चालू घडामोडी (28 जून 2017)
आयपीएलचे मुख्य प्रायोजक ‘विवो’ कंपनीचा करार कायम :
- ट्वेंटी-20 क्रिकेटमधील समीकरणेच बदलून टाकणाऱ्या ‘इंडियन प्रीमिअर लीग’चे (आयपीएल) मुख्य प्रायोजक म्हणून ‘विवो’ या चिनी मोबाईल कंपनीचा करार कायम ठेवण्यात आला आहे.
- ‘आयपीएल’च्या पुढील पाच वर्षांसाठी ‘विवो‘ने 2199 कोटी रुपयांची बोली लावली होती. गेल्या महिन्यात संपलेल्या ‘आयपीएल’चे मुख्य प्रायोजक ‘विवो’च होते.
- तसेच यापूर्वी 2016 आणि 2017 या वर्षांसाठी ‘विवो’ने 200 कोटी रुपयांची बोली लावत प्रायोजकत्व पटकाविले होते. 2014-15 पासून ‘विवो’ हे ‘आयपीएल’चे मुख्य प्रायोजक होते.
- ‘आयपीएल’च्या पहिल्या पाच वर्षांसाठी ‘पेप्सी’ हे मुख्य प्रायोजक होते. ‘आयपीएल’चा दहा वर्षांचा पहिला टप्पा संपल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मुख्य प्रायोजकासाठी निविदा मागविल्या होत्या. या निविदांमध्ये ‘विवो’ने बाजी मारली.
देशांना पुन्हा एकदा सायबर हल्ल्याचा फटका :
- जगभरातील देशांना पुन्हा एकदा सायबर हल्ल्याचा फटका बसला आहे. वान्नाक्राय या रॅन्समवेअर व्हायरसने गेल्या महिन्याभरात माजवलेल्या दहशतीनंतर आता पेट्या रॅन्समवेअर व्हायरसने जगभरातील देशांना टार्गेट केले आहे. यात भारत आणि युरोपचाही समावेश आहे.
- युके, रशिया, फ्रान्स, स्पेनमध्ये या व्हायरसनं ग्राहक, मालवाहतूक, हवाई वाहतूक सेवा, तेल कंपन्यांवर हल्ला केला.
- भारताला या हल्ल्याची झळ बसली आहे, यात जेएनपीटीवर हल्ला करण्यात आला आहे. यामुळे सध्या येथील कामकाज थांबवण्यात आले आहे.
- हा व्हायरस ‘पीटा’ नावाच्या जुन्या रॅन्समवेअरचे अॅडव्हान्स्ड वर्जन असल्याचे म्हटले जात आहे. पेट्याने 20 प्रसिद्ध कंपन्यांमधील कम्प्युटर हॅक केले आणि कम्प्युटर अनलॉक करण्याच्या मोबदल्यात हॅकर्संनी 300 डॉलरची मागणी केली होती.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळची विशेष समिती :
- सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या शिफारशींची योग्य पद्धतीने अंमलबजावणी कशी करता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सात सदस्यांच्या समितीत बोर्डाचे ज्येष्ठ पदाधिकारी राजीव शुक्ला आणि माजी कर्णधार सौरभ गांगुली यांना स्थान दिले आहे.
- टी.सी. मॅथ्यू (केरळ), ए. भट्टाचार्य (पूर्व विभागाचे प्रतिनिधी), जय शाह (गुजरात), अनिरुद्ध चौधरी (बीसीसीआय कोषाध्यक्ष) आणि अमिताभ चौधरी (काळजीवाहू सचिव) या अन्य सदस्यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.
- सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या शिफारशींची योग्य आणि त्वरित अंमलबजावणी कशी करता येईल, यासाठी समितीला काम करण्यास 15 दिवसांचा कालावधी त्यांना देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसानंतर ही समिती कामकाज सुरू करणार आहे. नंतर बोर्डाच्या कार्यकारिणीत शिफारशींवरील उपाययोजनांवर चर्चा होऊन काही गंभीर मुद्दे सर्वोच्च न्यायालयापुढे मांडले जाणार आहेत.
भारतीय लष्करांना मिळणार बुलेटप्रूफ हेल्मेट :
- लष्करी कारवायांमध्ये धाडसाने शत्रूंना सामोरे जाणाऱ्या सैन्याच्या जवानांना केंद्र सरकारने सुरक्षा कवच दिले आहे.
- सैन्याच्या जवानांसाठी केंद्र सरकारने नवीन बुलेटप्रुफ हेल्मेट घेतले असून गेल्या दशकभरापासून जवानांसाठी बुलेटप्रूफ हेल्मेटची मागणी केली जात होती.
- भारतीय सैन्यातील जवान सध्या जुन्या काळातील हेल्मेट वापरत होते. पण हे हेल्मेट शत्रूंच्या गोळीपासून संरक्षण करण्यासाठी सक्षम नव्हते. या हेल्मेटचे वजन सुमारे अडीच किलो होते. याशिवाय यात जवानाचे डोक पूर्णपणे सुरक्षित राहील याची खात्रीही नव्हती. यात डोक्याच्या मागच्या बाजूचे संरक्षण होत नव्हते.
- सैन्याच्या जवानांना लष्करी कारवायांदरम्यान आधुनिक हेल्मेट द्यावे अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात होती.
- तसेच केंद्र सरकारने वर्षाच्या सुरुवातीला कानपूरमधील एमकेयू लिमिटेड या कंपनीला बुलेटप्रूफ हेल्मेटचे कंत्राट दिले होते. यूके आणि नाटोच्या सैन्यालाही याच कंपनीने हेल्मेट पुरवले होते.
- संरक्षण मंत्रालयासोबत झालेल्या 180 कोटी रुपयांच्या या करारानुसार कंपनी सैन्याला 1 लाख 60 हजार बुलेटप्रूफ हेल्मेट देणार आहे.
दिनविशेष :
- भारताचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांचा जन्म 28 जून 1921 मध्ये झाला.
- 28 जून 1937 मध्ये भारतीय साहित्यिक व समीक्षक ‘गंगाधर पानतावणे’ यांचा जन्म झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा