चालू घडामोडी (29 ऑगस्ट 2016)
इस्रो व्दारे स्वदेशी स्क्रॅमजेट इंजिनाची यशस्वी चाचणी :
- वातावरणातील हवेचाच इंधन म्हणून वापर करण्याच्या प्रयोगासाठी अत्याधुनिक स्क्रॅमजेट इंजिन असलेल्या ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी व्हेईकलची (एटीव्ही) भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) (दि.28) यशस्वीपणे चाचणी घेतली.
- श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून या रॉकेटची चाचणी घेण्यात आली.
- अमेरिका, रशिया आणि युरोपीय अवकाश संस्थांनंतर अशी चाचणी घेणारा भारत हा चौथा देश बनला आहे.
- भारताने प्रथमच असा प्रयोग केला आहे. हवेतील हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा इंधन म्हणून वापर करणाऱ्या यंत्रणेची (एअर ब्रिदिंग प्रॉपल्शन सिस्टिम) याद्वारे चाचणी घेण्यात आली.
- उड्डाणानंतर रॉकेट अकरा किलोमीटर उंचीवर असताना स्क्रॅमजेट इंजिन प्रज्वलित झाले.
- तीनशे सेकंदांनी नियोजनाप्रमाणे हे रॉकेट श्रीहरीकोटापासून अंदाजे 320 किलोमीटर दूर बंगालच्या उपसागरात कोसळले.
- एटीव्ही हे दोन भाग असलेले प्रक्षेपक आहे. दोन स्क्रॅमजेट इंजिन ‘एटीव्ही‘च्या दुसऱ्या भागावर बसविली होती.
- प्रक्षेपकाने उड्डाणाचा पहिला भाग पूर्ण करताच स्क्रॅमजेट इंजिन सुरू झाले आणि ते पाच सेकंद प्रज्वलित राहिले.
- तसेच ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे आवाजापेक्षाही अधिक वेगात असताना हवेतील वायूंच्या साह्याने इंजिन सुरू करण्याचे अवघड तंत्रज्ञान निर्माण करण्याची भारतीय शास्त्रज्ञांची क्षमता यामुळे सिद्ध झाली आहे.
- स्क्रॅमजेट इंजिन म्हणजे –
- स्क्रॅमजेट (सुपरसॉनिक कम्बस्टिंग रॅमजेट) हे एअरब्रिदिंग जेट इंजिनचा एक प्रकार असून यामध्ये ध्वनीपेक्षाही अधिक वेगात असताना हवेतच प्रज्वलन होते.
- प्रज्वलन करण्याआधी हवेवर प्रचंड दाब निर्माण करण्यासाठी प्रक्षेपकाचा वेग प्रचंड असणे आवश्यक असते.
- स्क्रॅमजेटमधील हवेचा वेग कायमच प्रचंड असल्याने रॉकेट वेगाने जात असताना या इंजिनाची कार्यक्षमता अत्यंत परिणामकारक असते.
- स्क्रॅमजेट इंजिनामध्ये हायड्रोजनचा वापर इंधन म्हणून होतो, तर ऑक्सिजन प्रज्वलकाचे काम करतो.
- ‘स्क्रॅमजेट’चे फायदे –
- रॉकेटच्या इंधनाबरोबर असणाऱ्या प्रज्वलकाचा खर्च वाचणार आहे.
- पुनर्वापर करता येणाऱ्या प्रक्षेपकांच्या उड्डाणासाठीही वापर शक्य आहे.
- प्रक्षेपकाचे वजनही कमी होणार असल्याने अधिक वजनाचे उपग्रह नेता येणे शक्य आहे.
- ‘स्क्रॅमजेट’ इंजिनचे स्वरूप –
- स्क्रॅमजेट इंजिनाचे वजन – 3277 किलो
- रॉकेटच्या उड्डाणाचा काळ – 300 सेकंद
- स्क्रॅमजेटची चाचणी घेणाऱ्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर
- आवाजापेक्षा सहापट अधिक रॉकेटचा वेग – 6 मॅक
- स्क्रॅमजेट इंजिनांची संख्या – 2 इंजिन
सानिया मिर्झाला कनेक्टीकट ओपनचे विजेतेपद :
- भारताची आघाडीची टेनिस तारका सानिया मिर्झा हिने सुरू होणाऱ्या वर्षाच्या अखेरच्या व चौथ्या ग्रँडस्लॅम यूएस ओपनआधी येथे रोमानियाच्या मोनिका निकुलेस्कू हिच्या साथीने कनेक्टीकट ओपनमध्ये दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
- सानिया आणि निकुलेस्कूयांनी नुकतीच पुन्हा जोडी बनवली आणि पहिले विजेतेपद आपल्या नावावर केले. तिने गेल्या वेळेस 2010 मध्ये जोडी बनवली होती.
- सानिया आणि निकुलेस्कूने विजेतेपदाच्या लढतीत युक्रेनच्या कॅटरिना बोंडारेंको आणि तैवानच्या चुआंग चिया जंग जोडीचा एक तास 30 मिनिटांच्या संघर्षपूर्ण लढतीत 7-5, 6-4 असा पराभव केला.
- सानिया आणि निकुलेस्कू ही जोडी फक्त थोड्या कालावधीसाठी असून, या दोन्ही खेळाडूंनी यूएस ओपनमध्ये नियमित जोडीदारासोबत खेळणार असल्याचे स्पष्ट केले.
150 देशांमध्ये ऑनलाइन व्हिसाची सोय :
- भारतीय परराष्ट्र विभागातर्फे जगातील 150 देशांना इलेक्ट्रॉनिक व्हिसाची (ऑनलाइन व्हिसा) सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
- तसेच यामुळे भारतात अल्प काळासाठी येणाऱ्या नागरिकांना (पर्यटन व इतर) आता कोणताही निर्बंध नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयातील सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली.
- पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने मुळे यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. मुळे म्हणाले, ‘मागील पाच वर्षात पासपोर्ट आणि व्हिसा पॉलिसीत आमूलाग्र बदल झाला आहे.’
- इलेक्ट्रॉनिक व्हिसामुळे जगातील 150 देशांतील नागरिकांना घरबसल्या व्हिसा उपलब्ध होणार आहे.
- तसेच तर दुसरीकडे देशात मागील वर्षी पासपोर्टसाठी दोन कोटी नागरिकांचे अर्ज दाखल झाले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज येत असले तरी अद्यापही देशातील दहा टक्के नागरिकांकडेच पासपोर्ट आहे.
- देशामध्ये पासपोर्ट विभागाची 100 कार्यालये आहेत. या माध्यमातून ते जास्तीत जास्त एक ते दीड कोटी प्रकरणेच हाताळू शकतात.
- तसेच यामुळे देशात कमीत कमी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पासपोर्ट उपलब्ध झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
27 व्या ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत संजीवनी जाधव प्रथम :
- ठाणे महापालिकेच्या वतीने (दि.28) पार पडलेल्या 27 व्या ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत महिला गटात नाशिकच्या संजीवनी जाधवने 15 किमीची शर्यत 53 मिनिटे 56 सेंकदात पूर्ण करत बाजी मारली.
- तर मोनिका आथरेला 54 मिनिटे 39 सेंकद या वेळेसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
- नागपूरच्या ज्योती चव्हाणने 59 मिनिटे 37 सेंकद अशी वेळ नोंदवत महिला गटात तिसऱ्या स्थानी झेप घतेली.
- तसेच त्याचवेळी पुरुष गटात अव्वल 10 क्रमांकामध्ये 8 पुणेकरांनी स्थान मिळवताना वर्चस्व राखले.
- दरम्यान, महिला धावपटूंनी व्यक्त केलेल्या निराशेनंतर महापौर संजय मोरे यांनी आगामी ठाणे वर्षा मॅरेथॉनमध्ये महिलाही 21 किमी धावणार आहेत.
- शिवाय महिला मॅरेथॉनची अंतिम रेषा देखील महापालिकाभवन येथेच होईल अशी माहितीही मोरे यांनी दिली.
- पुण्याच्या कालिदास लक्ष्मण हिरवेने 1 तास 7 मिनिटे 4 सेकंद अशी विजयी वेळ नोंदवताना जेतेपद पटकावले.
- तर प्रथमच मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या दुर्गा बहादूर बुधा याने अनपेक्षित कामगिरी करताना 1 तास 7 मिनिटे 5 सेंकद अशी वेळ नोंदवत दुसऱ्या स्थानी झेप घेतली.
- चंद्रपूरच्या आर.एस.एस.एम महाविद्यालयातील पवन देशमुखने (1 तास 8 मिनिट) तिसरे स्थान पटकावले.
राज्यातील सर्व गावांचे डिजिटायजेशन होणार :
- राज्यातील सर्व 29 हजार गावांचे डिजिटायजेशन करण्यात येणार असून, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राला अग्रभागी ठेवून नागरी सेवांवर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (दि.27) दिली. ही योजना सध्या 750 गावांत राबविण्यात येत आहे.
- फडणवीस म्हणाले की, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे मोठ्या रुग्णालयांना जोडण्यात येणार असून, माहिती तंत्रज्ञानाची यात महत्त्वाची भूमिका असेल.
- आरोग्य व शिक्षण यासारख्या क्षेत्रात सेवा पुरविण्यासाठी एचपी आणि मायक्रोसॉफ्ट या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना सहभागी करून घेण्यात आले आहे.
- राज्य सध्या प्रशासनाच्या डिजिटायजेशनद्वारे किमान 40 लाख तक्रारींची सोडवणूक करीत आहे.
- 2009 पासून प्रलंबित असलेला केंद्राचा क्रिमिनल ट्रॅकिंग सीस्टिमला नव्या पद्धतीची जोड देऊन एक पाऊल पुढे टाकले आहे.
- तसेच यात सर्व पोलीस ठाणी डिजिटल क्रिमिनल नेटवर्किंग सीस्टिमद्वारे जोडण्यात येत आहेत.
- पुढील वर्षीच्या मध्यापर्यंत हे काम पूर्ण होईल. हे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान गुन्हेगारांच्या हालचालींचा माग काढण्यासह गुन्ह्यांच्या तपासात मैलाचा दगड ठरेल.
- कारागीर, शेतकरी आणि इतर क्षेत्रांतील लोकांना मोठ्या संख्येने ई-कॉमर्सच्या जागतिक मंचावर पदार्पण करण्यास डिजिटायजेशनच्या प्रणालीची मदत होत आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा