Current Affairs (चालू घडामोडी) of 27 December 2014 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | रघुवर दास झारखंडचे पहिले बिगर आदिवासी मुख्यमंत्री |
2. | केडिएमसीची सदस्य निवड वादात अडकणार |
3. | जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची घोषणा |
4. | संत तुकाराम साहित्य संमेलन देहुमध्ये |
5. | आगामी काळात ‘वन रॅंक वन पेन्शन योजना’ |
6. | अमिताभ बच्चन यांना यश चोप्रा स्मूती पुरस्कार |
7. | दिनविशेष |
रघुवर दास झारखंडचे पहिले बिगर आदिवासी मुख्यमंत्री :
- रघुवर दास यांची राज्याचे नवे मंत्री म्हणून निवड केली आहे.
- बिगर आदिवासी चेहर्याला प्रथमच मुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार आहे.
- येत्या सोमवारी त्यांचा शपथविधी पार पडणार आहे.
केडिएमसीची सदस्य निवड वादात अडकणार :
- कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिति सदस्यांची केलेली निवड वादाच्या भोवर्यात सापडण्याची शक्यता आहे.
- राष्ट्रवादीच्या सदस्याला डावलून अपक्ष गटातील सदस्याची केलेली नियुक्ती चुकीची असल्याचा आरोप केला आहे.
जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची घोषणा :
- जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची घोषणा शुक्रवारी राज्य सरकारकडून करण्यात आली.
जिल्हा आणि पालकमंत्री खालीलप्रमाणे:
- मुंबईच्या – उद्योगमंत्री सुभाष देसाई
- मुंबई उपनगराच्या – शिक्षणमंत्री विनोद तावडे
- पुण्याच्या – अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट
- ठाण्याच्या – एकनाथ शिंदे
- पालघर – विष्णू सावरा
- बीड-लातूर – पंकजा मुंडे
- सांगली-कोल्हापूर – चंद्रकांत पाटील
- रायगड – प्रकाश मेहता
- परभणी-नांदेड – दिवाकर रावते
- रत्नागिरी – रवींद्र वायकर
- नाशिक – गिरीश महाजन
- जळगाव-बुलढाणा – एकनाथ खडसे
- सिंधुदुर्ग – दीपक केसरकर
- यवतमाळ – संजय राठोड
- नागपुर – चंद्रशेखर बावनकुळे
- सोलापूर – विजय देशमुख
- सातारा – विजय शिवतरे
- जालना – बबनराव लोणीकर
- औरंगाबाद – रामदास कदम
संत तुकाराम साहित्य संमेलन देहुमध्ये :
- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठांनाच्या वतीने 24 व 25 जानेवारी या काळात देहु येथे संत तुकाराम ग्रामजागर साहित्य संमेलन आयोजित केले आहे.
- माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
- तर मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
आगामी काळात ‘वन रॅंक वन पेन्शन योजना’ :
- आगामी अर्थसंकल्पपूर्वी ‘वन रॅंक वन पेन्शन योजना‘ लागू केली जाणार आहे.
- संरक्षण मंत्री मनमोहर पार्रिकर यांनी अशी ग्वाही दिली आहे.
- एक रॅंक एक पेंशन धोरण म्हणजे, एकच रॅंक आणि समान काळात सेवा देणार्य सैनिकांना सेवानिवृत्तीची तारीख कोणती का असत नाही त्यांना समान पेंशन देणे.
अमिताभ बच्चन यांना यश चोप्रा स्मूती पुरस्कार :
- प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांना यश चोप्रा स्मूती पुरस्कार गुरवारी महाराष्ट्रचे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते देण्यात आला.
दिनविशेष :
- 1911 – भारतीय राष्ट्रीय कोंग्रेसच्या अधिवेशनात ‘जन गण मन‘ हे राष्ट्रगीत पहिल्यांदा गायले गेले.