Current Affairs of 26 May 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (26 मे 2018)

‘आयुष्मान भारत’ योजनेचे उपचार खर्च दरनिश्चितीपत्रक जाहीर :

  • अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठय़ा ‘आयुष्मान भारत’ या योजनेत किमान 1350 उपचार सुविधांसाठी रु. 1500 ते रु. 1.50 लाखांपर्यंतचे दरनिश्चितीपत्रक जाहीर करण्यात आले असून यात उपचारांचे दर ठरवण्यात आल्याने, विमा आहे म्हणून रुग्णांची लूटमार होण्याची शक्यता कमी होणार आहे.
  • सरकारने याबाबत 205 पानांचे निविदापत्र जारी केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ओबामा हेल्थकेअरशी तुलना होत असलेल्या आरोग्य योजनेला अंमलबजावणीच्या दिशेने एक पाऊल पुढे नेले आहे.
  • या निविदा पत्रिकेत उपचारांचे दर निश्चित करण्यात आले असून त्याच्या आधारे राज्य विमा योजनेत सहभागी होणाऱ्या रुग्णालयांची यादी निश्चित करू शकतील.
  • देशातील गरीब कुटुंबांना यात 5 लाख ते 10 कोटी रुपयांचा विमा मिळणार आहे. हृदयरोग, कर्करोग, मेंदूशस्त्रक्रिया, नवजात अर्भक उपचार यासाठी दरनिश्चिती करण्यात आली आहे. उपचार व शस्त्रक्रिया यांचे स्वरूप यावरून दर ठरवण्यात आले आहेत.
  • ज्या परिस्थितीत रुग्णालयात दाखल करणे आवश्यक नाही अशा कुठल्याही उपचार खर्चास विमा कंपनी जबाबदार राहणार नाही. दरपत्रक तयार करताना बराच अभ्यास करण्यात आला असून त्याची तपासणी नीती आयोगाने केली आहे, असे सांगून आयुष्मान भारतचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंदू भूषण म्हणाले की, आम्ही केवळ मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 मे 2018)

कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षपदी रमेश कुमार :

  • कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसच्या आघाडीनंतर जेडीएस नेते एच.डी. कुमारस्वामी यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली. कुमारस्वामी यांच्या सरकारची बहुमत चाचणी घेण्यात आली. तत्पूर्वी विधानसभेचे अध्यक्षपद मागणाऱ्या भाजपने अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर काँग्रेसचे रमेश कुमार यांची अखेर विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
  • भाजप नेते बी.एस. येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर भाजपकडून विधानसभेच्या अध्यक्षपदावर दावा करण्यात आला होता. या पदासाठी भाजपचे एस. सुरेश कुमार यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून तशी रणनीतीही आखण्यात आली होती. मात्र, भाजपने अध्यक्षपदासाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अखेरच्या क्षणी मागे घेतला.
  • त्यावेळी येडियुरप्पा म्हणाले, ‘विधानसभेच्या अध्यक्षपदाचा मान, सन्मान अबाधित राहावा म्हणून आम्ही उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला’. दरम्यान, भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेसच्या रमेश कुमार यांची विधानसभेत बिनविरोध निवड झाली.

राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालये सुरू होणार :

  • औषधनिर्माणशास्त्रात (फार्मसी) पदविका आणि पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम राबविणारी देशात 393, तर राज्यात 52 नवी महाविद्यालये येत्या शैक्षणिक वर्षात सुरू होणार आहेत.
  • अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) या महाविद्यालयांना मंजुरी दिल्याने देशात यातील पदविका अभ्यासक्रमातील 17 हजार 460 जागा, तसेच पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील नऊ हजार 298 जागा नव्याने उपलब्ध होणार आहेत.
  • देशात 2018-19 या शैक्षणिक वर्षात औषधनिर्माणशास्त्रातील पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम राबविणारी 291 महाविद्यालये, तसेच पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची 102 महाविद्यालये नव्याने सुरू होणार आहेत. राज्यात पदविका अभ्यासक्रमांसाठी 32 महाविद्यालये, तर पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी 20 महाविद्यालये सुरू करण्यासाठी परिषदेने मान्यता दिली आहे.
  • तसेच यामुळे राज्यात एकूण जागांमध्ये पदविका अभ्यासक्रमासाठी एक हजार 920, तर पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी दोन हजार 160 जागांची वाढ होणार आहे, त्यामुळे राज्यात आता 437 औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये असणार आहेत.

तरुणांना धूम्रपानापासून दूर नेण्यात फेसबुकची मदत :

  • फेसबुकवरील समुपदेशन तरुणांना धूम्रपानापासून दूर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
  • हे संशोधन ‘अ‍ॅडिक्शन‘ या मासिकात नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. धूम्रपान रोखण्यासाठी फेसबुककडून केल्या जाणाऱ्या हस्तक्षेपाची सत्यता पडताळल्यानंतर संशोधकांनी वरील स्पष्टीकरण दिले आहे.
  • कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी फेसबुकचा ठरावीक कालावधीसाठी धूम्रपान करणाऱ्या तरुणांवर पडणारा प्रभाव तपासला. आम्ही अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचलो. समाजमाध्यमांवरील तंबाखूविरोधी कार्यक्रम व्यसनापासून सहजपणे दूर घेऊन जातो, असे साहाय्यक प्राध्यापक डॅनियल रामो यांनी सांगितले.
  • संशोधकांनी फेसबुकवर तंबाखू स्थिती प्रकल्प हा 90 दिवसांचा कार्यक्रम राबविला. धूम्रपान सोडण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे प्रारूप ठरविण्यात आले होते. त्यानुसार दररोजचे समाजमाध्यमांवरील लिखाण, आठवडय़ातील प्रश्नोत्तरांचे सत्र आणि आठवडय़ातील संज्ञात्मक वागणूक सल्ला सत्र यांच्या माध्यमातून सल्लागार समिती धूम्रपानविरोधी कार्य करते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या तरुणांना अमेरिकेतील राष्ट्रीय कर्करोग संस्थेने प्रोत्साहन दिले.

‘इपीएफओ’कडून पीएफवर नीचांकी व्याजदर :

  • कर्मचारी भविष्यनिर्वाह कर्मचारी संघटनेने (इपीएफओ) 2017-18 या आर्थिक वर्षासाठी भविष्यनिर्वाह निधीवर 8.55 टक्के व्याज देण्याची घोषणा केली आहे. गेल्या पाच वर्षांतील हा नीचांकी व्याजदर आहे.
  • ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या या निर्णयावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्रालयाने दिली.
  • तसेच त्यामुळे ईपीएफओच्या पाच कोटी सदस्यांच्या खात्यात लवकरच व्याजाची रक्कम जमा होईल.
  • भविष्यनिर्वाह निधीवर 2016-17 या आर्थिक वर्षात 8.65 तर त्यापूर्वीच्या वर्षात 8.8 टक्के व्याज मिळाले होते.

दिनविशेष :

  • युरोपियन समुदायाने (EU) 26 मे 1986 रोजी नवीन ध्वज अंगीकारला.
  • 26 मे 1989 मध्ये मुंबईजवळच्या न्हावा-शेवा बंदराचे उद्‍घाटन झाले.
  • 26 मे 2014 रोजी श्री. नरेंद्र मोदीजी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.
  • आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक ‘बेन्जामिन पिअरी पाल’ यांचा जन्म 26 मे 1906 रोजी झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 मे 2018)

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago