चालू घडामोडी (27 फेब्रुवारी 2016)
मुंबईचा 41 व्यांदा रणजी चषकावर विजय :
- शार्दूल ठाकूर (3 व 5 बळी), धवल कुलकर्णी (5 व 2 बळी) यांची भेदक गोलंदाजी, श्रेयस अय्यरची शानदार शतकी खेळी व सिद्धांत ठाकूरच्या उपयुक्त फलंदाजीच्या बळावर मुंबईने सौराष्ट्राला 1 डाव व 21 धावांनी नमवित 41 व्यांदा रणजी चषकावर मोहर उमटविली.
- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील मैदानावर हा सामना झाला.
- सौराष्ट्राने पहिल्या डावात केलेल्या 235 धावांना प्रत्युत्तर देताना मुंबईने पहिल्या डावात 371 धावांची खेळी केली.
- पहिल्या डावात 136 धावांची आघाडी घेतल्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी सौराष्ट्राचा दुसरा डाव 115 धावांत गुंडाळत एक डाव 21 धावांनी शानदार विजय मिळविला.
कालिखो पुल सरकारचा विश्वास ठराव :
- अरुणाचल प्रदेश विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवनियुक्त मुख्यमंत्री कालिखो पुल यांनी कुठल्याही विरोधाशिवाय विश्वासदर्शक ठराव जिंकला.
- 60 सदस्यांच्या सभागृहातील 40 आमदारांनी एकमताने ठराव मंजूर केला.
- स्वत: मुख्यमंत्री पुल यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडल्यानंतर सभागृहात उपस्थित असलेल्या पुल यांच्यासह 40 आमदारांनी हात उंचावून या ठरावाला पाठिंबा दिला.
- 40 आमदारांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला असून, विरोधात एकही मत न पडल्यामुळे हा प्रस्ताव संमत झाल्याचे अध्यक्षांनी उपस्थित असलेल्या सदस्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात जाहीर केले.
- गेल्या वर्षी 16 व 17 डिसेंबरला झालेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री नबाम तुकी यांना त्यांच्या अनुपस्थितीत पदच्युत करण्यात आल्यानंतर सुरू झालेल्या वादाच्या मालिकेतच पुल यांची 19 फेब्रुवारीला मुख्यमंत्रिपदी नेमणूक करण्यात आली होती.
पाकिस्तानचे नवीन लष्कर पथक :
- पठाणकोट येथे लष्कर ए तोयबाने केलेल्या हल्ल्याच्या चौकशीसाठी पाकिस्तानचे पथक लवकरच भारतात येत आहे, तसेच पुरावे गोळा करण्याचे काम हे पथक करणार आहे.
- पाकिस्तानने या प्रकरणी नवीन पथक नेमले असून त्यात अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक महंमद ताहीर, पोलिस उपमहासंचालक महंमद अझीम अर्शद, आयएसआयचे तन्वीर अहमद, लष्करी गुप्तचर खात्याचे लेफ्टनंट कर्नल इरफान मिर्झा, तपास अधिकारी शाहीद तन्वीर यांचा समावेश आहे.
- पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नफीस झकारिया यांनी सांगितले की, विशेष चौकशी पथक पठाणकोट येथील हवाई तळाला भेट देणार आहे.
- विशेष चौकशी पथकात नागरी, लष्करी गुप्तचर संस्थांचे तज्ञ असतील व हे चौकशी पथक पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी जानेवारीतील या हल्ल्याच्या चौकशीसाठी स्थापन केले आहे.
- अंतर्गत सुरक्षा मंत्री चौधरी निसार अली खान यांनी सांगितले की, पुरावे गोळा करण्यासाठी येणाऱ्या पाकिस्तानच्या चौकशी पथकाला भारताने परवानगी दिली आहे.
- पाकिस्तानने या प्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला असून त्यामुळे हल्ल्यात जे सामील असतील त्यांच्यावर खटला चालवण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
अमेरिकन सिनेटरने हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज्मध्ये ‘संयुक्त ठराव’ :
- पाकिस्तानला आठ एफ-16 लढाऊ विमानांसह शस्त्रास्त्रे विकण्याच्या कराराला काँग्रेसची नापसंती असल्याचे दाखविण्यासाठी वरिष्ठ अमेरिकन सिनेटरने हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज्मध्ये ‘संयुक्त ठराव’ मांडला आहे.
- अमेरिकेकडून मिळणाऱ्या शस्त्रांचा वापर पाकिस्तान आपल्याच नागरिकांना (विशेषत: बलुचिस्तानमधील) दडपण्यासाठी वापरत आहे, असे डॅना रोहराबाचेर यांनी (दि.25) वरील ठराव मांडताना म्हटले.
- भारतात लोकसभा हे जसे कनिष्ठ लोकप्रतिनिधीगृह आहे तसेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आहे.
- तसेच या महिन्यात बराक ओबामा प्रशासनाने पाकिस्तानला 700 दशलक्ष अमेरिकन डॉलरची शस्त्रास्त्रे विकण्याचा करार अधिकृतपणे जाहीर केला होता.
फिफाच्या अध्यक्षपदी गियानी इन्फॅन्टिनो :
- जागतिक फुटबॉल संस्था (फिफा)च्या अध्यक्षपदाच्या शर्यतील युरोपचे गियानी इन्फॅन्टिनो हे निवडून आले आहे.
- फिफा अध्यक्षपदाच्या निवडणूकीत गिलानी इन्फॅन्टिनो यांच्यासह पाच जणांमध्ये ही लढत होती.
- मात्र फिफा अध्यक्षपदाच्या निवडणूकीत खरी लढत युएफाचे सरचिटणीस गिलानी इन्फॅन्टिनो आणि आशियाई फूटबॉल संघाचे नेते शेख सलमान यांच्यात होती.
- अखेर यामध्ये गिलानी इन्फॅन्टिनो यांनाच बहुमत मिळाल्याने फिफाच्या अध्यक्षपदी त्यांचीच निवड करण्यात आली.
- फिफा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात गिलानी इन्फॅन्टिनो यांना 207 पैकी 115 मते मिऴाली.
- आशियाई फूटबॉल संघाचे नेते शेख सलमान यांनी 88 मते मिऴाली.
एच-1 बी व्हिसावर सिनेटर्सचे टीकास्त्र :
- लोकप्रिय असलेल्या एच-1 बी व्हिसा कार्यक्रमावर वरिष्ठ अमेरिकी सिनेटर्सनी टीका केली आहे.
- अमेरिकी कर्मचाऱ्यांना काढून भारतासह अन्य देशांचे कर्मचारी कमी वेतनात ठेवण्यासाठी या व्हिसाचा दुरुपयोग करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
- तसेच यासंदर्भातील समितीचे प्रमुख सिनेटर जेफ सेशन्स म्हणाले की, अमेरिकेत कुशल कामगारांची टंचाई आहे, ही खेदाची बाब आहे.
- अमेरिकेत अमेरिकी कर्मचाऱ्यांना कमी करून त्यांच्या जागेवर परदेशातील कर्मचारी ठेवले जात आहेत, ही धक्कादायक बाब आहे.
- अमेरिकेत कुशल कर्मचाऱ्यांची वानवा असल्याचा आरोप अनेक कंपन्या करीत असतात.
दिनविशेष :
- 1912 : मराठीतील ज्येष्ठ कवी व नाटककार वि. वा. शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्म, हा दिवस “मराठी भाषा दिवस” मराठी भाषा दिवस शुभेच्छापत्रे म्हणून साजरा केला जातो.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा