Current Affairs of 28 December 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (28 डिसेंबर 2017)

चालू घडामोडी (28 डिसेंबर 2017)

शिक्षण हक्क पूर्वप्राथमिकपासून :

  • शिक्षण हक्क अधिकाराच्या (आरटीई) कक्षेमध्ये पूर्वप्राथमिक शिक्षण आणण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय लवकरच विधेयक तयार करणार आहे. तसे झाल्यास तीन वर्षे पूर्ण करणाऱ्या गरीब, गरजू, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी नर्सरीपासूनच पंचवीस टक्के जागा सर्व शाळांना राखून ठेवाव्या लागतील.
  • मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू करणाऱ्या सध्याच्या कायद्यानुसार, शिक्षण हक्क अधिकार 6 ते 14 वर्षांपर्यंत लागू होतो. म्हणजे पहिली ते आठवीपर्यंतच्या प्रवेशासाठी 25 टक्के जागा गरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवाव्या लागतात.
  • पण सहाव्या वर्षांपासून शिक्षण हक्क बनल्यामुळे वंचित घटकांतील विद्यर्थ्यांना पूर्वप्राथमिक (नर्सरी, ज्युनिअर केजी, सीनिअर केजी) शिक्षण मोफत आणि सक्तीने मिळण्यास बाधा येत होती. ही अडचण लक्षात घेऊन कायद्यामध्ये दुरुस्तीचा मंत्रालयाचा विचार आहे. लवकरच त्याचे विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळासमोर येणार आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी मोक्कातून मुक्त :

  • मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह, रमेश उपाध्याय, अजय राहिकर, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांना अंशतः दिलासा दिला. या सर्वांना ‘मोक्का’ कायद्यातून मुक्त करण्यात आले आहे.
  • बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) या कायद्यातील कलमांतर्गत तसेच भारतीय दंड संहितेतील अन्य कलमांतर्गत हा खटला चालणार आहे. शिवनारायण कालसंग्राही, श्याम शाहू, प्रवीण टक्कलकी या तिन्ही आरोपींना या खटल्यातून मुक्त केले आहे.
  • मालेगाव बॉ़म्बस्फोटाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयात सुनावणी झाली. आम्हाला आरोपमुक्त करावे, अशी मागणी करणारी याचिका साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांच्यावतीने न्यायालयात केली होती. न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. मात्र दुसरीकडे पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह, अजय राहिकर, रमेश उपाध्याय यांना ‘मोक्का’ कलमातून मुक्त केले.

आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार :

  • भारतीय वंशाचे अमेरीकेतील हौशी चित्रपट निर्माते पुनम आणि आशिष सहस्त्रबुध्दे या दांम्पत्याने चित्रपट क्षेत्रात केलेले पदार्पण चांगलेच यशस्वी ठरले आहे. जस्ट वन मोअर डे या त्यांच्या चित्रपटाने राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय अनेक पुरस्कार मिळविले आहेत.
  • लॉस एंजलिस आणि न्युयॉर्क येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘जस्ट वन मोअर डे’ या चित्रपटाने स्थान मिळविले आहे.
  • विशेष म्हणजे त्यांच्या या यशात त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा रिषी याचा मोलाचा सहभाग आहे. त्याला या चित्रपटातील निक या रोलसाठी लॉस एंजलिस चित्रपट महोत्सवात बेस्ट यंग अॅक्टरचा पुरस्कार देखील मिळाला आहे.
  • तसेच या चित्रपटात एका लष्करी कुटूंबाची कथा सांगितली आहे. या लष्करी कुटूंबाच्या आयुष्यातील भावनिक रोलर कोस्टरवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे.

जीएसटीमुळे सरकारच्या महसुलात घट :

  • जीएसटीमुळे सर्वसामान्यांना थोडाफार दिलासा मिळाला असला तरी सरकारच्या महसुलात मात्र सध्या घट झाल्याचे दिसत आहे.
  • सरकार येत्या तीन महिन्यात आणखी 50 हजार कोटी रूपयांचे कर्ज घेणार आहे. सरकारकडून यासंबंधीची माहिती देण्यात आली.
  • विविध योजनांशी निगडीत खर्च आणि व्याज देण्यासाठी सरकार हे कर्ज घेत असल्याचे सांगण्यात येते. निर्धारित सिक्युरिटिजच्या माध्यमातून सरकार हे कर्ज घेत आहे.
  • तसेच यामागे सरकारी महसुलात झालेली घट आणि जुलैपासून जीएसटीची झालेली कमी वसुली हे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.

नवीन फेसबूकसाठी आधारची माहिती द्यावी लागणार :

  • फेसबुकवर आता नव्याने खाते काढायचे असेल तर तुम्हाला आधारची सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे, पण त्याची सक्ती केलेली नाही असे आता स्पष्ट झाले आहे.
  • समाज माध्यमातील महत्त्वाचे संकेतस्थळ असलेल्या फेसबुकवर आधारची माहिती विचारण्यात आल्याचा स्क्रीनशॉट एका वापरकर्त्यांने रेडिटवर टाकला आहे.
  • तसेच या स्क्रीनशॉटमध्ये फेसबुकने आधारची माहिती विचारल्याचे दिसत आहे. वापरकर्त्यांचे पहिले नाव नंतर आडनाव हे आधारकार्डवर असेल तसेच सांगावे लागते.
  • फेसबुकचे प्रमुख मार्क झकरबर्ग यांनी सांगितले, की आम्ही मर्यादित वापरकर्त्यांना ही माहिती केवळ चाचणीचा भाग म्हणून विचारत आहोत. जरी आधार कार्डची माहिती विचारण्यात येत असली तरी त्याची सक्ती करण्यात आलेली नाही.

राज्यातील 60 हजार संस्थांची नोंदणी रद्द :

  • गरीब रुग्णांकडे दुर्लक्ष करणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांना दणका दिल्यानंतर धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी आता धर्मादाय संस्थांकडे मोर्चाकडे वळवला आहे.
  • राज्यातील 1 लाख 30 हजार संस्थांना धर्मादाय आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून तब्बल 60 हजार संस्थांची नोंदणीच रद्द करण्यात आली आहे.
  • नोंदणी रद्द केलेल्या संस्था महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कायद्यांचे उल्लंघन करत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
  • सार्वजनिक विश्वस्त कायद्यांतर्गत राज्यात सुमारे 8 लाख संस्थांची नोंदणी झालेली आहे. यातील 3 लाख 95 हजार 308 संस्था अस्तित्वात असल्या तरी त्या सक्रीय नाहीत.

दिनविशेष :

  • सन 1885 मध्ये 28 डिसेंबर रोजी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस राजकीय पक्ष स्थापन झाला.
  • टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 मध्ये झाला.
  • मुंबई राज्यात कसेल त्यांची जमीन हा कुळ कायदा 28 डिसेंबर 1948 रोजी लागू झाला.
  • भारताचे केंद्रीय मंत्री रुण जेटली यांचा जन्म 28 डिसेंबर 1952 मध्ये झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

आजच्या चालू घडामोडींचा व्हिडिओ

{source}
<iframe width=”350″ height=”250″ src=”https://www.youtube.com/embed/Qzb0cClBYR8?autoplay=1″ frameborder=”0″ gesture=”media” allow=”encrypted-media” allowfullscreen></iframe>
{/source}
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.