Current Affairs of 28 July 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (28 जुलै 2017)

दूरदर्शन आपला लोगो नव्या रूपात सादर करणार :

  • सरकारी वृत्तवाहिनी ‘दूरदर्शन’ अर्थात ‘डीडी’ आपला लोगो नव्या रूपात सादर करणार आहे. यासाठी सर्व भारतीयांना संधी देण्याची योजना डीडीने आखली आहे.
  • सध्याचा दूरदर्शनचा लोगो हा 58 वर्षे जुना लोगो आहे. त्यामुळे आता नव्या लोगोसाठी स्पर्धा घेण्याचे डीडीने जाहीर केले आहे. यासाठी तब्बल 1 लाख रूपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.
  • डीडीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, दूरदर्शनच्या लोगोसोबत अनेक वर्षांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. खासगी वाहिन्यांच्या तुलनेत तरूणांच्या नव्या पिढीला याच्याशी जोडले जाणे आवश्यक आहे. यासाठीच डीडी आता नवा लोगो आणण्याच्या तयारीत आहे.
  • डीडी सर्व भारतीयांना या स्पर्धेसाठी आंमत्रित करीत आहे. यामध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला 13 ऑगस्टपर्यंत अर्ज करावा लागणार आहे. यासाठी एका व्यक्तीची किंवा एका संस्थेची एकच प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार आहे.
  • तसेच ही स्पर्धा जिंकल्यानंतर संबंधीत व्यक्ती किंवा संस्थेला आपल्या लोगोच्या डिझाइनवर कॉपीराईटचा अधिकार ठेवता येणार नाही. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी दूरदर्शनच्या वेबसाईटवर अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 जुलै 2017)

जेफ बेझोस ठरले जगात सर्वांत श्रीमंत व्यक्ती :

  • जगातील श्रीमंताच्या यादीत ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी पहिले स्थान पटकावले आहे. त्यांनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्‌स यांना मागे टाकले आहे.
  • ब्लूम्बर्ग आणि फोर्ब्स या माध्यम संस्थांनी अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. ऍमेझॉन कंपनीच्या समभागात 27 जुलै रोजी 1.7 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाल्याने बेझोस हे प्रथमस्थानी जाणे सहजशक्‍य झाले आहे.
  • मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्‌स हे अब्जाधीशांच्या यादीत मे 2013 पासून अग्रस्थानी होते. त्यांच्यानंतर बेझोस यांचा क्रमांक लागत होता. आता बेझोस यांनी गेट्‌स यांना मागे टाकले आहे. गेट्‌स यांची एकूण संपत्ती 90 अब्ज डॉलर आहे.
  • बेझोस हे ऍमेझॉनचे सहसंस्थापक असून, कंपनीचे 17 टक्के समभाग त्यांच्याकडे आहेत. ऍमेझॉन या ई-रिटेल कंपनीने ऍमेझॉन प्राइम ही व्हिडिओ सेवाही सुरू केली आहे.
  • बेझोस यांची सर्वांत मोठी गुंतवणूक ऍमेझॉनमध्ये असून, त्यांच्या मालकीची ब्लू ओरिजिन ही खासगी अवकाश संस्था आहे.

अ‍ॅक्सिसच्या सीईओपडी पुन्हा शिखा शर्मा :

  • अ‍ॅक्सिस बँकेने सध्याच्या व्यवस्थापकीय संचालकमुख्य कार्यकारी अधिकारी शिखा शर्मा यांचीच त्या पदावर आणखी तीन वर्षांसाठी नेमणूक केली. त्यामुळे बँकेला नवा सीईओ मिळेल व शर्मा कदाचित टाटा समूहाकडे जातील या अटकळींना पूर्णविराम मिळाला.
  • शिखा शर्मा यांची या पदावरील सध्याची मुदत जून 2018 मध्ये संपत आहे. त्यानंतर आणखी तीन वर्षांसाठी त्यांची फेरनियुक्ती करण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला.
  • तसेच शेअर बाजारास कळविले. नियामक संस्थांच्या संमतीचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर ही फेरनियुक्ती लागू होईल.
  • आयसीआयसीआय प्रुडेन्शियल विमा कंपनीतून आठ वर्षांपूर्वी अ‍ॅक्सिस बँकेत आल्यापासून शर्मा तेथे या पदावर आहेत.

आता अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांसाठी नवा लोगो :

  • दिवसेंदिवस बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढते आहे. याचा फटका बर्‍याच रुग्णांना बसत आहे. या बोगस डॉक्टरांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणेसह आता इंडियन मेडिकल असोसिएशननेही पुढाकार घेतला आहे.
  • अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने नवा लोगो तयार केला आहे. लवकरच हा नवा लोगो डॉक्टरांच्या क्लिनिकवर दिसेल.
  • तसेच या नव्या लोगोच्या डिझाइनमध्ये रंग, अक्षर, आकार ठरवून दिलेला आहे. त्यामुळे लोकांना सहज अ‍ॅलोपॅथी डॉक्टर्स ओळखता येतील.
  • याविषयी देशभरातील डॉक्टरांना त्यांच्या लेटरहेड आणि क्लिनिकच्या बाहेरील बोर्डावर हा नवा लोगो लावण्यासाठी बंधनकारक असणार आहे. हा लोगो केवळ अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांकरिता आहे. यामुळे बोगस डॉक्टरांना आळा घालता येईल.
  • या लोगोचा गैरवापर करणार्‍यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची तरतूद असल्याचे आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. के.के. अग्रवाल यांनी सांगितले.

नितीश कुमार सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदावर नियुक्त :

  • लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला धक्का देत महाआघाडीतून अचानक बाहेर पडत नितीश कुमार यांनी भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा म्हणजेच सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
  • बिहारची राजधानी पाटणा येथील राजभवनात पार पडलेल्या शपथविधी समारंभात नितीश कुमार यांच्या पाठोपाठ त्यांचे आतापर्यंतचे कट्टर प्रतिस्पर्धी विरोधक सुशीलकुमार मोदी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली हे या समारंभाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले.
  • बिहारच्या राजकारणात रंगलेल्या लालू विरुद्ध नितीशकुमार या संघर्षाला 26 जुलै रोजी निर्णायक वळण मिळाले.
  • तसेच भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीमध्ये नितीश कुमार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 जुलै 2017)

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago