Current Affairs of 28 May 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (28 मे 2018)
पंतप्रधानांच्या हस्ते दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेचे उद्घाटन :
- दिल्ली ते मेरठ या 9 किमी एक्सप्रेसवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यातील 6 किमी मोदी यांनी रोड शोही केला. यावेळी हजारो नागरिकांनी मोदांच्या रोड शो ला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. उद्धाटनापुर्वी रस्ते व वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोदींना सादरीकरणाद्वारे संपुर्ण प्रकल्पाची माहिती दिली.
- 8.36 किमी लांबीच्या एक्सप्रेसवेसाठी 841.50 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. निजामुद्दीन ब्रिज पासून सुरू होणाऱ्या रस्त्यावर दिल्ली-उत्तर प्रदेश हद्दीपर्यंत 14 लेन आहेत. हा देशातील पहिला असा राष्ट्रीय महामार्ग आहे जिथे प्रदुषण कमी होणार आहे. एक्सप्रेसवेच्या दोन्ही बाजूला 2.5 मीटर लांबीचे सायकल ट्रॅकही बनविण्यात आले आहेत.
- तसेच यानंतर 135 किलोमीटर अंतराचा ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवेचे उद्घाटनही मोदींच्या हस्ते करण्यात आले. या एक्सप्रेसवेसाठी तब्बल 11 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. या एक्सप्रेसवेमुळे हरियाणा मधील कुंडली आणि पलवलचे अंतर चार तासांवरून केवळ 72 मिनीटांवर आले आहे.
Must Read (नक्की वाचा):
कोकणात मेडिकल टुरिझममधून परदेशी चलन :
- खासदार नारायण राणेंच्या स्वप्नातील कोकणातील पहील्या मेडीकल कॉलेजला परवानगी लवकरच मिळेल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी पडवे (ता. कुडाळ) येथे लाईफ टाईम रुग्णालय उद्घाटन प्रसंगी बोलताना केले. मेडीकल टूरिझमची संकल्पना येथे सुरू होत असल्याने परदेशी चलनामुळे अर्थव्यवस्थेलाही त्याचा लाभ होईल, असेही ते म्हणाले.
- कोकणातील जनतेला उपचारासाठी जिल्ह्याबाहेर जावे लागत होते. ही उणीव राणेंनी दुर केली. त्यामुळे हा दिवस कोकणीजनेतेच्या दृष्टीने सोन्याचा दिवस आहे. या जिल्ह्यासाठी जी फलोद्यान योजना यापुर्वी होती. ती कायम सुरू ठेवावी, अशी सुचना शरद पवार यांनी मुख्यमंत्र्याना केली. या भागाचा शेती, बागायतीतून बदल होतो आहे. इथला तरूण आता मुंबईत जात नाही.
पुण्यात ताजमहालाचा ऐतिहासिक दस्तऐवज :
- वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्न अठराव्या शतकात निर्माण झाला होता. हा ताबा लष्कराकडे असावा की मुलकी प्रशासनाकडे, या संदर्भात पत्रव्यवहार झाले. या ऐतिहासिक दस्तऐवजाच्या छायाप्रतींचे जतन पुण्यात होत आहे.
- दस्तऐवजांमध्ये पाच पत्रव्यहार आहेत. ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्न ब्रिटनच्या तत्कालीन राजघराण्याकडे गेला होता. त्यावर चर्चा झाल्यानंतर हा ताबा लष्कराकडे असावा, असा निर्णय त्यांनी दिला. नंतर ब्रिटन अधिकारी कर्नल क्लेअर यांनी 6 ऑगस्ट 1806 मध्ये तसे पत्र लष्करी सचिव गॅट लेक यांना पाठविले आणि ताबा लष्कराकडे राहिला. ही घटना तिसऱ्या जॉर्जच्या काळात घडल्याचे सांगितले जाते.
- पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी.एन. यादव यांनी या दस्तऐवजांच्या छायाप्रती खडकी येथील संरक्षण दलाच्या जतन आणि संशोधन केंद्राला भेट दिल्या आहेत.
चेन्नई सुपरकिंग्ज तिसऱ्यांदा आयपीएल विजेता संघ :
- मुंबईच्या वानखेडे मैदानावर हजारो प्रेक्षकांच्या साथीने, चेन्नई सुपरकिंग्जने आपण आयपीएलमधले सर्वात प्रसिद्ध संघ का आहोत याची जाणीव सर्वांना करुन दिली आहे.
- सलामीवीर शेन वॉटसनचे नाबाद आक्रमक शतक आणि त्याला चेन्नईच्या इतर फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर, अंतिम सामन्यात चेन्नईने हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला.
- तसेच हैदराबादने विजयासाठी दिलेले 179 धावांचे आव्हान चेन्नईने अवघ्या 2 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. आयपीएल सीझनच्या अकरावा आणि आता पर्यंत तिसर्यांदा विजेता संघ ठरले.
भारताकडून नियंत्रण रेषेजवळ 5500 बंकरची बांधणी होणार :
- पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या गोळीबारापासून संरक्षणासाठी जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळील गावांमध्ये साधारण 5500 बंकर आणि 200 समाजगृहे बांधण्यात येणार आहेत. राज्यातील राजौरी जिल्हा प्रशासनाने त्यासाठीची तयारी सुरू केली आहे.
- जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्य वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करत असते. त्यात सीमावर्ती भागातील नागरिकांचे मोठे नुकसान होते आणि अनेक घटनांमध्ये त्यांना जीवही गमावावा लागला आहे. अशा घटनांमध्ये नागरिकांचे रक्षण करण्यासाठी जम्मू-काश्मीरचे राज्य सरकार आणि केंद्रीय गृह खाते यांच्या संयुक्त विद्यमाने बंकर आणि भूमिगत निवारे बांधण्याची योजना आखण्यात आली आहे.
- तसेच हा प्रकल्प चालू आर्थिक वर्षांत पूर्ण होणार असून त्यासाठी 153.60 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राजौरी जिल्ह्य़ाचे विकास आयुक्त शाहीद इक्बाल चौधरी यांनी नुकतीच या संदर्भात बैठक घेऊन प्रकल्पाचा आढावा घेतला.
राजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर :
- राजकीय पक्ष माहिती अधिकार कायद्याच्या (आरटीआय) कक्षेत असल्याचा निर्णय केंद्रीय माहिती आयोगाने पाच वर्षांपूर्वी दिला असताना निवडणूक आयोगाने मात्र विसंगत भूमिका घेतली आहे.
- राजकीय पक्ष ‘आरटीआय‘ कक्षेत येत नसल्याचा दावा निवडणूक आयोगाने माहिती अधिकाराखालील अर्जावर निर्णय देताना केला. यामुळे माहिती आयोग आणि निवडणूक आयोग आमने-सामने आले असून, नवा वाद निर्माण होण्याचे संकेत आहेत.
- भाजप, कॉंग्रेस, बसप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, माकप आणि समाजवादी पक्ष या सहा राष्ट्रीय पक्षांना निवडणूक रोख्यांद्वारे किती देणगी मिळाली, अशी विचारणा करणारा अर्ज पुण्यातील विहार दुर्वे यांनी माहिती अधिकाराखाली केला होता. त्यास उत्तर देताना निवडणूक आयोगाने ही भूमिका घेतली.
- ‘माहिती अधिकार अर्जाद्वारे मागवलेली माहिती निवडणूक आयोगाकडे उपलब्ध नाही. ही माहिती राजकीय पक्षांशी संबंधित असून, हे पक्ष आरटीआयच्या कक्षेत नाहीत. 2017-18 या आर्थिक वर्षांत निवडणूक रोख्यांद्वारे मिळालेल्या देणगीचा तपशील हे पक्ष 30 सप्टेंबर 2018 पर्यंत सादर करू शकतील’, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
दिनविशेष :
- क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी झाला.
- फोक्सवॅगन (व्ही.डब्ल्यू) जर्मन ऑटोमोबाइल उत्पादक कंपनीची स्थापना 28 मे 1937 मध्ये झाली.
- 28 मे 1952 रोजी ग्रीसमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.
- 75 व्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुंबई महापालिकेतर्फे 28 मे 1958 रोजी सत्कार करण्यात आला.
- पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) ची स्थापना 28 मे 1964 रोजी झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा