Current Affairs (चालू घडामोडी) of 28 April 2015 For MPSC Exams
Current Affairs On (28 April 2015) In English
Facebook’s Messenger App Now Video Calling :
- Social networking is made available to Facebook users through Facebook’s Messenger app for video calling.
- The facility will be available for iOS and mobile video calling android.
- Messenger app is on the right side of the screen, you can see the icon for video calling and video calling you do not charge any cheating through.
- Earlier, Skype, phesataima and hanging out on the facilities available in the app.
- Currently this facility the US, Canada, UK, has been launched in some countries france.
Rohit Sharma BCCI Recommended For The Arjuna Award:
- Indian cricket team opener Rohit Sharma Indian Cricket Board (BCCI) is recommended for the Arjuna award.
- Last year Sri Lanka ODI innings for his world has been given the name of the recommended 264 runs.
- BCCI secretary Anurag Thakur said the award statement.
8.975 NGOs Canceled Licenses:
- Modi-government organizations in the private or accept donations from abroad have started action (NGOs), the government has canceled the licenses of almost 8.975 NGOs.
- The Modi government had put restrictions on the money abroad to help the organization Greenpeace a few days ago.
- Then Home Ministry sent notices to NGOs 10.343 in 2009-10, 2010-11 and 2011-12 financial year had to submit returns.
- The exact number of the gift was given from abroad.
- Just 229 NGOs presented their annual assessment of the Home Ministry.
- Minister of notisila been announced have been canceled or 8.975 NGOs do not provide licenses answer.
Must Read (नक्की वाचा):
चालू घडामोडी (28 एप्रिल 2015) मराठी
आता फेसबुकच्या मॅसेंजर अॅपमधून व्हिडिओ कॉलिंग :
- सोशल नेटवर्किंग फेसबुकने युजर्ससाठी फेसबुकच्या मॅसेंजर अॅपमधून व्हिडिओ कॉलिंग ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
- व्हिडिओ कॉलिंग ची सुविधा आयओएस आणि अॅन्ड्रॉईड मोबाईलसाठी उपलब्ध असणार आहे.
- मॅसेंजर अॅपच्या स्क्रिनवर उजव्या बाजूला व्हिडिओ कॉलिंगचा आयकॉन दिसणार आहे तसेच याच्या माध्यमातून कोणतेही शुल्क न देता तु्म्ही व्हिडिओ कॉलिंग करू शकणार आहात.
- याआधी स्काइप, फेसटाइम आणि हँगआऊट या अॅपवर ही सुविधा उपलब्ध होती.
- सध्या ही सुविधा अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, फ्रान्ससह काही देशांत सुरू झालेली आहे.
रोहित शर्माची बीसीसीआयने केली अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस :
- भारतीय क्रिकेट संघातील सलामीवीर रोहित शर्माची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
- गेल्यावर्षी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 264 धावांची विश्वविक्रमी खेळी केल्याबद्दल त्याच्या नावाची शिफारस देण्यात आली आहे.
- बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात पुरस्काराबद्दल म्हटले आहे.
8,975 एनजीओंचे परवाने रद्द :
- मोदी सरकारने कारवाईचा धडाका सुरु केला असून परदेशातून देणग्या स्वीकारणा-या गैरसरकारी संस्थांवर (एनजीओ) सरकारने तब्बल 8,975 एनजीओंचे परवाने रद्द केले आहेत.
- तसेच मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी ग्रीनपीस संघटनेच्या विदेशातून मिळणा-या मदतीवर निर्बंध घातले होते.
- त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने भारतातील 10,343 एनजीओंना नोटीस पाठवत 2009-10, 2010-11 आणि 2011-12 या आर्थिक वर्षातील रिटर्न सादर करायला सांगितले होते.
- यात परदेशातून मिळालेल्या देणगीचा नेमका आकडाही समजणार होता.
- यातील फक्त 229 एनजीओंनी त्यांचा वार्षिक लेखाजोखा गृहमंत्रालयाला सादर केला आहे.
- गृहमंत्रालयाच्या नोटिसीला उत्तर न देणा-या 8,975 एनजीओंचे परवाने रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.