चालू घडामोडी (27 नोव्हेंबर 2017)
मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम :
- चोवीस तासांत 969 विमानांचे टेकऑफ आणि लॅंडिंग करण्याचा विश्वविक्रम मुंबई विमातळाने केला आहे. या विमानतळाने आपलाच 935 विमानांच्या टेकऑफ आणि लॅंडिंगचा विक्रम मोडीत काढला.
- आता 24 तासांत एक हजार विमानांचे लॅंडिंग आणि टेकऑफ करण्याचे विमानतळ प्राधिकरणाचे ध्येय आहे.
- मुंबई विमानतळावर दोन धावपट्ट्या असल्या तरी त्या एकमेकांना छेदत असल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम होतो. त्यामुळे एकच धावपट्टी वापरली जाते; मात्र या आव्हानाशी दोन हात करत मुंबई विमानतळाने 24 नोव्हेंबर रोजी पहाटे 5.30 ते 25 नोव्हेंबर पहाटे 5.30 या 24 तासांत हा विश्वविक्रम केला. या कालावधीत तासाला सरासरी 50 विमाने झेपावली आणि उतरली.
- दिवसाला एक हजार विमानांचे टेकऑफ आणि लॅंडिंग करण्याचे ध्येय असल्याचे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने सांगितले. हा विक्रम करण्यासाठी वाऱ्याचा वेग आणि दृष्यमानताही महत्त्वाची होती. वातावरणानेही साथ दिल्यामुळे हा विश्वविक्रम झाल्याचेही प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरीमधील कोतवडे ठरणार गांडूळ खताचे गाव :
- तालुक्यातील कोतवडे येथील शेतकऱ्यांनी शेती उत्पादन वाढवण्यासाठी गांडूळ खत प्रकल्प सुरू करायचे ठरवले आहे. अनुलोम संस्थेचे मार्गदर्शन व झेप ग्रामविकास महिला मंचाच्या प्रेरणेने ग्रामस्थांनी स्वखर्चाने खतासाठी दोन गादीवाफे केले. पुढील 15 दिवसांत आणखी 12 वाफे केले जाणार आहेत. प्रत्येक घरी असा प्रकल्प करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. यातूनच कोतवड्याला ‘गांडूळ खताचे गाव’ अशी नवी ओळख मिळणार आहे.
- कोतवडे येथील शेतकरी वर्षाला सुमारे पाच-सहा हजार रुपयांचे खत विकत घेतात. तेवढ्याच रुपयांत दुप्पट खत मिळू शकेल, या अनुलोमच्या सल्ल्यानंतर शेतकरी खूश झाले आणि त्यांनी गांडूळ खतनिर्मिती करण्याचे ठरवले. शेतीसाठी लागणारे खत वापरून उर्वरित खताची विक्री करून पैसेही मिळू शकतात. याकरिता अनुलोमने पहिला कार्यक्रम सनगरेवाडीमध्ये घेतला. तालुका कृषी विभाग-आत्माच्या तालुका समन्वयक सौ. हर्षला पाटील यांनी खताचे प्रात्यक्षिक गावकऱ्यांना दाखवले.
- अनुलोमतर्फे सामाजिक काम व शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जातो व भविष्यात कोतवड्यात शेतकऱ्यांचे गट करून त्यांना कृषी विभागाशी जोडले जाणार आहे, असे अनुलोम रत्नागिरी-सिंधुदुर्ग संस्थेचे उपविभागप्रमुख स्वप्नील सावंत यांनी सांगितले. लोकसहभागातून गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प विकासाचे केंद्र बनेल. शेतीतील परिवर्तनला सुरवात झाली आहे, असे अनुलोमचे भाग जनसेवक रवींद्र भोवड यांनी सांगितले.
डेमी नेल पीटर्स ठरली मिस युनिव्हर्स :
- मिस युनिव्हर्स 2017 चा किताब दक्षिण आफ्रिकेकडे गेला आहे. डेमी नेल पीटर्स ही यंदाच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेची विजेती ठरली आहे.
- लासवेगासमध्ये झालेल्या सोहळ्यात मिस साऊथ आफ्रिका असलेल्या डेमी नेल पीटर्सला विजेती घोषीत करण्यात आले.
- डेमी नेल पीटर्सला 2016 ची मिस युनिव्हर्स आयरिस मिट्टीनेएर (फ्रान्स) हिने मानाचा मुकुट प्रदान केला.
- दक्षिण आफ्रिकेच्या डेमी नेल पीटर्सला मिस जमाईका डेविना बॅनेट आणि मिस कोलंबियाचं लौरा गोन्जालेज तगड आव्हान होते. या स्पर्धेत मिस जमाईकाने तिसरे स्थान मिळवले तर फर्स्ट रन अप मिस कोलंबिया झाली.
- मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावे करायला दुनियाभरातून 92 सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. पण अंतिम फेरीत फक्त आफ्रिका, जमाईका आणि कोलंबियाने मजल मारली. 26 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय वेळेनुसार लास वेगास येथे सायंकाळी सात वाजता (भारतीय वेळेनुसार 27 नोव्हेंबरला पहाटे साडेपाच वाजता) ही स्पर्धा सुरू झाली होती.
- मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेत श्रद्धा शशिधरने भारताचे नेतृत्व केले होते. पण टॉप 10ची यादी श्रद्धाला गाठता न आल्याने भारताकडे मिस युनिव्हर्सचा किताब येण्याचे स्वप्न भंगले.
न्यूझीलंडमध्ये जगातील पहिला रोबोट नेता :
- न्यूझीलंडच्या वैज्ञानिकांनी जगातील पहिला असा रोबोट विकसित केला आहे, जो नेता बनेल. कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या या रोबोट नेत्याने अलीकडेच घर, शिक्षण, व्हिसासंबंधी धोरणे आणि स्थानिक मुद्द्यांवर विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिली.
- राजकारणात पारदर्शकता आणण्यासाठी त्याला 2020 मध्ये न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवार करण्याची तयारी सुरू झाली आहे.
- या यांत्रिकी नेत्याचे नाव ‘सॅम’ (एसएएम) आहे. न्यूझीलंडचे 49 वर्षीय उद्योगपती निक गॅरिट्सन यांनी तो विकसित केला आहे.
- जगातील नेते जलवायू परिवर्तन आणि समानता यांसारख्या जटिल मुद्द्यांवर तोडगा काढू शकत नाहीत. न्यूझीलंडमध्ये 2020 अखेर सार्वत्रिक निवडणूक होईल. तेव्हा सॅम उमेदवार म्हणून दावा सादर करू शकेल.
दिनविशेष :
- इ.स. 1815 मध्ये 27 नोव्हेंबर रोजी पोलंड राज्याच्या संविधान स्वीकारले गेले.
- सन 1888 मध्ये 27 नोव्हेंबर रोजी भारतीय लोकसभेचे पहिले सभापती ‘गणेश वासुदेव मावळंकर’ यांचा जन्म झाला.
- 27 नोव्हेंबर 2008 हा दिवस भारताचे 7वे पंतप्रधान ‘विश्वनाथ प्रताप सिंग’ यांचे स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा