चालू घडामोडी (28 जानेवारी 2016)
पासपोर्ट कार्यालयाकडून तत्काळ पासपोर्ट :
- पासपोर्टसाठी पहिल्यांदा अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या आधार कार्डातील व पासपोर्ट केलेली माहिती जुळल्यास त्याला पासपोर्ट कार्यालयाकडून तत्काळ पासपोर्ट देण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय पासपोर्ट विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे.
- पासपोर्टसाठी करण्यात येणारी पोलीस व्हेरिफिकेशनची प्रक्रिया त्यानंतर पार पाडली जाणार आहे, त्यानंतर अर्जदाराला लगेच पासपोर्ट मिळणे शक्य होणार आहे.
- अर्जदाराला पासपोर्टच्या अर्जासोबत केवळ एक प्रतिज्ञापत्र जोडून द्यावे लागणार आहे, त्यामध्ये त्याच्यावर कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा नसल्याचे नमूद करावे लागणार आहे.
- आधार कार्ड व पासपोर्ट लिंक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे आधार कार्डातील माहिती पासपोर्ट कार्यालयास उपलब्ध झाली आहे.
- पासपोर्टसाठी अर्ज करताना आधार कार्ड त्याचबरोबर निवडणूक ओळखपत्र व पॅन कार्डची झेरॉक्सही जोडावी लागणार आहे.
सर्वाधिक वेगाने वृद्धी करणारा देश :
- विद्यमान जागतिक आर्थिक परिस्थितीत भारत एक ‘चमकदार बिंदू’ असल्याचे सिंगापूरच्या एका वरिष्ठ मंत्र्याने संबोधले असून, भारत हाच संपूर्ण जगात वेगाने आर्थिक वृद्धी करणारा देश आहे.
- सिंगापूरचे व्यापार आणि उद्योगमंत्री एस. ईश्वरन यांनी भारताची ही प्रशांसा केली. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विविध आर्थिक पुढाकार आणि सुधारणा यामुळे देशाच्या विकासाला प्रोत्साहन मिळेल.
- 2015 च्या पहिल्या सहामाहीत भारत हाच सर्वाधिक विदेशी गुंतवणूक आकर्षित करणारा देश ठरला.
अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट :
- राजकीय संकटाला सामोरा जात असलेल्या अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशीला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंजूरी दिली आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्यात आली होती.
- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी या आदेशावर सही केल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.
ज्येष्ठ समीक्षक द.भि. कुलकर्णी कालवश :
- ज्येष्ठ कवी, समीक्षक तसेच मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. दत्तात्रय भिकाजी कुलकर्णी उर्फ द.भि. कुलकर्णी यांचे निधन झाले, ते 82 वर्षाचे होते.
- 25 जुलै 1934 साली नागपूरमध्ये जन्मलेल्या द.भि. यांनी नागपूर विद्यापीठातून पी.एच. डी व विदर्भ साहित्य संघाची साहित्य वाचस्पती ही डी.लिट समकक्ष पदवी संपादन केली.
- त्यांच्या अनेक ग्रंथांचा नागपूर, पुणे व उस्मानिया विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत संदर्भग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे.
- 2010 साली पुण्यात झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.
- द.भि. कुलकर्णी यांना 1991 साली महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच ‘अंतरिक्ष फिरलो पण’ या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा ’उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार’ मिळाला होता.
अटल पेंशन योजना अपयशी :
- मोदी सरकारच्या बहुचर्चित अटल पेन्शन योजनेला वर्षभरात फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.
- गतवर्षी 9 मे रोजी लागू केलेल्या या योजनेत वर्षभरात 2 कोटी खाती उघडण्याचे लक्ष्य ठरवले.
- प्रत्यक्षात 16 जानेवारी 16 पर्यंत केवळ 18 लाख 99 हजार लोकांनीच या योजनेत भाग घेतला आहे.
- ज्या वर्गासाठी ही योजना लागू करण्यात आली, त्यात एकतर जागरूकतेचा अभाव तसेच पेंशनच्या रकमेसाठी दीर्घकाळाचा ‘लॉक इन पीरिएड’ असल्याने अनेक वर्षे आपली रक्कम अडकून राहू नये, म्हणून लोकांमध्ये फारसा उत्साह नाही.
- यातील महत्त्वाची त्रुटी अशी की, वयाच्या 20 व्या वर्षी एखाद्या तरुणाने योजनेत खाते उघडले, तर वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत गुंतवलेल्या रकमेतला एक पैसाही त्याला काढता येणार नाही.
- थोडक्यात, रक्कम अडकून रहाण्याचा ‘लॉक इन पीरिएड’ तब्बल 40 ते 42 वर्षांचा आहे, हे लक्षात घेऊन सरकार काही नियम शिथिल करण्याच्या निर्णय घेतला आहे.
असमत अकॅडमी विजेते :
- पुण्याच्या प्रभाकर असमत अकॅडमीने यजमान एस. डी. पाटील ट्रस्टचा 5-2 अशा फरकाने पराभव करत आंतरराज्यस्तरीय हॉकी स्पर्धेतील सुवर्णचषक पटकावला.
- विजेत्या संघास 25 हजार रुपये रोख आणि सुवर्णचषक देऊन गौरविण्यात आले, असमत अकॅडमीचा कुणाल जगदाळे सामनावीर बहुमानाचा मानकरी ठरला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच भारतावर टिपणी :
- अमेरिकी अध्यक्षपद निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच भारतावर टिपणी केली.
- ‘भारताचे उत्तम सुरू आहे.’अध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरल्यानंतर ट्रम्प यांनी पहिल्यांदाच भारताविषयीचे विचार व्यक्त केले.
- ट्रम्प म्हणाले की, भारत व चीनने सोबतच सुरुवात केली.
- अमेरिकेतील रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात भारतात येत आहेत.
दिनविशेष :
- 1865 : लाला लजपतराय, लाल बाल पाल यांचा जन्म.
- 1900 : के.एम.करिअप्पा, भारताचे पहिले सरसेनापती जनरल यांचा जन्म.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा