चालू घडामोडी (29 एप्रिल 2016)
सॅनसुईने सादर केली कर्व्ह मालिकेतील मॉडेल्स :
- इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनात देशात अग्रेसर असलेल्या सॅनसुई कंपनीने नुकतीच ‘कर्व्ह 4के अल्ट्रा एचडी एलईडी’ ही दूरचित्रवाणी संचाची नवी मालिका सादर केली असून या अंतर्गत अल्ट्रा एचडी, यूएचडी आणि स्मार्ट कनेक्ट सिरिजमधील 10 नवीन मॉडेल्स सादर केली आहेत.
- इंडियन प्रीमीयम लीगच्या सामन्यांतील दोनवेळचे विजेते असलेल्या कोलकाता नाईड रायडर गेल्या तीनवर्षांपासून कंपनी सहयोगी असून कंपनीच्या या नव्या सिरिजचे उद्घाटन गौतम गंभीर, मॉर्न मॉर्केल, युसुफ पठाण, रॉबिन उथप्पा, ब्रेड हॉग, अॅन्ड्रे रस्सेल या नामांकित क्रिकेटपटूंच्या हस्ते झाले.
- सध्या आयपीएलचे सामने सुरू असून ते सर्व रोमहर्षक सामने लोकांना उत्तम दर्जाच्या व अत्याधुनिक तंत्राच्या सहाय्याने बघता यावे, म्हणून आयपीएलच्या दरम्यान हे टीव्ही सादर केले असल्याची माहिती कंपनीचे चीफ आॅपरेटिंग आॅफिसर अमिताभ तिवारी यांनी दिली.
शैलेश नवल पालघरचे नवे जिल्हाधिकारी :
- पालघर या नवनिर्मित जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांची बदली गडचिरोली येथे करण्यात आल्याने त्यांच्या जागी शैलेश नवल यांची नियुक्ती तर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे यांनाही आयएएसचा दर्जा मिळाल्यानंतर त्यांचीही बदली होऊन त्यांच्या जागी निधी चौधरी (आयएएस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागातील रोजगारासाठी होणार स्थलांतर, कुपोषण, रोखण्याच्या दृष्टीने त्याची जलयुक्त शिवाराची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेऊन पाण्याचा मोठा जलसाठा साठविण्यात यश मिळविण्याने संपूर्ण कोकण विभागातून पालघर जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळाला होता.
- पालघर जिल्ह्याचा नव्याने पदभार स्विकारणारे शैलेश नावल हे सन 2013-14 मध्ये डहाणूचे उपविभागीय महसुल अधिकारी म्हणून काम केले असून त्यांच्याक्डे आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी पदांचा अतिरीक्त कार्यभार होता.
माजी सैनिकांना मालमत्ता कर माफ :
- बदलापूर पालिका हद्दीतील माजी सैनिक किंवा त्यांच्या विधवा पत्नी यांना या पुढे पालिकेचा मालमत्ता कर पूर्ण माफ करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
- शहरातील सर्व माजी सैनिकांची माहिती संकलित करुन ही करमाफी देण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी सभागृहात स्पष्ट केले.
- माजी सैनिक त्याचप्रमाणे शहीद झालेल्या सैनिकांच्या विधवा पत्नी यांना पालिकेने मालमत्ताकरात पूर्ण माफी देण्याचा निर्णय घेतला.
- त्यांची पालिका हद्दीत कोणतीही मालमत्ता असो त्याला करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सैन्यात शौर्यपदक मिळविलेल्या सैनिकांनाही कर माफ करण्यात आला आहे.
अपर्णा वेलणकर यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार :
- ‘लोकमत’च्या फीचर एडिटर अपर्णा वेलणकर यांना ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते येथील सार्वजनिक वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अकरा हजार रुपये, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
- मुख्य प्रवाहापेक्षा वेगळ्या वाटेवरच्या पत्रकारितेने समाधान दिल्याचे वेलणकर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ब्रेकिंग न्यूज, रोजच्या बातम्यांमध्ये नसणाऱ्या पुरवणी वा अन्य विभागांतील पत्रकारांकडे दुय्यमभावाने पाहिले जाते.
- सध्याच्या सोशल मीडियाच्या गदारोळात, विचित्र घटनांच्या कोलाहलात, नकारात्मकतेने भरलेल्या समाजात सकारात्मकता रुजवत राहण्याची जबाबदारी पत्रकारांची असल्याचे मत खांडेकर यांनी व्यक्त केले.
मादाम तुसॉं संग्रहालयात मोदींचा पुतळा स्थापन :
- लंडन येथील प्रख्यात मादाम तुसॉं संग्रहालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेणाचा पुतळा स्थानापन्न करण्यात आला.
- बेकर स्ट्रीटवर असलेल्या या संग्रहालयात जगद्विख्यात व्यक्तींचे मेणाचे पुतळे असून, त्यात आता मोदीही दाखल झाले आहेत.
- दिल्लीहून आलेला पुतळा संग्रहालयाच्या “वर्ल्ड लिडर्स‘ या विभागात बसविण्यात आला आहे. महात्मा गांधी, विन्स्टन चर्चिल यांच्यापासून बराक ओबामा, डेव्हिड कॅमेरॉन, अँजेला मर्केल आणि फ्रान्स्वा ओलॉंद आदी नेत्यांचे पुतळे या विभागात आहेत.
- “मादाम तुसॉं संग्रहालयात मोदींचे स्वागत आहे,’अशा शब्दांत संग्रहालयाचे सरव्यवस्थापक एडवर्ड फुलर यांनी आनंद व्यक्त केला.
- मोदींचा पुतळा त्यांचा ‘ब्रॅंड‘ बनलेला कुर्ता आणि क्रिम जॅकेटमध्ये असून, ते ‘नमस्ते‘च्या स्थितीत आहेत.
- एक पुतळा बनविण्यास एक महिन्याचा कालावधी लागतो आणि सुमारे दीड लाख पाउंड खर्च येतो.
भारताने ‘जीपीएससिद्धी’ सातवा उपग्रह अवकाशात :
- भारताची संपूर्ण स्वदेशी बनावटीची स्थितिदर्शक यंत्रणा (जीपीएस – ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) आज पूर्णत्वास गेली.
- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) ‘इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम‘ (आयआरएनएसएस) मालिकेतील सातवा उपग्रह आज अवकाशात यशस्वीरीत्या सोडला, त्यामुळे भारताला ‘जीपीएससिद्धी‘ प्राप्त झाली.
- या यंत्रणेचे ‘नाविक‘ असे नामकरण पंतप्रधान मोदी यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतानाच केले.
- ‘इस्रो‘ने आयआरएनएसएस-1जी या उपग्रहाचे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक ‘पीएसएलव्ही सी-33’ द्वारे दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले.
- सात उपग्रहांच्या मालिकेतील हा शेवटचा उपग्रह आहे. या मालिकेतील पहिला उपग्रह जुलै 2013 मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता.
मुंबईचा विजय ‘लॉर्ड’ पोलार्डमुळे :
- कर्णधार रोहित शर्मा आणि अंबाती रायडू यांच्या वेगवान भागीदारीनंतर किएरॉन पोलार्डने सहा टोलेजंग षटकार आणि दोन चौकारांची 17 चेंडूंत नाबाद 51 धावांची धुवाँधार खेळी केली.
- या फटकेबाजीच्या जोरावरच मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईटरायडर्सचा सहा विकेट राखून पराभव केला.
- सुमार क्षेरक्षण करूनही कोलकाताला 174 धावांवर रोखणाऱ्या मुंबईने हे आव्हान दोन षटके राखून पार केले.
भारत जगात तिसरा डोपिंग उल्लंघनात :
- क्रीडा क्षेत्रात मैदानावर भारताचे वर्चस्व दिसत नाही, पण उत्तेजक द्रव्य सेवनाच्या (डोपिंग) उल्लंघनामध्ये भारताचा जगात तिसरा क्रमांक लागला आहे.
- जागतिक उत्तेजक द्रव्यविरोधी संस्थेने (वाडा) जाहीर केलेल्या अहवालानुसार हे स्पष्ट झाले.
दिनविशेष :
- 1848 : राजा रविवर्मा, नामवंत भारतीय चित्रकार.
- 1936 : झुबिन मेहता, भारतीय संगीतकार.