जगातील 100 सर्वांत प्रभावशाली महिलांमध्ये चार भारतीय महिलांचाही समावेश :
- ‘फोर्ब्स’ मासिकाने प्रसिद्ध केलेल्या जगातील 100 सर्वांत प्रभावशाली महिलांमध्ये चार भारतीय महिलांचाही समावेश आहे.
- फोर्ब्सकडून दरवर्षी जगातील शंभर प्रभावशाली महिलांची यादी जाहीर करण्यात येते.
- या यादीत जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल पहिल्या स्थानावर आहेत.
- यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधति भट्टाचार्य (30 व्या स्थानी), आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर (35 व्या स्थानी), बायोकॉनच्या संस्थापक किरण मजूमदार-शॉ (85 व्या स्थानी) आणि हिंदुस्तान टाईम्स माध्यम समुहाच्या अध्यक्षा शोभना भारतीया (93 व्या स्थानी) यांचा समावेश आहे.
- फोर्ब्सच्या या यादीत भारतीय वंशाच्या इंदिरा नुयी (पेप्सिकोच्या अध्यक्षा) आणि पद्मश्री वॉरियर (सिस्को टेक्नॉलॉजीच्या प्रमुख) याही आहेत.
- फोर्ब्सच्या आज 12 वी वार्षिक यादी प्रसिद्ध केली आहे.
- अँजेला मर्केल यांच्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या हिलरी क्लिंटन दुसऱ्या स्थानी, दानकर्त्या मेलिंडा गेट्स व फेडरल रिझर्व्हच्या प्रमुख जॅनेट येलेन तिसऱ्या स्थानावर आहेत.
सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांचा ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजय :
- भारतीय स्टार सायना नेहवाल आणि चौथा मानांकित किदाम्बी श्रीकांत यांनी ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची दुसरी फेरी गाठली.
- सायनाने मलेशियाची चीह लिडिया यू हिच्यावर 32 मिनिटांत 21-12, 21-10 ने विजय मिळवला.
- तर श्रीकांतने डेन्मार्कचा हेन्स ख्रिस्तियन व्हिटिनगस याला 53 मिनिटांत 14-21, 21-6, 22-20 ने पराभूत केले.
- तसेच महिला दुहेरीत ज्वाला- अश्विनी यांनी हॉलंडची जोडी सामंथा बर्निंग- ईस टेबलिंग यांच्यावर 21-13,21-13 ने 29 मिनिटांत विजय नोंदविला.
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत लिएंडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा विजयी :
- जगप्रसिद्ध फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत लिएंडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा या खेळाडूंनी आपल्या जोडीदारांसह विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
- भारताचा अनुभवी स्टार खेळाडू लिएंडर पेस याने कॅनडाचा त्याचा जोडीदार डॅनियल नेस्टर याच्या साथीने जेम्स डकवर्थ आणि क्रिस गुसियान या जोडीवर मात केली.
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली स्थानावर कायम :
- भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली पूर्वीप्रमाणेच दहाव्या स्थानावर कायम आहे.
- इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटी सामना संपल्यानंतर आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत कोहली टॉप टेनमध्ये असणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे.
- आणि त्यानंतर मुरली विजय (24), चेतेश्वर पुजारा (25) आणि अजिंक्य रहाणे (26) यांचा क्रमांक आहे.
- तसेच 23 वर्षीय स्टोक्सने फलंदाजी क्रमवारीत 27 क्रमांकांनी झेप घेतली असून, तो 44व्या स्थानावर पोहोचला आहे.
- इंग्लंडचा उपकर्णधार जो रूट, हा प्रथमच अव्वल पाच फलंदाजांत पोहोचण्यात यशस्वी ठरला.
- न्यूझीलंडचा केन विलियम्सन पूर्वीप्रमाणेच सहाव्या स्थानावर कायम आहे.
- गोलंदाजांच्या यादीत एकही भारतीय गोलंदाज टॉप टेनमध्ये नाही.
दिनविशेष :
- 28 मे – आंतरराष्ट्रीयस्त्री आरोग्य कार्यक्रम दिन
- 1883 – स्वातंत्र्यवीर देशभक्त कांतिकारक, विनायक दामोदर तथा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा भगूर येथे जन्म.