चालू घडामोडी (27 सप्टेंबर 2016)
लोकप्रिय गुगल वेबला 18 वर्ष पूर्ण :
- आपल्या सर्वांच्या रोजच्या दैनंदिन वापरात येणा-या गूगलचा आज (दि.27) वाढदिवस आहे.
- गूगलचा आज अठरावा वाढदिवस असून यानिमित्ताने खास गूगल डूडलही तयार करण्यात आले आहे.
- 4 सप्टेंबर 1998 रोजी गूगल पहिल्यांदा जगासमोर आले होते.
- लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांच्या हस्ते गूगलची स्थापना करण्यात आली होती.
- खरंतर गूगलचा वाढदिवस नेमका कधी यावरुन वाद झाला होता.
- मात्र गतवर्षी 27 सप्टेंबरलाच वाढदिवस साजरा करण्यात आला होता.
- सर्वांच्याच गळ्यातले ताईत बनलेल्या गूगलचे नामकरण चुकीमुळे झाले होते.
- सर्वांनाच माहित आहे की गुगलचे स्पेलिंग ‘Google’ असे आहे पण खर तर ते ‘Googol’ असे ठेवायच होत.
- पण स्पेलिंग मिस्टेकमुळे हे नाव पडले आणि पुढे तेच प्रसिद्ध झाले.
- पेज आणि ब्रेन यांनी सुरुवातीला गूगलचे नाव ‘बॅकरब’ असे ठेवले होते, मात्र त्यानंतर गूगल असे नाव करण्यात आले.
ऐतिहासिक 500 व्या कसोटीत भारताला विजय :
- रविचंद्रन आश्विनच्या फिरकीने पुन्हा एकदा कमाल केली. आश्विनच्या (6 बळी) भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात (दि.26) पाचव्या व अखेरच्या दिवशी न्यूझीलंडचा 197 धावांनी पराभव करीत आपल्या ऐतिहासिक 500 व्या कसोटी सामन्याला संस्मरणीय केले.
- 434 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा दुसरा डाव पाचव्या व अखेरच्या दिवशी उपाहारानंतर काही वेळांतच 236 धावांत संपुष्टात आला.
- भारताने या निकालासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेत आयसीसी क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावण्याच्या दिशेने वाटचाल केली.
- आश्विनने अनुकूल स्थितीचा लाभ घेताना 132 धावांच्या मोबदल्यात 6 बळी घेतले. त्याने या लढतीत एकूण 10 बळी घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
- तसेच मोहम्मद शमीने (2-18) दोन बळी घेत आश्विनला योग्य साथ दिली.
- रवींद्र जडेजाने एक बळी घेतला. अष्टपैलू कामगिरी करणारा जडेजा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
- भारताची ऐतिहासिक अवकाश भरारी :
- श्रीहरिकोट्टा (आंध्र प्रदेश) भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) (दि.26) अवकाशात आणखी एक ऐतिहासिक झेप घेतली.
- हवामान उपग्रह स्कॅटसॅट-1 आणि अन्य सात उपग्रहांसह भारताचे प्रमुख प्रक्षेपण यान पीएसएलव्ही-सी35 अवकाशात यशस्वीपणे झेपावले.
- आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी आठ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर तयार केलेला ‘प्रथम’ हा उपग्रहही या रॉकेटमधून अवकाशात रवाना झाला.
- झेपावलेल्या यानाचे हे सर्वांत लांबचे उड्डाण असल्याने ‘इस्त्रो’ने आणखी एक यशोशिखर सर केले आहे.
-
- तसेच ही मोहीम यशस्वी झाल्याबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचे; तसेच विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
- श्रीहरिकोट्टा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून सकाळी 9.12 वाजता ‘इस्त्रो‘च्या ‘पीएसएलव्ही-सी35’ या प्रक्षेपकाने अवकाशात उड्डाण केले.
- 2 तास 15 मिनिटे अवकाशात राहून सर्व आठ उपग्रहांना दोन वेगळ्या कक्षांमध्ये सोडण्याचे यापूर्वी कधीच न केलेले काम या वेळी पीएसएलव्ही यानाने चोख बजावले.
- सर्वप्रथम यानाने ‘स्कॅटसॅट-1’ उपग्रहाला त्याच्या कक्षेत नेऊन सोडले अणि त्यानंतर इंजिन पुन्हा सुरू करून उर्वरित सात उपग्रहांना त्यांच्या कक्षेत स्थापित केले. आठही उपग्रहांचे एकूण वजन सुमारे 675 किलोग्रॅम आहे.
लता मंगेशकर यांना बंगभूषण पुरस्कार जाहीर :
- बंगाल सरकारतर्फे दिला जाणारा ‘बंग भूषण’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार गानसम्राज्ञी ‘भारतरत्न’ लता मंगेशकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
- बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी येत्या 20 ऑक्टोबर रोजी मुंबईत येऊन लतादीदींना हा पुरस्कार प्रदान करणार आहेत.
- बंगाली संगीतातील योगदानाबद्दल लतादीदींना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
दिनविशेष :
- जागतिक प्रवासी दिन.
- 1821 : मेक्सिकोला स्पेनपासून स्वातंत्र्य.
- 1825 : द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली.
- 1907 : भारतीय क्रांतिकारी, भगत सिंग यांचा जन्मदिन.
- 1953 : माता अमृतानंदमयी, भारतीय धर्मगुरू जन्मदिन.
- 1972 : भारतीय गणितज्ञ, एस.आर. रंगनाथन स्मृतीदिन.
- 2002 : मराठीमाती या मराठी संकेतस्थळाची सुरूवात.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा