चालू घडामोडी (28 नोव्हेंबर 2016)
विकास कृष्णनला सर्वोत्तम मुष्टियोद्ध्याचा पुरस्कार जाहीर :
- आशियाई स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेता विकास कृष्णनला यावर्षी त्याने केलेल्या सुरेख कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेतर्फे (एआयबीए) 20 डिसेंबर रोजी विश्व संघटनेच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त ‘सर्वोत्तम मुष्टियोद्धा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
- भारतीय बॉक्सिंग इतिहासातील ही पहिली घटना ठरेल. 24 वर्षीय विकास सध्या अमेरिकेतील न्यू जर्सी येथे आहे.
- 2010 मध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्ण आणि 2014 मध्ये कास्यपदक जिंकणाऱ्या विकासने यावर्षी दोन एपीबी बाऊटमध्ये सहभाग नोंदवला.
हाँगकाँग ओपन सुपर सीरीजमध्ये पी.व्ही. सिंधूला उपविजेतेपद :
- भारताच्या हाँगकाँग ओपन सुपर सीरीजमध्ये दोन विजेतेपद जिंकण्याच्या आशेला 27 नोव्हेंबर रोजी ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि राष्ट्रीय विजेता समीर वर्मा यांच्या अंतिम फेरीतील पराभवामुळे तडा बसला.
- सिंधूला सलग दुसरे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावण्याची संधी होती; परंतु पराभवाने तिची ही संधी हुकली.
- तसेच सिंधूला चिनी ताइपेच्या ताई जू यिंग हिच्याकडून सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला व उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
- सिंधूला 41 मिनिटे रंगलेल्या लढतीत 15-21, 17-21 असा पराभवाचा सामना करावा लागला.
प्ले ऑफ लढतीत भारताला कांस्यपदक :
- भारताने 27 नोव्हेंबर रोजी येथे चार देशांच्या निमंत्रित स्पर्धेत मलेशियाविरुद्ध कांस्यपदकाच्या प्ले ऑफ लढतीत 4-1 असा विजय नोंदवताना तिसरा क्रमांक मिळवला.
- भारताने प्रारंभापासूनच वर्चस्व ठेवताना अखेरच्या क्वॉर्टरमध्ये दोन गोल करीत विजय मिळवला. याआधीच्या लढतीतील पराभवामुळे निराश भारतीय संघाने दुसऱ्याच मिनिटाला गोल केला.
- बिरेंद्र लाकडारने सेंटरजवळ चेंडू नेताना सर्कलमध्ये तिरपा फटका मारला. हा क्रॉस आकाशदीपसिंहसमोर पडला आणि त्याने चपळता दाखवत भारताला आघाडी मिळवून दिली.
- भारताने पूर्ण क्वॉर्टरमध्येच वर्चस्व कायम ठेवले आणि अनेकवेळा गोल करण्याची संधी निर्माण केली. यादरम्यान त्यांनी चार पेनल्टी कॉर्नर मिळवली; परंतु मलेशियाने त्याचा सुरेख बचाव केला.
राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेत बिहारची विजयी सलामी :
- पाटणा येथील पाटलीपुत्र परिसरात मोठ्या उत्साहात प्रारंभ झालेल्या राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेत यजमान बिहारने झारखंडला हरवून विजयी सलामी दिली.
- सुमारे तीन हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत राष्ट्रीय कबड्डी संघाचा कर्णदार अनुपकुमार आणि अनुभवी रेडर अजय ठाकूर यांनी राष्ट्रगीत गाऊन स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन केले.
- घरच्या प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात झालेल्या एकतर्फी सामन्यात बिहारने झारखंडला 56-11 अशा गुणांनी हरविले.
दिनविशेष :
- 28 नोव्हेंबर 2016 हा भारतीय समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांचा स्मृतीदिन आहे.
- भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक, पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट यांचे 28 नोव्हेंबर 1967 हा स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा