Current Affairs of 28 September 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (28 सप्टेंबर 2015)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फलश्रुती पाच महत्त्वपूर्ण घोषणांमध्ये झाली :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी माहिती-तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध सिलिकॉन व्हॅलीला भेट देत आयटी दिग्गजांशी (टेक टायटनशी) संवाद साधल्याची पाच फलश्रुती पाच महत्त्वपूर्ण घोषणांमध्ये झाली आहे.
  • मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्य नडेला यांनी भारतातील पाच लाख गावांना ब्रॉडबॅन्ड कनेक्टिव्हिटी तर गुगलने 500 रेल्वेस्थानकांवर मोफत वायफाय सुविधा देण्यासाठी केंद्र स्थापन करणार असल्याचे जाहीर केले आहे.
  • कमी खर्चाचा ब्रॉडबॅन्ड संपर्क आणि क्लाऊड कम्प्युटिंगच्या साह्याने कामकाजात सृजनात्मकता, दक्षता आणि उत्पादकता वाढविण्यात मोलाचे योगदान देता येईल.
  • त्यामुळे संपूर्ण भारतात योग्य दरात उत्पादन आणि सेवा सुनिश्चित करता येतील.
  • आमची कंपनी भारतातील डाटा सेंटरच्या माध्यमातून क्लाऊड सेवा उपलब्ध करण्याची घोषणा करणार असून ती मोठी उपलब्धी ठरेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
  • गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी डिजिटल साक्षरतेला गती देताना पुढील महिन्यापासून भारतात गुजरातीसह 10 वेगवेगळ्या भाषांमधून टाईप करण्याची सुविधा उपलब्ध करवून देणार असल्याचे स्पष्ट केले.

अभिनव बिंद्राला आशियाई एअरगन स्पर्धेत सुवर्ण पदक :

  • ऑलिम्पिक सुवर्ण विजेता ‘गोल्डन बॉय’ अभिनव बिंद्रा याने आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत रविवारी दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले.
  • डॉ. कर्णिसिंग शुटिंग रेंजमध्ये बिंद्राने 208.8 गुणांसह सुवर्णांवर नेम साधला.
  • लंडन ऑलिम्पिकचा कांस्य विजेता गगन नारंग हा चौथ्या आणि चैनसिंग सहाव्या स्थानावर राहिले.
  • बिंद्रा, नारंग आणि चैनसिंग हे 2016 च्या रियो ऑलिम्पिकसाठी आधीच पात्र ठरले आहेत.
  • 32 वर्षांच्या बिंद्रापाठोपाठ कझाखस्तानचा विश्व क्रमवारीत आठव्या स्थानावरील युरकोव्ह युकिरी याने 206.6 गुणांसह दुसरे आणि कोरियाचा यू जीचूल 185.3 याने तिसरे स्थान मिळविले.
  • लंडन ऑलिम्पिकमध्ये याच प्रकारात कांस्य जिंकणाऱ्या नारंगला 164.5 गुण मिळाल्याने तो चौथ्या स्थानावर घसरला.
  • चैनसिंग हा 122.7 गुणांसह सहाव्या स्थानावर आला.
  • नारंगने 10.6 गुणांचे दोन शॉट मारून चांगली सुरुवात केली खरी पण पुढच्या प्रयत्नांत तो माघारला.
  • भारताने 10 मीटर एअर रायफलचे सांघिक सुवर्णदेखील जिंकले. बिंद्रा, नारंग आणि चैनसिंग यांच्या जोडीने 1868.6 गुणांसह अव्वल स्थान घेतले.
  • तर कोरिया संघ दुसऱ्या आणि सौदी अरब संघ तिसऱ्या स्थानावर आला.
  • भारताने युवा गटात एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली.

गुगलचा 17 वा वाढदिवस :

  • वर्षभर जगभरातील कोटय़वधी लोकांचे वाढदिवस साजरे करणाऱ्या गुगलचा 17 वा वाढदिवस असून जगभरातून लाखो गुगलप्रेमींचा शुभेच्छांचा वर्षांव गुगलवर होतो आहे.

  • तारुण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गुगलने बघताबघता मोठा पल्ला गाठत संगणकप्रेमी आणि मोबाईलधारकांमध्ये महत्त्वाची जागा निर्माण केली.
  • अशी कोणतीही माहिती असू शकत नाही की जी गुगल या सर्च इंजिनवर नाही.
  • गुगलच्या 17 व्या वाढदिवशी स्वत:चे डुडलही बदलवले आहे.
  • त्यात किबोर्डसह प्लास्टिकचा पर्सनल कॉम्प्युटर म्हणजे ‘जी’, दोन फुगे म्हणजे ‘दोनदा ओ’, सीपीयूचा आकार परत ‘जी’सारखा, त्याच्यापुढे ‘एल’च्या आकाराचा लावा लॅम्प आणि मेजलाच ‘ई’ सारखा आकार देण्यात आला आहे.

लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूशी संबंधित दस्ताऐवज सार्वजनिक करण्याची मागणी :

  • पश्चिम बंगाल सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित काही फायली खुल्या केल्यानंतर आता माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूशी संबंधित दस्ताऐवज सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात येत आहे.
  • शास्त्रीजींच्या मृत्यूसंदर्भात संशयाचे माहोल असून, सत्य बाहेर यायला हवे, अशी मागणी त्यांचे चिरंजीव आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल शास्त्री यांनी केली.
  • शास्त्रीजींच्या मृत्यूबाबत कागदपत्रे खुले करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते परदेश दौऱ्याहून परत आल्यानंतर पुढील आठवडय़ात पत्र लिहिणार असल्याचे ते म्हणाले.
  • दिल्लीत पालम विमानतळावर मी वडिलांचे पार्थिव पाहिले तेव्हा ते निळे पडलेले होते. चेहऱ्यावर पांढरे व्रण होते, असेही ते म्हणाले.
  • शास्त्रीजींचा मृत्यू 1966 मध्ये तेव्हाच्या सोव्हिएत संघातील ताश्कंदमध्ये झाला.
  • 1965 भारत-पाक युद्धानंतर पाकच्या नेत्यांशी समझोता करण्यासाठी ते तेथे गेले होते.

फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गने स्वत:चा ‘प्रोफाईल फोटो’ बदलला :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेसबुक मुख्यालयातील भेटीच्या पार्श्वभूमीवर फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गने सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ अभियानाला पाठिंबा देण्यासाठी स्वत:चा ‘प्रोफाईल फोटो’ बदलला.
  • झकरबर्गचा हा तिरंगी रंगातील प्रोफाईल फोटो अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
  • भारतीय सरकार देशातील ग्रामीण समाजाला इंटरनेटशी आणि जास्तीत जास्त लोकांना ऑनलाईन माध्यमावर आणण्याचे प्रयत्न करत आहे.
  • त्यांचा या प्रयत्नांना माझा पाठिंबा असल्याचे झकरबर्गने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
  • झकरबर्गच्या या पाठिंब्याबद्दल आभार जाहीर करताना नरेंद्र मोदी यांनीदेखील फेसबुकवरील स्वत:चा ‘प्रोफाईल फोटो’ बदलला आहे.

दिनविशेष:

  • चेक प्रजासत्ताक : चेक राष्ट्र दिन
  • तैवान शिक्षक दिन
  • 1939 : दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडवर आक्रमण केल्यावर जर्मनी व सोवियेत संघाने पोलंडचा आपसांत वाटणी करून घेतली.
  • 1939 : दुसरे महायुद्ध – जर्मनीच्या सैन्याने पोलंडची राजधानी वॉर्सॉ काबीज केली.
  • 1944 : दुसरे महायुद्ध – सोवियेत सैन्याने एस्टोनियातील क्लूगा कॉँसेन्ट्रेशन कॅम्पमधील कैद्यांची सुटका केली.
  • 1958 : फ्रांसने नवीन संविधान स्वीकारले. फ्रांसचे पाचवे प्रजासत्ताकअस्तित्त्वात आले. गिनी या फ्रांसाधीन प्रदेशाने हे संविधान न स्वीकारता स्वतंत्र होण्याचे ठरवले.
Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago