चालू घडामोडी (28 डिसेंबर 2016)
राज्याच्या महाधिवक्तापदी अॅड. रोहित देव यांची नियुक्ती :
- तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर राज्याच्या महाधिवक्तापदी अॅड. रोहित देव यांची नियुक्ती करण्यात आली.
- देव यांच्या नियुक्तीची राज्यपालांकडे शिफारस करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
- देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर नागपूरचे अॅड. श्रीहरी अणे यांची महाधिवक्तापदी नियुक्ती शासनाने केली होती.
- अणे यांनी राजीनामा दिल्यानंतर अॅड. शशांक मनोहर यांची महाधिवक्तापदी नियुक्ती झाली. तथापि, मनोहर यांनीही राजीनामा दिला. तेव्हापासून महाधिवक्तापद रिक्त होते.
- अॅड. देव हेही नागपूरचे असून सध्या ते कार्यकारी महाधिवक्ता म्हणून कार्यरत होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांना ‘नागभूषण पुरस्कार’ जाहीर :
- नागभूषण फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘नागभूषण पुरस्कार’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख व सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- नागभूषण फाउंडेशनचे सचिव डॉ. गिरीश गांधी यांनी 27 डिसेंबर रोजी ही घोषणी केली.
- मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांच्यानंतर फडणवीस यांच्या रूपाने राज्याला विदर्भाचा मुख्यमंत्री मिळाला आहे, त्यांनी कार्यक्षम मुख्यमंत्री अशी प्रतिमा निर्माण केली आहे. म्हणूनच त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली, असे डॉ. गांधी यांनी सांगितले.
- पुरस्काराचे वितरण 1 जानेवारी 2017 रोजी राष्ट्रभाषा संकुलातील साई सभागृहात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
देशातील 20 हजार एनजीओंचे परवाने रद्द :
- परकी निधी नियमन कायद्याचे (एफसीआरए) उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारने 20 हजार स्वयंसेवी संस्थांविरोधात (एनजीओ) कारवाई करीत त्यांचे एफसीआरएचे परवाने रद्द केल्याची माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे.
- गृह मंत्रालयाने केलेल्या पाहणीत 20 हजार एनजीओंनी “एफसीआरए“तील काही तरतुदींचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. अशा एनजीओंविरोधात कारवाई करून त्यांचा एफसीआरएचा परवाना रद्द करण्यात आला असून, त्यांना आता परदेशातून निधी स्वीकारता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
- देशभरात आतापर्यंत एकूण 33 हजार एनजीओ अधिकृतरीत्या कार्यरत होते. या कारवाईनंतर त्यांची संख्या 13 हजार झाली आहे.
- एनजीओंकडून सुरू असलेल्या कामकाजाची तपासणी वर्षभरापासून सुरू असून, त्यातून समोर आलेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे गृह मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
- एफसीआरएनुसार जे एनजीओ पूर्वपरवानगी प्रकारात मोडतात, त्यांना गृह मंत्रालयाच्या परवानगीशिवाय परदेशातून निधी स्वीकारता येत नाही.
अस्मितादर्श संमेलनाध्यक्षपदी प्रज्ञा दया पवार :
- गेल्या चार दशकांपासून महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेर होत असलेल्या अस्मितादर्शचे 34 वे साहित्य संमेलन यंदा लातूरमध्ये 14 जानेवारी 2017 रोजी होत आहे.
- संमेलनाध्यक्षपदी डॉ. प्रज्ञा दया पवार यांची तर स्वागताध्यक्षपदी पत्रकार जयप्रकाश दगडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
- संमेलनाचे उद्घाटन विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. माधव गादेकर यांनी पत्र परिषदेत दिली.
- प्राचार्य डॉ. माधव गादेकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्य व तत्वज्ञानातून मानवतावादी प्रागतिक मूल्यविचार उजागर करण्याच्या भूमिकेतून लातूर येथील दयानंद सभागृहात हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
- वैचारिक अभिसरणाच्या दृष्टीने एक नवा सामाजिक संदेश या संमेलनाच्या निमित्ताने राज्यभरात जाणार आहे.
- संविधानाचे शिल्पकार आणि दलित साहित्याचे प्रेरणास्थान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीचे औचित्य साधून अस्मितादर्श चळवळीचे प्रणेते आणि दलित साहित्याचे अध्वर्यु डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या प्रेरणेने संमेलनासाठी लातूरची निवड करण्यात आली आहे.
मिथुन चक्रवर्ती यांचा राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा :
- तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेत दाखल झालेले अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी 26 डिसेंबार रोजी खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
- प्रकृती अस्वास्थ्यामुळे चक्रवर्ती यांनी राजीनामा दिला असून त्यांच्या खासदारकीचा कार्यकाळ संपण्यासाठी आणखी दीड वर्षांचा कालावधी बाकी होता.
- मिथुन चक्रवर्ती यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा दिला. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते डेरेक ओब्रायन यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
- तृणमूल काँग्रेसने फेब्रुवारी 2014 मध्ये मिथून चक्रवर्ती यांना राज्यसभेत खासदार म्हणून पाठवले होते.
- मात्र पश्चिम बंगालमधील बहुचर्चित शारदा घोटाळ्यात मिथून चक्रवर्ती यांचे नाव आल्याने ते अडचणीत आले होते.
- तसेच या घोटाळ्याप्रकरणी मिथून चक्रवर्ती यांना सक्तवसुली संचालनालयाने समन्सही बजावले होते.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा