चालू घडामोडी (27 ऑगस्ट 2016)
आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञांनी शोधला पृथ्वी सारखा ग्रह :
- पृथ्वीपासून जवळपास चार प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या पृथ्वीसारख्याच दुसऱ्या ग्रहाचा शोध संशोधकांनी लावला.
- तसेच हा ग्रह सूर्याच्या अगदी जवळ असून, प्रॉक्झिमा-बी असे त्याला नाव देण्यात आले आहे. या ग्रहाची आकारासहित बहुतेक वैशिष्ट्ये पृथ्वीसारखीच असल्याची निरीक्षणे संशोधकांनी नोंदविली आहेत.
- या ग्रहावरील वातावरणाचे अस्तित्व व सजीवांचा अधिवास याबाबत मात्र अद्याप संशोधन सुरू आहे.
- प्रॉक्झिमा-बी हा ग्रह प्रॉक्झिमा सेन्शॉरी या लाल लघुताऱ्याच्या शेजारीच असल्याचे संशोधन ‘नेचर‘ या विज्ञान नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.
- ब्रिटिश संशोधकांच्या पुढाकाराने युरोपियन शास्त्रज्ञांनी हे संशोधनपर लिखाण केले आहे. या लिखाणासाठी संशोधकांनी 16 वर्षांपासून माहिती संकलन केले.
- तसेच या माहिती संकलनाच्या आधारे व चिलीमधील युरोपियन साऊदर्न ऑब्जर्व्हेटरी टेलेस्कोपच्या साह्याने संशोधकांनी या ग्रहाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब केले.
- लंडन येथील क्वीन मेरी विद्यापीठातील प्रमुख संशोधक लेखक ग्युलेम अँग्लाडा एस्क्युड यांनी या संशोधनाला त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव असल्याचे सांगितले.
‘व्हाइट हाउस’मध्ये पाकचे महत्त्व घटले :
- अमेरिकेशी शत्रुत्व असणाऱ्या दहशतवादी संघटनांना पाकिस्तानचा असलेला पाठिंबा आणि अमेरिकेची भारताबरोबर वाढत असलेली मैत्री या कारणांमुळे ‘व्हाइट हाउस’मध्ये पाकिस्तानचे महत्त्व वेगाने घटत असल्याचे येथील अनेक तज्ज्ञांचे मत आहे.
- अमेरिकेने वारंवार सूचना करूनही पाकिस्तानचे अनेक वरिष्ठ अधिकारी अफगाणिस्तानमधील तालिबानला खुला पाठिंबा देत असल्याने निराश होऊन अमेरिकेने पाकिस्तानच्या लष्करी आणि आर्थिक साह्यात मोठी कपात केली आहे. गेल्या दशकभरात दोन देशांमधील तणाव वाढतच चालला आहे.
- अफगाणिस्तानमधील अनेक भाग अमेरिकेने दहशतवादमुक्त केल्यानंतर पाकिस्तानचे समर्थन असलेल्या अनेक दहशतवादी संघटनांनी तिथे पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
- तसेच त्यामुळे दक्षिण आशिया, विशेषतः पाकिस्तान आणि अफगाणिस्तानबाबत असलेल्या धोरणात मुळापासून बदल करून भारताच्या बाजूने उभे राहण्याची गरज असल्याचे अमेरिकेच्या लष्करी आणि नागरी क्षेत्रातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत बनत चालले असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ मिशेल कुगलमन यांनी सांगितले.
- पाकिस्तानचा कट्टर शत्रू असलेल्या भारताला अमेरिकेने व्यापार, संरक्षण यांसह इतर अनेक क्षेत्रांत जवळचा सहकारी म्हणून घोषित केले आहे.
मदर तेरेसा यांच्या सन्मानार्थ टपाल पाकीटाचे अनावरण :
- संत मदर तेरेसा यांना संतपद देण्याच्या समारंभाच्या पार्श्वभूमीवर भारतात त्यांना आदरांजली वाहण्यासाठी एक विशेष टपाल पाकीट जारी करण्यात येणार आहे.
- तसेच या पाकिटाचे अनावरण 2 सप्टेंबरला करण्यात येणार आहे.
- भारतीय टपाल खात्यातर्फे जारी करण्यात येणारे हे पाकीट रेशमापासून बनवलेले असणार आहे. अशी केवळ एक हजार पाकिटेच बनविण्यात येणार आहेत.
- त्यावर 2010 मध्ये मदर तेरेसा यांच्या जन्म शताब्दीनिमित्त भारत सरकारने जारी केलेले पाच रुपयांचे नाणे कोरण्यात येणार आहे.
- मदर तेरेसांचे जन्मस्थान असलेल्या मॅसेडोनिया प्रजासत्ताकमध्येही सोन्याचा मुलामा असलेले चांदीचे नाणे तयार करण्यात येणार आहे.
रोनाल्डो ठरला दुसऱ्यांदा युरोपचा सर्वश्रेष्ठ खेळाडू :
- पोर्तुगालचा कर्णधार आणि रियल माद्रिदचा स्टार स्ट्राइकर ख्रिस्तियानो रोनाल्डोला युरोपचा या वर्षातील सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.
- रोनाल्डोच्या शानदार खेळामुळे रियल माद्रिदने 2015-16 मध्ये चॅम्पियन्स लीग किताब पटकावला. तर त्याच्याच नेतृत्वात पोर्तुगालने पहिल्यांदा युरो कप जिंकला आहे.
- चॅम्पियन्स लीगच्या येणाऱ्या सत्रातील ड्रॉच्या घोषणेनंतर त्याला युईएफए बेस्ट प्लेअरचा पुरस्कार घोषीत करण्यात आला.
- रोनाल्डोने हा पुरस्कार दुसऱ्यांदा पटकावला आहे. रोनाल्डो सोबतच या पुरस्काराच्या शर्यतीत रियल माद्रिदचा गॅरेथ बेल आणि अॅटलेटिको माद्रिदचा स्ट्राईकर एंटोनियो ग्रिझमन हा देखील होता.
- रोनाल्डोने या आधी 2014 मध्ये हा पुरस्कार मिळवला होता. तर 2015 मध्ये बार्सिलोनाचा स्टार स्ट्राईकर लियोनेल मेस्सीने मिळवला.
- तसेच महिलांच्या गटात हा पुरस्कार नॉर्वेची अदा हेगरबर्गला मिळाला.
‘फ्युचर रिटेल’ स्टोअर्समध्ये पतंजली ब्रँड तिसऱ्या स्थानी :
- ‘फ्युचर रिटेल’ कंपनीच्या भारतभरातील स्टोअर्समध्ये गतिमान ग्राहक वस्तू (एफएमसीजी) श्रेणीत बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदच्या वस्तूंनी विक्रीत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
- फ्युचर समूहाचे सीईओ किशोर बियाणी यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पहिल्या क्रमांकावर हिंदुस्तान युनिलिव्हर असून, दुसऱ्या स्थानी प्रॉक्टर अॅड गॅम्बल आहे. पतंजली तिसऱ्या स्थानी आले आहे.
- फ्युचरच्या फडताळात पतंजलीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रवेश केला होता. पतंजलीपाठोपाठ जीसीपीएल, डाबर आणि इमामी हे ब्रँड आहेत. दरमहा सुमारे 20 टक्क्यांची वाढ कंपनी करीत आहे.
- पतंजली उद्योग समूहाने पूजा साहित्य ‘पतंजली आस्था’ या नावाने शंभरपेक्षाही जास्त उत्पादने पतंजलीकडून बाजारात उतरविण्यात येणार आहेत.
दिनविशेष :
- 1925 : नारायण धारप, मराठी लेखक जन्मदिन.
- 1962 : नासा चे मानव-विरहित यान मरिनर 2 चे शुक्राकडे प्रस्थान.
- 1972 : दिलीप सिंग राणा उर्फ द ग्रेट खली, भारतिय मल्ल जन्मदिन.
- 1976 : मुकेश, भारतीय पार्श्वगायक स्मृतीदिन.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा