Current Affairs of 27 April 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (27 एप्रिल 2017)
आमीर खानला सरसंघचालकांच्या हस्ते पुरस्कार प्रदान :
- मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेला अभिनेता आमीर खानने तब्बल 16 वर्षानंतर पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.
- ‘दंगल’ चित्रपटातील उत्कृष्ट भुमिकेसाठी आमीरला भागवत यांच्या हस्ते दिनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. लता मंगेशकर यांच्या खास आग्रहास्तव आमीर या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिला होता.
- मुंबईमध्ये दिनानाथ मंगेशकर यांच्या 75व्या पुण्यतिथी निमित्त या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
- तसेच या पुरस्कार सोहळ्यात आमीर खानच्या ‘दंगल’ चित्रपटातील भुमिकेसाठी विशेष पुरस्कार देउन त्याला गौरविण्यात आले.
- आमीर याआधी 16 वर्षापुर्वी ‘लगान’ चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला, त्यावेळी पुरस्कार सोहळ्यास उपस्थित होता.
- या पुरस्कार सोहळ्यादरम्यान माजी क्रिकेटपटू कपिल देव तसेच प्रख्यात अभिनेत्री वैजयंतीमाला यांनाही पुरस्कार देउन गौरविण्यात आले.
Must Read (नक्की वाचा):
राजीव भटनागर सीआरपीएफचे नवे महासंचालक :
- केंद्र सरकारने केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) महासंचालकपदी राजीव राय भटनागर यांची नियुक्ती केली आहे. भटनागर हे 1983 च्या तुकडीचे उत्तर प्रदेश केडरचे ‘आयपीएस’ अधिकारी आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या निवड समितीने भटनागर यांच्या नियुक्तीला मंजुरी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
- छत्तीसगड येथे नुकत्याच झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर झालेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर ‘सीआरपीएफ’च्या महासंचालकांची रिक्त जागा आता भरण्यात आली आहे. सध्या सुदीप लखताकिया यांच्याकडे ‘सीआरपीएफ’चा प्रभारी कारभार होता.
- दरम्यान, इंडो तिबेट सीमा पोलिस दलाच्या (आयटीबीपी) महासंचालकपदी आर.के. पचंदा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- तसेच सध्या 1983 च्या तुकडीचे ‘आयपीएस’ अधिकारी असलेले पचंदा हे पश्चिम बंगाल केडरचे अधिकारी आहेत.
सुशीलकुमार शिंदे यांना पहिली डी.लिट. पदवी प्रदान :
- ‘आपल्या देशात वर्तमानपत्र विकणारा राष्ट्रपती होतो, न्यायालयात शिपाई म्हणून काम केलेली व्यक्ती देशाचा गृहमंत्री होतो हे प्रगल्भ लोकशाहीची लक्षणे आहेत. त्याचेच प्रतीक असलेले सुशीलकुमार शिंदे यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे’, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काढले.
- सोलापूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित केलेल्या विशेष दीक्षान्त समारंभात सुशीलकुमार शिंदे यांना राव यांच्या हस्ते पहिली डी.लिट. पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
- तसेच ते डिजिटल पद्धतीने तयार करण्यात आले आहे. राज्यात अशी पदवी प्रथमच दिली जात असल्याचा उल्लेख कुलगुरू डॉ. एन.एन. मालदार यांनी केला.
पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर :
- पोलीस दलामध्ये राष्ट्रपती शौर्यपदक, पोलीस पदकानंतर महत्त्वाचे समजल्या जाणारे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह (इनसिग्निया) 687 अधिकारी-कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आले आहे.
- पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी विजेत्यांची नावे जाहीर केली. एक मे रोजी या पदकांचे वितरण केले जाणार आहे.
- सन्मानचिन्ह विजेत्यामध्ये राज्य गुप्त वार्ता विभागाचे विशेष महानिरीक्षक संतोष रस्तोगी, मुंबईतील अप्पर आयुक्त आस्वती दोरजे, ठाण्यातील अप्पर आयुक्त यशस्वी यादव, साताऱ्याचे पोलीस प्रमुख संदीप पाटील, कोल्हापूरचे अप्पर अधीक्षक सोहेल शर्मा आदींचा समावेश आहे.
- पोलीस दलात उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण सेवा बजाविणाऱ्यांना दरवर्षी एक मे रोजी महासंचालक सन्मानचिन्हाने गौरविण्यात येते.
- 2016 या वर्षासाठी जाहीर केलेल्या 687 जणांमध्ये 16 अधिकारी-अंमलदार हे राष्ट्रपती शौर्यपदक, पोलीस पदकाने सन्मानित आहेत. त्यामुळे त्यांनाही स्वतंत्रपणे ‘इनसिग्नीया’ बहाल करण्यात आला आहे.
दिनविशेष :
- 27 एप्रिल 1878 मध्ये कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजूरी दिली.
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म 27 एप्रिल 1909 मध्ये झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा