Current Affairs of 27 June 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (27 जून 2016)

भारतासाठी अमेरिकेचे 99 टक्के तंत्रज्ञान :

  • अमेरिकेशी संरक्षण सहकार्य करार केलेल्या देशांपैकी केवळ भारतालाच लवकरच अमेरिकेच्या अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानापैकी 99 टक्के तंत्रज्ञानाचा वापर करता येणार आहे.
  • अमेरिकेने भारताला “महत्त्वाचा संरक्षण सहकारी” म्हणून जाहीर केल्यामुळे भारताला हा फायदा होणार असल्याचे अमेरिकी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
  • “भारताला हा दर्जा दिला गेला असल्याने आमच्या इतर सहकाऱ्यांना न मिळू शकणारी माहिती भारताला मिळणार आहे, अमेरिकेने असा दर्जा दिलेला भारत हा एकमेव देश आहे,’ असे या अधिकाऱ्याने सांगितले.
  • काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची अमेरिकेत भेट घेतली होती.
  • तसेच त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ओबामा यांनी भारताला हा दर्जा देत असल्याचे जाहीर केले होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 जून 2016)

आशा कुमारी यांची कॉंग्रेस प्रभारीपदी निवड :

  • कॉंग्रेसच्या सरचिटणीस आशा कुमारी यांची पंजाब कॉंग्रेस कमिटीच्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • पंजाब दंगल प्रकरणावरून तत्कालीन प्रमुख कमल नाथ यांना भारतीय जनता पक्ष, तसेच आम आदमी पक्षाने लक्ष्य केल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
  • तसेच त्यानंतर आशा कुमारी यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
  • कुमारी या हिमाचल प्रदेशमधील डलहैसी मतदारसंघातून आमदार आहेत.
  • कॉंग्रेस पक्षासाठी त्यांनी आत्तापर्यंत उल्लेखनीय योगदान दिले आहे.

रियो ऑलिम्पिकसाठी भारताचे 100 खेळाडू पात्र :

  • ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताचे प्रथमच शंभरपेक्षा जास्त खेळाडू पात्र ठरले आहेत.
  • रियोला जाणाऱ्या विविध खेळांच्या पथकांची संख्या 103 झाल्यामुळे आतापर्यंत खेळाडू पात्रतेची सेंच्युरी साजरी केली आहे.
  • तसेच आतापर्यंत हा सर्वांत मोठा संघ असणार आहे.
  • (दि.26) अ‍ॅथलेटिक्स प्रकारात तीन, तर आर्चरीमध्ये एका खेळाडू रियोचे तिकीट मिळविल्यानंतर भारताची संख्या 103 वर गेली आहे.
  • तसेच यापूर्वी 2012 लंडन ऑलिम्पिसाठी 13 क्रीडा प्रकारात 83, 2008 मध्ये बीजिंगसाठी 12 क्रीडा प्रकारासाठी 57, 2004 मध्ये अथेन्ससाठी 14 क्रीडा प्रकारात 73, 2000 मध्ये सिडनीसाठी 8 क्रीडा प्रकारांत 65, 1996 मध्ये अटलांटामध्ये 13 क्रीडा प्रकारासाठी 49, तर 1992 मध्ये बार्सिलोना येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी 53 खेळाडू पात्र झाले होते.

शरद पवार यांना ‘शाहू’ पुरस्कार प्रदान :

  • देशापुढील आजच्या आर्थिक, सामाजिक अशा सर्वच प्रश्नांची उत्तरे राजर्षी शाहू महाराजांच्या अलौकिक विचारांमध्ये आहेत.
  • तसेच त्यांनी देशातील परिवर्तनाच्या चळवळीला दृष्टी देण्याचे काम केले.
  • असा थोर राजा या नगरीमध्ये होऊन गेला हे आपले भाग्यच म्हटले पाहिजे, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी (दि.26) शाहू विचारांचा गौरव केला.
  • राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा अत्यंत मानाचा ‘शाहू’ पुरस्कार शरद पवार यांना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
  • अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे पालकमंत्री व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील होते.
  • तसेच मानाचा कोल्हापुरी फेटा, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि 1 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

आयफा चित्रपट पुरस्कार 2016 :

  • आयफा चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘बाजीराव मस्तानी’ तील भूमिकेसाठी रणवीरसिंगला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि ‘पिकू’तील भूमिकेसाठी दीपिका पदुकोणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
  • स्पेनमधील माद्रिद शहरात झालेल्या या 17 व्या आयफा पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची उपस्थिती होती.
  • तसेच या पुरस्कार सोहळ्यात रणवीरसिंग, दीपिका पदुकोणप्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाने बाजी मारली.
  • ‘बाजीराव-मस्तानी‘साठी संजयलीला भन्साळी यांना सर्वोत्कृष्ट दिर्ग्दशकाचा, तर सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.
  • या सोहळ्यात ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाला एकूण नऊ पुरस्कार मिळाले.

दिनविशेष :

  • अमेरिका एच.आय.व्ही. चाचणी दिन.
  • 1864 : शिवराम महादेव परांजपे, ‘काळ’ या वृत्तपत्राचे संपादक व प्रखर राष्ट्रीय नेते यांचा जन्म.
  • 1967 : लंडनजवळ एन्फिल्ड येथे जगातील पहिले ए.टी.एम. (Automated teller machine) सुरू झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 जून 2016)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago