Current Affairs of 28 July 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (28 जुलै 2015)

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे निधन :

  • भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल यांचे निधन झाले.
  • कलाम 83 वर्षांचे होते.
  • ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’च्या (आयआयएम) कार्यक्रमासाठी ते मेघालयमधील शिलाँग येथे गेले होते.
  • डॉ. कलाम यांचे पार्थिव गुवाहाटीहून नवी दिल्लीला आज नेले जाणार आहे.
  • शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक असलेल्या डॉ. कलाम यांनी 2002 ते 2007 या काळात देशाचे अकरावे राष्ट्रपती म्हणून काम केले.
  • साधी राहणी आणि ऋजू स्वभावामुळे ‘जनतेचे राष्ट्रपती’ म्हणून ते लोकप्रिय ठरले.
  • मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमधून हवाई अभियांत्रिकी शाखेचे अभियंता असलेले डॉ. कलाम भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक ठरले.
  • वाजपेयी यांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आणि त्यांच्याच कारकिर्दीत 1998 मध्ये पोखरणची अणुचाचणी झाली.
  • ‘विंग्ज ऑफ फायर’, ‘इंडिया 2020 ‘आणि ‘इग्निटेड माइंड्‌स’ ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत.
  • अवुल पकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम हे 18 जुलै 2002 रोजी भारताच्या 11 व्या राष्ट्रपतिपदी आरूढ झाले.
  • भारताच्या संरक्षण तंत्रज्ञानाला नवे पंख मिळवून देणारे कलाम यांचे देशाच्या उपग्रह कार्यक्रम, गायडेड आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रकल्प, अण्वस्त्र कार्यक्रम आणि हलक्या लढाऊ विमान प्रकल्पातही त्यांनी योगदान दिलेले आहे.

डॉ.  डॉ. कलाम यांचा जीवनपट

  • पूर्ण नाव : आबुल पाकिर जैनुलादीन अब्दुल कलाम.
  • जन्म. : 15 ऑगसक्टोबर 1931 रोजी रामेश्वरम (तामिळनाडू) येथे
  • प्राथमिक शिक्षण : श्वार्त्ज हायस्कूल, रामअनंतपुरम
  • पदवी : सेंट जोसेफ कॉलेज, तिरुची(विज्ञान)

1  व्यावसायिक :

  • 1954 ते 57 मध्ये एम.आय.टी. मद्रास येथून एअरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये डी.एम.आय.टी.
  • 1958 साली डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये (डीआरडीओ) वरिष्ठ वैज्ञानिकाचे सहायक म्हणून नोकरी.
  • भारताचे पहिले हलके विमान होवर क्राफ्ट विकसित करणाऱ्या चमूच्या प्रमुखपदी नियुक्ती. होवर क्राफ्ट विकसित.
  • 1963 ते 1980 या कालावधीत इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये (इस्रो) काम.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 जुलै 2015)

स्वतंत्र माहिती तंत्रज्ञान कक्ष स्थापन करण्याचे आदेश :

  • शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, महापालिका आदींमध्ये पेपरलेस कामांसाठी स्वतंत्र माहिती तंत्रज्ञान कक्ष स्थापन करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
  • सरकारी कारभार ऑनलाइन करण्यासाठी ई-गव्हर्नन्स हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
  • त्यानंतर ई-गव्हर्नन्स प्रकल्पाची परिणामकारकरीत्या अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्याच्यावर नियंत्रण असण्यासाठी राज्य सरकारच्या सर्व कार्यालयांमध्ये, महापालिका, जिल्हा परिषदांमध्ये स्वतंत्र माहिती तंत्रज्ञान कक्ष स्थापन करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
  • संबंधित कक्षाचे प्रमुख हे सचिव, उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक आयुक्त दर्जाचे अधिकारी असणार आहेत.

1.  कक्षातर्फे करण्यात येणारी कामे

  1. संबंधित सरकारी कार्यालये ऑनलाइन जोडणार
  2. नागरी सुविधा ऑनलाइन देणार
  3. राज्य माहिती केंद्राशी समन्वय
  4. ई-ऑफिस प्रणालीची अंमलबजावणी करणार
  5. ई-निविदा, ई-लिलाव राबविणार
  6. जुन्या कागदपत्रांचे डिजिटलायझेशन व स्कॅनिंग
  7. ई-डिस्ट्रीक्ट प्रकल्पाशी निगडित सेवा राबविणार
  8. कार्यालयाच्या संकेतस्थळाचे व्यवस्थापन
  9. मोबाइल अ‍ॅप्लिकेशन सुरू करणे
  10. बायोमॅट्रिक उपस्थितीची जोडणी व नोंद
  11. शासकीय ई-मेल प्रणाली राबविणे

दक्षिण आफ्रिकेचा संघ 72 दिवसांच्या भारता दौ-यावर :

  • दक्षिण आफ्रिकेचा संघ 28 सप्टेंबरपासून 72 दिवसांच्या भारता दौ-यावर येत असून या दौ-यात तीन टी -20, पाच एकदिवसी व चार कसोटी सामने होणार आहेत.
  • बीसीसीआय व दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्टाच्या अधिका-यांनी संयुक्त पत्रकार परिषदत या दौ-याची औपचारिक घोषणा केली.
  • दक्षिण आफ्रिकेचा संघ तब्बल 72 दिवसांच्या भारत दौ-यावर येत असून द.आफ्रिकेचा आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा भारत दौरा आहे.
  • मालिका :
  1. 2 ऑक्टोबर – धर्मशाला
  2. 5 ऑक्टोबर – कटक
  3. 8 ऑक्टोबर – कोलकाता

दिनविशेष :

  • 28 जुलैपेरू स्वातंत्र्य दिन
  • 1821 पेरूने स्वतःला स्पेनपासून स्वतंत्र जाहीर केले.

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 जुलै 2015)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago