चालू घडामोडी (27 मे 2018)
यंदाही ‘सीबीएसई’त मुलींची बाजी :
- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून नोएडातील मेघना श्रीवास्तव ही विद्यार्थिनी 499 गुण मिळवत देशात प्रथम आली आहे. तर 498 गुण मिळवत गाझियाबादमधील अनुष्का चंद्रा दुसरी आली आहे. तसेच लुधियानाच्या आस्था बांबा या विद्यार्थीनीने तृतीय क्रमांक मिळविला असून जयपूरची चाहत भारद्वाज आणि हरिद्वारची तनुजा कापरी यांनी अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक मिळविला आहे.
- तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली असून यंदाचा निकाल 83.01 टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात एक टक्क्याने वाढ झाली आहे.
- निकाल पाहण्यासाठी मायक्रोसॉफ्टने विद्यार्थ्यांसाठी खास एसएमएस ऑर्गनायझर अॅप बनवले आहे. विद्यार्थी ऑफलाइन असतानाही या अॅपच्या माध्यमातून निकाल पाहू शकणार आहेत. या अॅपचा उपयोग करताना विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, शाळेचा कोड आणि जन्मतारीख टाकावी लागणार आहे. तसेच cbseresults.nic.in, cbse.nic.in and results.nic.in. या संकेतस्थळांवरही विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.
ई-फायलिंगसाठी 7 आयटीआर फॉर्म जारी :
- ई-फायलिंगसाठी प्राप्तिकर विभागाने सर्व सात आयकर परताव्याचे (आयटीआर) फॉर्म जारी केले आहेत. यामुळे करदात्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने परतावा भरणे सोपे झाले आहे.
- सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (सीबीडीटी) 2018-19 या वर्षासाठी मागील महिन्यात आयकर परताव्याचे नवीन फॉर्म जारी केले होते.
- सीबीडीटीनुसार आता सर्व आयटीआर फॉर्म ई-फायलिंगसाठी उपलब्ध आहेत.
- कर विभागाकडून 5 एप्रिलनंतर आयटीआर फॉर्म जारी केले जात आहेत.
- तर 31 तारखेच्या अगोदर सर्व सात फॉर्म विभागाच्या https://www.incometaxindiaefiling.gov.inवर भरता येतील.
वेतन ब्रेक-अप, जीएसटी नंबर द्यावा लागेल
- नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशमधील बागपत ईस्टर्न पेरिफेरल एस्प्रेसवे (ईपीई) आणि दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेचे उद्घाटन करणार आहेत.
- यावेळी ते दिल्ली ते मेरठ हायवेवर 6 किलोमीटर उघड्या जीपमधून रोड शो करतील. हा देशातील पहिला स्मार्ट आणि ग्रीन हायवे असणार आहे.
- 96 किलोमीटर लांबीच्या या मार्गाच्या निर्मितीसाठी 841 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
- दुसरीकडे, हरियाणाच्या सोनीपतमधील कुंडली येथून पलवल दरम्यानच्या ईपीईसाठी 11 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. या मार्गाची लांबी 135 किलोमीटर आहे.
गीता कपूर यांचे निधन :
- पाकिजा आणि रजिया सुलतान या सिनेमांमधून उल्लेखनीय काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री गीता कपूर यांचे मुंबईतील वृद्धाश्रमात वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
- गीता कपूर यांनी कमाल अमरोही यांच्या पाकीजा सिनेमात राजकुमार यांच्या दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारली होती.
दिनविशेष :
- 1883 मध्ये अलेक्झांडर (तिसरा) रशियाचा झार बनला.
- महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना 1906 मध्ये झाली.
- 1951 मध्ये मुंबई येथे तारापोरवाला मत्स्यालय सुरू झाले.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे 1935 मध्ये निधन झाले.
- 1964 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा