Current Affairs (चालू घडामोडी) of 26 November 2014 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. स्वछ भारत कोश स्थापन
2. पृथ्वीवरील सर्वात जुन्या पाण्याचा शोध
3. सार्क परिषद काठमांडू येथे होणार
4. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळशी केलेले करार 
5. नॅशनल बूक अवॉर्ड साठी आनंत गोपाळ यांचे नामांकन

 

स्वछ भारत कोश स्थापन :

  • ग्रामीण, शहरी भागांसह शाळांमध्ये स्वच्छतागृहे बांधण्यासाठी या कोशामध्ये जमा होणारी रक्कम वापरण्यात येणार आहे.
  • केंद्र सरकार कडून ही घोषणा करण्यात आली, की या कोशाच्या माध्यमातून देशभरात राबविण्यात येणार्‍या स्वच्छता मोहिमेसाठी निधि जमा केला जाणार आहे.
  • स्वछ भारत कोशामध्ये सामाजिक कृतज्ञतेच्या माध्यमातून देण्यात येणार्‍या देणग्या आणि कार्पोरेट सोशल रिस्पोन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत उद्योग क्षेत्रातून मिळणारा फंड जमा करण्यात येणार असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले.

 

पृथ्वीवरील सर्वात जुन्या पाण्याचा शोध :

  • कॅनडा मधील ओंटारीओ येथील टिमिन्स खाणीत पृथ्वीवरील सर्वात जुने पाणी सापडले आहे.
  • हे पाणी 1.5 अब्ज वर्षापूर्वीचे आहे.
  • मंगळाच्या आणि जीवसृष्टिच्या अभ्यासासाठी त्याचा उपयोग होणार आहे.

 

सार्क परिषद काठमांडू येथे होणार :

  • 26 नोव्हेंबर पासून सार्क परिषद नेपाळ येथील काठमांडू येथे सुरू होणार.
  • प्रादेशिक संबंध सुधारावे आणि आर्थिक विकासासाठी योग्य वातावरन तयार व्हावे म्हणून परिषद होणार.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळशी केलेले करार :

  • नवी दिल्ली ते काठमांडू बससेवेला हिरवा झेंडा.
  • पहिले शंभर रुपयांच्या नोटांची परवानगी होती ती वाढवून आता भारत नेपाळमध्ये पाचशे आणि एक हजाराच्या पंचवीस हजार रुपये किमतीपर्यतच्या नोटा देण्यास परवानगी.
  • परिवाहन करारानुसार काही विशिष्ट मार्गावर दोन्ही देशातील वाहनांना परवानगी.
  • बोधगयेतील बोधीवृक्षाची फांदी लुंबिनी येथे लावण्यासाठी नेपाळ सरकार कडे सुपूर्त.

 

नॅशनल बूक अवॉर्ड साठी आनंत गोपाळ यांचे नामांकन :

  • भारतीय वंशाचे लेखक आनंत गोपाल यांना युद्धग्रस्त अफगाणिस्तानातील प्रत्यक्ष जीवनावर आधारित पुस्तकासाठी ‘काथाबाह्य विभाग’त नामांकन मिळाले आहे.
  • अमेरिकेतील सर्वात प्रतिष्टेचा हा पुरस्कार मानला जातो.

 

आजचा दिनविशेष :

  • 2008: मुंबई येथे झालेल्या सर्वात मोठ्या आतंकवादी हल्यात पोलीस आधिकारी हेमंत करकरे, विजय सळसकर, अशोक कामटे यांच्यासह 18 पोलिस कर्मचारी शहीद झाले.
  • 1949 : भारतीय राज्य घटना टाळ्यांच्या गजरात मंजूर झाली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.