चालू घडामोडी (26 नोव्हेंबर 2016)
पंतप्रधान पीक विम्यात महाराष्ट्र देशात अव्वल :
- राज्यातील शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिल्याने पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये देशभरामध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आला.
- राज्यातील सुमारे 67 लाख शेतकऱ्यांनी सुमारे सतरा हजार कोटी रुपयांचे विमा संरक्षण काढले आहे.
- 2016 च्या खरीप हंगामासाठी देशातील 3 कोटी 26 लाख शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घेतला.
- तसेच यामध्ये एकटय़ा महाराष्ट्रातील 66 लाख 79 हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. म्हणजे हे प्रमाण वीस टक्क्यांहून अधिक आहे.
ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर कालवश :
- ज्येष्ठ पत्रकार व ख्यातनाम विचारवंत दिलीप पाडगावकर (वय 72 वर्ष) यांचे दीर्घ आजाराने पुण्यात 25 नोव्हेंबर रोजी निधन झाले.
- 1 मे 1944 साली जन्मलेल्या पाडगावकरांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून राज्यशास्त्राची पदवी प्राप्त केली होती.
- 1978 ते 1986 या कालावधीत त्यांनी युनेस्कोत बँकॉक आणि पॅरिससाठी काम केले.
- 1988 मध्ये त्यांची टाइम्स ऑफ इंडियाच्या संपादकपदी नियुक्ती करण्यात आली. या पदावर ते तब्बल सहा वर्षे कार्यरत होते.
- ‘मॅटर ऑफ फॅक्ट’ चालणेबोलणे हा त्यांचा स्वभाव! 2002 मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित केले होते.
- पाडगावकर हे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक म्हणून परिचीत होते.
राज्यभरात संविधान जागर यात्रा :
- महाराष्ट्र अंनिसतर्फे 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी हा कालावधी संविधान जागर महोत्सव म्हणून साजरा केला जात आहे.
- याचाच एक भाग म्हणून 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान राज्यभरातून संविधान जागर यात्रा काढली जाणार आहे.
- तसेची हि यात्रा 2 टीम मध्ये विभागली असून यापैकी एक टीम मुंबई ते महू (मध्यप्रदेश) असा प्रवास करणार असून दुसरी टीम नागपूर ते औरंगाबाद असा प्रवास करणार आहेत.
- या प्रवासादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी संबंधित असणाऱ्या ठिकाणांना भेटी देऊन त्या परिसरात संविधानावर आधारित कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
- महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर, नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी व इतर मान्यवर या कार्यक्रमात सर्वांना संबोधित करतील.
पृथ्वी-2 या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण :
- भारताकडून ओडिसायेथील बालासोर जिल्ह्यातील चांदिपूर येथून पृथ्वी-2 या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
- 2003 मध्ये हा क्षेपणास्त्र सैन्यात दाखल झाले होते. हा क्षेपणास्त्र अण्वस्त्रे अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे.
- पृथ्वी-2 मध्ये जमिनीवरून जमिनीवर 350 किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रापर्यंत अचूक मारा करण्याची ताकद आहे.
- पृथ्वी-2 ला दोन इंजन असून ते द्रवरूप इंधनावरही चालू शकते. तसेच यापूर्वी 12 ऑक्टोबर 2009 मध्ये पृथ्वी-2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.
दिनविशेष :
- 26 नोव्हेंबर 1994 हा भारतीय चित्रपटमहर्षी भालजी पेंढारकर यांचे स्मृतीदिन.
- 2008 मध्ये मुंबई येथे झालेल्या सर्वात मोठ्या आतंकवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर यांच्यासह 18 पोलीस कर्मचारी शहीद झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा