देण्यात आली आहे.
- मोबाइल फोनच्या माध्यमातूनही या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
- राजस्थान भारती एअरटेलने प्रायोगिक तत्त्वावर ही बँक सुरू केली आहे. रिझर्व्ह बँकेने 11 एप्रिल रोजी एअरटेलला पेमेंट बँकेचा परवाना दिला होता. या बँकेतील बचत खात्यातील रकमेवर 7.25 टक्के या दराने व्याज दिले जाणार आहे.
- ग्राहकांना मोबाइल फोनच्या माध्यमातूनही बँकिंग सेवेचा लाभ घेता येणार असून, बँकेत पेपरलेस खाते उघडण्यासाठी ग्राहकांना आधार कार्ड क्रमांकाच्या मदतीने ‘ई-केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
‘कॅशलेस’ व्यवहारासाठी मोफत मोबाईल योजना सुरू :
- केंद्र सरकारने पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर सामान्य जनतेसह अनेकांना त्याचा फटका बसला. या समस्येवर उपाय काढण्यासाठी ‘कॅशलेस’ व्यवहार हा उपाय असून, त्यासाठी आर्थिकदृष्ट्या मागास नागरिकांना मोफत मोबाईल वाटप करण्याचा विचार आंध्र प्रदेश सरकार करीत आहे.
- मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी याविषयीचा प्रस्ताव रिझर्व्ह बॅंक आणि अन्य बॅंकेच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत सादर केला.
- कॅशलेस व डिजिटल व्यवहारांसाठी प्रत्येकाकडे मोबाईल फोन असणे गरजेचे आहे. म्हणूनच ही कल्पना आम्ही मांडली असून, मोबाईल वाटप करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
भारतीय महिला संघ आशिया चषकात खेळणार :
- भारतीय महिला संघ 26 नोव्हेंबर पासून बँकॉकमध्ये सुरू होत असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत खेळणार असल्याचे बीसीसीआयने जाहीर केले. तथापि, पाकविरुद्ध खेळण्याबाबत शंका कायम आहे.
- बीसीसीआय संयुक्त सचिव अमिताभ चौधरी म्हणाले, ‘भारतीय महिला संघ आशिया चषकात सहभागी होईल, पण पाकविरुद्ध खेळणार की नाही, हे सांगू शकत नाही.’
- भारताचा सलामीचा सामना 27 नोव्हेंबररोजी यजमान थायलंडविरुद्ध होणार आहे.
राज्य सरकारसोबत सिस्का कंपनीचा करार :
- देशात प्रथमच एलईडी बल्बचे उत्पादन करण्यासाठी राज्य सरकारसोबत सिस्का कंपनीने करार केला असून, हा कारखाना खंडाळा तालुक्यातील केसुर्डी येथे उभारण्यात येणार असल्याची माहिती उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांनी दिली.
- चाकण आणि खंडाळा या दोन्ही ठिकाणी मिळून 1000 कोटी रुपये खर्चाचे उत्पादन प्रकल्प उभे राहणार आहेत.
- नव्याने आलेली एक हजार 15 कोटी रुपयांची गुंतवणूक ही ‘मेक इन महाराष्ट्र’ मोहिमेचे यश मानले जाते. या दोन्ही प्रकल्पांसाठी भूखंड वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.
- एलईडी बल्बच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेली सिस्का ही जपानी कंपनी केसुर्डी येथे 200 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार आहे.
दिनविशेष :
- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा 25 नोव्हेंबर 1984 हा स्मृतीदिन आहे.
- 25 नोव्हेंबर 1997 हा लोकमतचे संस्थापक व माजी मंत्री, जवाहरलालजी दर्डा यांचा स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा