चालू घडामोडी (27 मे 2017)
महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय पाटील :
- वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाची मातृसंस्था असलेल्या महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी खासदार संजय पाटील यांची निवड झाली आहे.
- तसेच त्याचा उच्चार वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सातव्या पदवीदान समारंभात करण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार पाटील यांनी वालचंद महाविद्यालयाच्या प्रगतीतील सर्व अडथळे दूर होतील, असा विश्वास व्यक्त केला.
- पुणेस्थित एमटीई सोसायटीच्या संस्थेच्या मालकीवरून सध्या न्यायालयीन स्तरावर वाद सुरू आहे. सचिव श्रीराम कानिटकर यांच्या गटाचे अध्यक्ष म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख सध्या कार्यरत आहेत. त्याचवेळी आता अध्यक्ष विजय पुसाळकर यांनी राजीनामा देऊन खासदार पाटील यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे.
- संस्थेचे पुण्यात होमिओपॅथी महाविद्यालय असून सांगलीत वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मालकीचा दावा देशमुख गटाने केला असून आता या वादाला खासदार पाटील यांच्या निवडीने दोन्ही बाजूने भाजप अंतर्गत संघर्षाचा राजकीय रंग मिळाला आहे.
‘सुपरकॉप’ के पी एस गिल कालवश :
- पंजाबमधील खलिस्तानी दहशतवादाचा नि:पात करण्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडलेल्या के पी एस गिल यांचे 26 मे रोजी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.
- खलिस्तानी दहशतवादाचे आव्हान समूळ नष्ट करणाऱ्या गिल यांना तत्कालीन माध्यमांनी ‘सुपरकॉप’ अशी पदवी बहाल केली होती. गिल यांनी पंजाब राज्याचे पोलिस महासंचालक पद दोनदा भूषविले होते.
- निवृत्तीनंतर गिल यांची नियुक्ती भारतीय हॉकी संघटनेच्या अध्यक्षपदी करण्यात आली होती. गिल यांना 1989 मध्ये पद्मश्रीनेही गौरविण्यात आले होते.
चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास :
- आतापर्यंत सातवेळा खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी दोनवेळा बाजी मारली आहे.
- दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका व वेस्ट इंडिजने प्रत्येकी एकदा जेतेपद मिळवले आहे.
- 2002 साली भारत व श्रीलंकेला पावसाच्या व्यत्ययामुळे संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात आले.
- क्रिकेटच्या इतिहासामध्ये न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आयसीसी स्पर्धा म्हणून केवळ याच स्पर्धेचे विजेतेपद आहे.
- दोन महिन्यांच्या आयपीएल सर्कसनंतर क्रिकेटप्रेमींना वेध लागले ते आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे. आयसीसी क्रमवारीतील अव्वल आठ संघांमध्ये खेळली जाणारी ही स्पर्धा यंदा ‘चॅम्पियन्सचा वर्ल्डकप’ म्हणूनही ओळखली जात आहे.
- विशेष म्हणजे, या स्पर्धेत भारतीय संघ गतविजेता असल्याने भारतीयांची उत्सुकता ताणली आहे.
‘सचिन..अ बिलिअन ड्रीम्स’ हा सिनेमा महाराष्ट्रात करमुक्त :
- भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारीत ‘सचिन..अ बिलिअन ड्रीम्स’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त झाला आहे.
- क्रीडा क्षेत्रात सचिन दिलेल्या योगदानाचा सन्मान आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचावा या दुहेरी उद्देशाने महाराष्ट्र सरकारने या चित्रपटावरील मनोरंजन कर माफ केला आहे.
- ब्रिटीश दिग्दर्शक जेम्स एर्स्किन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. देशभरातील सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, सचिनच्या आयुष्यातील अनेक माहिती नसलेल्या गोष्टी या चित्रपटातून समजणार आहेत.
- तसेच ओडिसा, केरळ आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये हा चित्रपट आधीच करमुक्त झाला आहे.
दिनविशेष :
- प्रख्यात कादंबरीकार, कवी, मर्मग्राही समीक्षक ‘डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे’ यांचा जन्म 27 मे 1938 मध्ये झाला.
- 27 मे 1964 हा भारताचे पहिले पंतप्रधान ‘पंडित जवाहरलाल नेहरू’ यांचा स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा