Current Affairs of 28 March 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (28 मार्च 2016)
भारताचे हवाईदल प्रमुख इस्राईलच्या दौऱ्यावर :
- भारताचे हवाईदल प्रमुख एअरचीफ मार्शल अरुप राहा हे चार दिवसांच्या इस्राईल दौऱ्यावर रवाना झाले आहेत.
- भारत व इस्राईलमधील लष्करी सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने ही भेट होत असून; या दौऱ्यादरम्यान राहा हे इस्राईलचे संरक्षण मंत्री मोशे यालून यांची भेट घेणार आहेत.
- संरक्षण मंत्र्यांबरोबरच राहा हे इस्राईलच्या अनेक लष्करी उच्चाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.
- तसेच गेल्या काही वर्षांत भारत आणि इस्राईल या दोन देशांमधील राजकीय व लष्करी सहकार्य वृद्धींगत होत असून या पार्श्वभूमीवर राहा यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जाते.
Must Read (नक्की वाचा):
निदा फाजली यांना उर्दू अकादमीचा पुरस्कार :
- उर्दू अकादमीचा मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार प्रसिद्ध शायर निदा फाजली यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे.
- माजी राज्यपाल अझीझ कुरेशी यांना अमिर खुसरो पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, या पुरस्काराची घोषणा (दि.27) अकादमीने केली.
- विविध क्षेत्रांतील पाच जीवनगौरव पुरस्कार आणि दोन राष्ट्रीय एकता पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.
- तसेच याशिवाय विविध पुस्तकं आणि प्रकाशनांसहित अनेक क्षेत्रांत दीडशेहून अधिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
- मौलाना अबुल कलाम आझाद हा पाच लाखांचा पुरस्कार निदा फाजली यांना (मरणोत्तर) घोषित केला आहे.
- तसेच याशिवाय प्रत्येकी एक- एक लाखाच्या जीवनगौरव पुरस्कारांचे मानकरी असे – अजमल सुलतानपुरी (शायरी), मसरूह जहॉं (फिक्शन), सय्यद फजले इमाम रिझवी (शोध आणि समालोचन), महानामा नूर (बाल साहित्य), नुसरत झहीर मंजूर उस्मानी (हास्यव्यंग).
- प्रमुख पुरस्कार असे – डॉ. सुराग मेहंदी राष्ट्रीय एकता पुरस्कार अख्तरुल वासे आणि डॉ. सगीर अफ्राहीम यांना, अमिर खुसरो पुरस्कार माजी राज्यपाल अझीझ कुरेशी यांना, तर प्रेमचंद पुरस्कार डॉ. अली अहमद फातिमी यांना जाहीर झाला आहे.
भामरागडमध्ये सर्व शाळा डिजिटल :
- छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या तसेच नक्षली दहशतीचा वेळोवेळी कटू अनुभव येत असलेल्या भामरागड तालुक्यातील सर्वच 107 शाळा डिजिटल बनल्या आहेत.
- विद्यार्थी यानिमित्ताने शाळेत नियमितपणे येऊ लागल्याने पहिल्यांदाच गळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे.
- गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त भामरागड तालुक्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी हा तालुका दत्तक घेतला.
- तसेच त्यानंतर शिक्षण आयुक्तांनी या तालुक्याला वेळोवेळी भेट देऊन शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यास सुरुवात केली.
- तालुक्यात एकूण 107 प्राथमिक शाळा आहेत व त्यामध्ये 4 हजार 886 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
- बहुतांश विद्यार्थ्यांनी अद्याप मोबाइलही बघितलेला नाही, त्यातच आता मोबाइल, लॅपटॉप, संगणक, प्रोजेक्टर यांच्या मदतीने अध्यापन केले जात असल्याने हे साहित्य पाहण्याच्या उत्सुकतेपोटी विद्यार्थी स्वत:हून शाळेत येऊ लागले आहेत.
- डिजिटल साधनांबरोबरच सर्वच शाळांमध्ये ज्ञानरचनावादाप्रमाणे अध्यापन सुरू झाले आहे.
देशात ऑनलाइन खरेदी वाढणार :
- देशात फोर जी सेवेचा विस्तार होत असतानाच ऑनलाइन खरेदी वाढणार असल्याचा अंदाज डेलायट या संस्थेने वर्तविला आहे.
- फोर जी सेवेच्या विस्तारासोबतच इंटरनेटचा वापर वाढेल, आज भारत डिजिटल प्लॅटफॉर्म बनत आहे.
- विशेषत: ग्रामीण भागातील ग्राहकही ऑनलाइन सेवेला प्राधान्य देत आहेत.
- देशातील इंटरनेट समुदायात ग्रामीण भागात सेवा घेणाऱ्यांचे प्रमाण 35 टक्के आहे.
- देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ग्रामीण भागाचा हिस्सा 60 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
- एकूणच फोर जीच्या विस्ताराबरोबरच आगामी काळात देशात ऑनलाइन व्यवहार वाढतील.
टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश :
- टी-20 वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात फलंदाज विराट कोहलीच्या जोरावर भारताने ‘विराट’ विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.
- तसेच या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 160 धावांचा पाठलाग करताना भारताने 19.1 षटकात चार बाद 161 धावा केल्या.
- आक्रमक फलंदाजी करत विराट कोहलीने सर्वाधिक 51 चेंडूत दोन षटकार आणि नऊ चौकार लगावत नाबाद 82 धावा केल्या.
- तर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 10 चेंडूत तीन चौकार लगावत नाबाद 18 धावा केल्या.
- भारताकडून गोलंदाज हार्दिक पांड्यांने दोन गडी बाद केले, तर युवराज सिंग, आर. अश्विन, आशिष नेहरा आणि जसप्रित बुमराह यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतले.
- तसेच या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून फलंदाज आरोन फिंचने 34 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकार लगावत 43 धावा काढल्या.
- तर, उस्मान ख्वाजा आणि एरॉन फिंचने पहिल्या विकेटसाठी 54 धावांची सलामी दिली.
उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू :
- उत्तराखंडमध्ये होणा-या विश्वासदर्शक ठरावाआधीच केंद्र सरकारने उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली आहे.
- मुख्यमंत्री हरीश रावत (दि.28) विधानसभेत बहुमत सिद्ध करणार होते.
- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी (दि.27) सकाळी राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या शिफारसीवर स्वाक्षरी केल्या.
- काँग्रेसच्या नऊ आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे उत्तराखंडमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.
- राज्यातील सद्य स्थितीबाबत केंद्र सरकारने राज्यपाल के.के.पॉल यांच्याकडून मिळालेल्या अहवालावर चर्चा केली.
- उत्तराखंडच्या विधानसभा अध्यक्षांनी पक्षांतरबंदी कायद्याचा बडगा उगारत काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांना (दि.26) रात्री अपात्र ठरवले होते.
- तसेच त्यामुळे हरीश रावत सरकारचा बहुमत सिद्ध करण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
दिनविशेष :
- 1998 : सी-डॅक ने पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा परम 10000 हा महासंगणक देशाला अर्पण केला.
- चेक प्रजासत्ताक, स्लोव्हेकिया शिक्षक दिन.
- मुंबईतील सहार विमानतळाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा