Current Affairs of 28 June 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (28 जून 2016)

‘एमटीसीआर’ या गटात भारताचा समावेश :

  • मिसाईल टेक्‍नॉलॉजी कंट्रोल रेजिम (एमटीसीआर) या गटात सदस्य म्हणून (दि.27) भारताचा समावेश झाला आहे.
  • तसेच या गटात समावेश झाल्याचा फायदा अण्वस्त्र प्रसाराचे जागतिक नियम सुधारण्यासाठी होणार असल्याचे मत भारताने व्यक्त केले आहे.
  • जागतिक स्तरावरील निर्यात नियंत्रण गटात भारताचा प्रथमच समावेश झाला आहे.
  • फ्रान्सचे भावी राजदूत अलेक्‍झांडर झिग्लर, नेदरलॅंडचे राजदूत अल्फोन्सस स्टोलिंग आणि लक्‍झेंग्बर्गचे परराष्ट्रमंत्री लॉरी ह्युबर्टी यांच्या उपस्थितीत परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी समावेशाच्या कागदपत्रांवर सही केली.
  • तसेच हे तिनही देश ‘एमटीसीआर’चे सध्याचे पदाधिकारी देश आहेत.
  • भारताचा समावेश झाल्याने या गटातील देशांची संख्या 35 झाली आहे.
  • भारताला अणू पुरवठादार गटात (एनएसजी) समावेश न मिळाल्याच्या पार्श्‍वभूमीवर या दुसऱ्या महत्त्वाच्या गटात समावेश मिळाल्याने आनंद व्यक्त होत आहे.
  • चीनच्या अडवणुकीच्या धोरणामुळे भारताचा ‘एनएसजी’ प्रवेश रोखला गेला आहे.
  • विशेष म्हणजे, चीन हा ‘एमटीसीआर’चा सदस्य नसून, त्यांना काही वर्षांपूर्वी प्रवेश नाकारण्यात आला होता.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 जून 2016)

21 ऑगस्टला डिपार्टमेंटल पीएसआय परीक्षा :

  • गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या मर्यादित विभागीय उपनिरीक्षक परीक्षा होणार आहे.
  • 21 ऑगस्टला मुंबईसह राज्यभरातील सात केंद्रावर 828 पदासाठी परीक्षा होणार आहे.
  • तीन वर्षांपासून रखडलेल्या ‘डिपार्टमेंटल पीएसआय’ परीक्षेसाठी इच्छुक पोलिसांची संख्या 50 हजारांहून अधिक आहे.
  • तसेच त्यांना 11 जुलैपर्यत एमपीएससीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे.
  • या परीक्षेसाठी पदवीधर कॉन्स्टेबलसाठी 4 वर्षे व बारावी उर्त्तीण असलेल्यांसाठी 5 वर्षे सेवा पूर्ण असणे ही प्रमुख अट आहे.
  • त्याचप्रमाणे वय 35 वर्षाहून अधिक नसावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्षांची सवलत असणार आहे.
  • राज्य पोलीस दलात उपनिरीक्षकांची पदे थेट सरळ सेवा, मर्यादित विभागीय व खात्यातर्गंत परीक्षा या तीन पद्धतीने भरली जातात.

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून मेस्सीची निवृत्ती :

  • अर्जेंटिनाचा सुपरस्टार लिओनेल मेस्सीच्या कारकिर्दीचा अंत एका दु:खद आठवणीने झाला.
  • दि.27 अर्जेंटिनाला कोपा अमेरिका स्पर्धेत अंतिम लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्याने नाट्यमय घडामोडीत आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली.
  • क्लब लढतीत विक्रमांचे डोंगर रचणारा मेस्सी देशासाठी कोणतीही महत्त्वाची स्पर्धा जिंकून देण्यात अपयशी ठरला होता.
  • 2014 पासून अर्जेंटिना संघाला प्रतिष्ठेच्या तीन स्पर्धांमध्ये अंतिम लढतीत पराभव स्वीकारावा लागला आहे.
  • 2007 मध्ये कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम लढतीत पराभव स्वीकारणाऱ्या अर्जेंटिना संघात मेस्सीचा समावेश होता.

ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका विजयी :

  • विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाने तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात वेस्टइंडीजचा 59 धावांनी सहज पराभव करत तिरंगी मालिकेचे विजेतेपद मिळविले आहे.
  • वेस्टइंडीजमध्ये खेळविण्यात आलेल्या या तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियादक्षिण आफ्रिका संघाचा समावेश होता.
  • (दि.26) झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर वेस्टइंडीजचा संघ निष्प्रभ ठरला.
  • ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक मॅथ्यू वेडने निर्णायक क्षणी केलेल्या 57 धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 270 धावांपर्यंत मजल मारली होती.

ग्रामज्योती योजनेमार्फत 145 गावात होणार विद्युतीकरण :

  • देशातील 145 गावांचे दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेच्या माध्यमातून विद्युतीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.
  • केंद्राच्या या निर्णयामुळे या गावांमधील अंधाराचे साम्राज्य दूर होणार आहे.
  • देशातील खेड्यांना विद्युतीकरणामध्ये स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने केंद्राने पावले उचलण्यास सुरवात केली असून, त्याचाच एक भाग म्हणून 145 गावांचे विद्युतीकरण करण्यात येणार आहे.
  • आसाममधील 67 गावे, झारखंडमधील 16 गावे, मेघालयमधील 29 गावे, बिहार व राजस्थानमधील 8 गावे, ओडीशामधील 11 गावे, मध्य प्रदेशातील 3, छत्तीसगडमधील 2 गावांचा, तर उत्तर प्रदेशातील एका गावाचा यामध्ये समावेश आहे.
  • दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत देशातील 8,529 खेड्यांचे विद्युतीकरण केले आहे.

दिनविशेष :

  • 1921 : पी.व्ही. नरसिंहराव, भारताचे माजी पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1937 : गंगाधर पानतावणे साहित्यिक व समीक्षक यांचा जन्म.
  • 1960 : क्युबाने खनिज तेल शुद्धिकरण कारखान्यांचे राष्ट्रीयकरण केले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 जून 2016)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

3 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

3 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

3 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

3 years ago