अ.क्र
|
ठळक घडामोडी
|
1. |
एक हजार कोटींची नागरी परिवहनासाठी तरतूद
|
2. |
कॉग्रेस निवडणार आपला नवीन अध्यक्ष
|
3. |
वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ घरी जाऊन देणार राष्ट्रपती
|
4. |
‘इस्त्रों’ला गांधी पुरस्कार जाहीर |
5. |
दिनविशेष |
एक हजार कोटींची नागरी परिवहनासाठी तरतूद :
- मुंबईतील नागरी परिवहन प्रकल्पासाठी सर्वाधिक एक हजार पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा नव्या आर्थिक वर्षासाठी 3 हजार 832.30 कोटींच्या अर्थसंकल्पाला गुरुवारी मंजूर करण्यात आले आहे.
- मुख्यमंत्री व प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत 2015-16 या वर्षातील अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
कॉग्रेस निवडणार आपला नवीन अध्यक्ष :
- अखिल भारतीय कॉग्रेस कामिटीत 30 सप्टेंबर रोजी कॉग्रेसचा नवीण अध्यक्षासाठी निवडणुका होणार आहे.
- यासाठी प्रथमच कॉग्रेसने दोन टप्प्यात संघटनात्मक निवडणुका घेण्याचे ठरवले आहे.
- 31 जुलैपर्यंत गुजरात, हरियाणा, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, केरळ आणि काही ईशान्य राज्यांसह 18 राज्यांचा समावेश पहिल्या टप्प्यात आहे.
- तर दुसर्या टप्प्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, आंध्र प्रदेश, झारखंड, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा या राज्यांत निवडणुका होतील.
- सोनिया गांधी या सर्वात जास्त काळ पक्षाध्यक्षपदी राहणार्या नेत्या बनल्या आहेत त्या 1998 पासून पक्षाध्यक्षपदी आहेत.
- राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी आणि अखिल भारतीय कॉग्रेस कमिटीच्या सदस्यांची निवडणूक 21 ते 30 सप्टेंबर दरम्यान होईल.
वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ घरी जाऊन देणार राष्ट्रपती :
- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न‘ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अटलबिहारी वाजपेयीना त्यांच्या निवास्थानी जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.
- 25 डिसेंबर ला वाजपेयी आणि मालवीय यांना ‘भारतरत्न’ जाहीर झाले होते.
-
‘इस्त्रों’ला गांधी पुरस्कार जाहीर :
- गांधी शांतता पुरस्कार 2014 साठी भारतीय आकाश संशोधन संस्थेची (इस्त्रों)निवड करण्यात आली आहे.
- आकाश तंत्रज्ञान आणि उपग्रह सेवांव्दारे देशाचा विकास करण्यात मोलाची भूमिका बजावल्याबद्दल या संस्थेला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
- एक कोटी रुपये, आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- पुरस्काराची सुरवात 1995 मध्ये झाली आहे.
- याअधी नेल्सम मंडाले, बाबा आमटे, बांग्लादेशची ग्रामीण बँक, तसेच रामकृष्ण मिशन यांना पुरस्कार देण्यात आले आहेत.
दिनविशेष :
- 2000 – वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज कोर्टणी वॉल्शचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळींचा विश्वविक्रम. त्याने 435 वा बळी मिळवून भारताचा माजी कर्णधार कपिलदेवचा 434 बळींचा विक्रम मोडला.
- 2000 – फाय फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा ‘राष्ट्रभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना जाहीर.
- 2004 – सर्वात वेगवान चालकरहित जेट विमान तयार करण्यात अमेरिकेचा नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेटला यश.