Current Affairs of 27 December 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (27 डिसेंबर 2015)
दहशतवाद नष्ट करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन :
- अफगाणिस्ताची सुरक्षा, विकास आणि प्रशासन यांची क्षमता वाढविण्यासाठी भारत अफगाणिस्तान सरकारला मदत करेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिले.
- अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित होऊन प्रत्येक अफगाण नागरिकाला उज्ज्वल भविष्य निर्माण करण्याचा हक्क आहे, असेही मोदींनी या वेळी सांगितले.
- रशियाचा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी आज पहाटे काबूलमध्ये दाखल झाले.
- तसेच मोदी यांनी अफगाणिस्तान संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करून त्यांनी संयुक्त अधिवेशनात संबोधित केले. ही इमारत भारतानेच बांधून दिली असून, यासाठी 9 कोटी डॉलर खर्च आला आहे.
- अफगाणिस्तानच्या मृत सैनिकांच्या मुलांसाठी पाचशे शिष्यवृत्त्या देत असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी या वेळी केली. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांच्याशी विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली.
- तसेच अफगाण विद्यार्थ्यांसाठी भारतातर्फे सुरू असलेली शिष्यवृत्तीही सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
Must Read (नक्की वाचा):
एअर इंडियाच्या विमानात मांसाहारी अन्न दिले जाणार नाही :
- येत्या 1 जानेवारीपासून एअर इंडियाच्या कुठल्याही विमानात इकॉनॉमी वर्गातील प्रवाशांना 90 मिनिटांचा हवाई प्रवास असेल तर मांसाहारी अन्न दिले जाणार नाही असे सांगण्यात आले.
- एअर इंडिया ही राष्ट्रीय हवाई वाहतूक कंपनी असून त्यांनी दुपारच्या जेवणातून चहा व कॉफी काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत एअर इंडियात 90 मिनिटांच्या प्रवासात मांसाहारी व शाकाही अन्न तसेत केक दिला जात असे. आता जानेवारीपासून त्यात बदल करण्यात आले आहेत.
- सर्व देशांतर्गत विमानात 61 ते 90 मिनिटांच्या प्रवासात शाकाहारी अन्न दिले जाईल व हा निर्णय 1 जानेवारी 2016 पासून अमलात येईल.
चिनी वृत्तवाहिन्यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या रोबोटला दिले माहिती सादरकर्त्यांचे काम :
- चीनमधील प्रयोग जगात प्रथमच चिनी वृत्तवाहिन्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या रोबोट म्हणजे यंत्रमानवांना हवामानविषयक माहिती सादरकर्त्यांचे काम दिले आहे.
- ‘लाइव्ह ब्रेकफास्ट’ शोमध्ये हा प्रयोग करण्यात आला असून, आता टीव्ही अँकर म्हणजे सादरकर्त्यांचे काम यंत्रमानव सहज करू शकतील अशी आताची बातमी आहे. बातम्या व लेख लिहिणारे यंत्रमानव चीनने आधीच विकसित केले आहेत, पण ते दिलेल्या माहितीच्या आधारे बातमी किंवा लेख लिहून दाखवतात.
- बातमीची रचना यंत्रमानवाला व्यवस्थित शिकवता येते व वार्ताहराने आणलेली माहिती त्याला दिली तर तो बातमी तयार करून देणार यात शंका नाही, कारण तो उपलब्ध माहितीच्या आधारे लेख लिहू शकतो हे सिद्ध झाले आहे.
जन्म-मृत्यू दाखल्यासह सर्व सरकारी सेवांसाठी योजना :
- कार्मिक मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती जन्म-मृत्यू दाखल्यासह सर्व सरकारी सेवांसाठी आता एक पानी सुटसुटीत अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहेत असे सरकारने आज जाहीर केले.
- आतापर्यंत वेगवेगळ्या सेवांसाठी जास्त पानांचे अर्ज होते ते आता एक पानाचे करण्यात येत आहेत केंद्रीय कार्मिक मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, जन्म-मृत्यू दाखल्यासह वेगवेगळ्या कामांसाठी मोठे अर्ज भरावे लागतात. आता आम्ही एकच पानांचा अर्ज उपलब्ध करून देत आहोत.
- पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस हा सुप्रशासन दिन म्हणून साजरा करण्यात आला.त्यानिमित्ताने हा अर्ज जारी करण्यात आला.
भारत आणि रशिया यांनी संयुक्तरित्या हेलिकॉप्टर्सची बांधणी करण्याचे ठरवले :
- भारत आणि रशिया यांनी संयुक्तरित्या हेलिकॉप्टर्सची बांधणी करण्याचे ठरवले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर जाहीर केले.
- कामोव्ह-226 टी हेलिकॉप्टर दोन्ही देशांनी मिळून तयार करण्यासही रशिया तयार असल्याचे संकेत दोन्ही नेत्यांच्या चर्चेत मिळाले होते.
- भारतातील दोन ठिकाणी 12 अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याकरिता रशियाशी बोलणी सुरू असल्याचेही मोदी यांनी सांगितले.