Current Affairs of 26 April 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (26 एप्रिल 2018)
1 मेपासून डिजिटल स्वाक्षरी सातबारा :
- डिजिटल स्वाक्षरी सातबारा सेवा 1 मेपासून होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
- या घोषणेच्या अनुषंगाने सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासमवेत पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.
- 1 मेपासून संकेतस्थळावर उपलब्ध होणारा डिजिटल स्वाक्षरी सातबारा सर्व शासकीय व निमशासकीय कामासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यासाठी या संगणकीय सातबारावर तलाठ्याच्या स्वाक्षरीची आवश्यकता नाही.
- तसेच याबाबतचा मुख्य कार्यक्रम 1 मे रोजी सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रत्येक जिल्ह्यात डिजिटल सातबाराचे उत्कृष्ट कार्य केलेल्या 100 तलाठ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव :
- स्त्रिया आणि शूद्रांना अक्षरओळख करून देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपले आयुष्य वेचणारे महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुणे विद्यापीठाच्या परिसरात स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी जुलै 2018 च्या पुरवणी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाणार आहे.
- फुले यांचे वंशज नीता होले आणि स्मारक समितीच्या सदस्यांच्या एका शिष्टमंडळाने वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची 24 एप्रिल रोजी ‘सह्याद्री’ अतिथिगृहावर भेट घेतली. या भेटीत समितीने विद्यापीठाच्या परिसरात फुलेंचे स्मारक उभारण्याची मागणी केली.
- तसेच या मागणीला प्रतिसाद देत मुनगंटीवार यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली. स्मारकाच्या कामासाठी निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही वित्तमंत्र्यांनी दिली.
- राज्य सरकारने पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नावे दिले आहे. विद्यापीठाच्या नामांतरानंतर विद्यापीठात फुले दांपत्याचे स्मारक उभारण्याची मागणी पुढे येत आहे.
गोव्यात ‘ग्रे डस्क ऑफ गुरूदत्त’चे आयोजन :
- गोवा मनोरंजन संस्था (इएसजी), सिनेफाईल क्लब आणि अनिल काणे यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘ग्रे डस्क ऑफ गुरूदत्त’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
- हा कार्यक्रम 5 मे रोजी सायंकाळी साडेचार वाजता मॅकेनिज पॅलेस, पणजी येथे होणार असून, हा कार्यक्रम दृकश्राव्य असणार असल्याची माहिती इएसजीचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
- भारतातील प्रतिभावंत चित्रपट निर्माते गुरू दत्त यांच्या बाजी (1951) ते साहेब, बिवी और गुलाम (1962) पर्यंतच्या गाजलेल्या चित्रपटांच्या स्लाईड्स, दृष्ये आणि गीते या कार्यक्रमात असतील.
- मनोहर अय्यर हे गुरू दत्त यांच्या चित्रपट कारकिर्दीवर माहिती देणार आहेत. या कार्यक्रम मनोरंजनात्मक नसून माहितीपर असल्याचेही यावेळी तालक म्हणाले.
इंदू मल्होत्रा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणार :
- वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या त्या देशाच्या पहिल्या महिला ठरणार आहेत.
- न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला कायदा मंत्रालयाने संमती दिली आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात न्या. आर.भानुमती या एकमेव महिला न्यायाधीश आहेत.
- 1989 मध्ये 39 वर्षीय एम.फातिमा बिबी यांची देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
- पुढील आठवड्यात इंदू मल्होत्रा शपथ घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सरकारने न्यायाधीश के.एम. जोसेफ यांची बढती रोखण्याचा निर्णय घेतला आहे.
- जस्टिस जोसेफ उत्तराखंड उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश आहेत. 2016 मध्ये उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करणाऱ्या खंडपीठात जोसेफ यांचा सहभाग होता.
बायच्युंग भूतिया करणार राजकीय पक्षाची स्थापना :
- काही महिन्यांपूर्वी तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर भारतीय फुटबॉल टीमचा माजी कर्णधार बायच्युंग भूतिया सिक्कीममध्ये स्वतःचा राजकीय पक्ष स्थापना करणार असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ़ इंडियाने प्रसिद्ध केले आहे. हा प्रादेशिक पक्ष असून सिक्किमच्या हितासाठी काम करणार आहे.
- तसेच 26 एप्रिल रोजी भूतिया आपल्या नविन पक्षाची घोषणा करणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
- मी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधत माझी पुढची वाटचाल जाहीर करणार आहे. सिक्कीम नव्या बदलासाठी तयार आहे हे मला राष्ट्रीय प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवायचे आहे असे बायच्युंग भूतियाने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.
- तसेच 26 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता होणाऱ्या फेसबुक लाईव्हमध्ये सर्वांनी सहभागी व्हा असे आवाहन बायच्युंग भूतियाने केले आहे.
दिनविशेष :
- इस्लाम धर्माचे संस्थापक मुहम्मद पैगंबर यांचा जन्म 26 एप्रिल 570 रोजी झाला. (अनिश्चित)
- पुष्टिमार्गाचे संस्थापक वल्लभाचार्य यांचा जन्म 26 एप्रिल 1479 मध्ये झाला.
- सन 1903 मध्ये 26 एप्रिल रोजी अटलेटिको माद्रिद असोसिएशन फुटबॉल क्लबची स्थापना झाली.
- 26 एप्रिल 1973 रोजी अजित नाथ रे भारताचे 14 वे सरन्यायाधीश झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा