Current Affairs (चालू घडामोडी) of 29 December 2014 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | विजय चौधरी बनला ‘महाराष्ट्रचा केसरी’ |
2. | ‘कॅट’चा निकाल जाहीर |
3. | रघुवीर दास यांनी आज शपथ घेतली |
4. | IIT संचालकाचा राजीनामा |
5. | राज्याच्या कृषी विभागाला केंद्राचा पुरस्कार |
6. | राज्याच्या कृषी विभागाला केंद्राचा पुरस्कार |
7. | ई-मेल सेवाही ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत |
8. | ‘ईबोला’ वर आता रक्ताधारित |
9. | दुसर्या पत्नीचाही निवृत्तीवेतनावर हक्क |
10. | रणवीर, ऋचा ठरले ‘बॅचलर ऑफ ईअर |
विजय चौधरी बनला ‘महाराष्ट्रचा केसरी’ :
- कुस्तीतील मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र केसरी हा किताब जळगावच्या विजय चौधरीने पटकावला आहे.
- रविवारी पुण्यात अंतिम सामन्यात विजयने बाजी मारत महाराष्ट्र केसरीवर नाव कोरले आहे.
- केसरी किताब पटकावणारा विजय हा 41वा कुस्तीपटू आहे.
‘कॅट’चा निकाल जाहीर :
- 19’इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंट’ आणि अन्य व्यवस्थापन शिक्षण संस्थांमधील प्रवेशांसाठी 16 व 22 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परिक्षेचा (कॅट) निकाल शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला.
Must Read (नक्की वाचा):
रघुवीर दास यांनी आज शपथ घेतली :
- झारखंडचे नवे मुख्यमंत्री रघुवीर दास यांचा शपथविधी सोहळा होत आहे.
- दुपारी 12 वाजता येथील बिरसा मुंडा फूटबॉल स्टेडियमवर हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
IIT संचालकाचा राजीनामा :
- आयआयटी दिल्लीचे संचालक डॉ. रघुनाथ शेवगांवकर यांनी शनिवारी रात्री संचालक पदाचा राजीनामा दिला.
- केंद्रीय मनुष्यबळ खात्याच्या दबावाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला असल्याचे समजते.
- मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला आयआयटीच्या मैदानात क्रिकेट अॅकेडमी सुरू करण्याची परवानगी देणे आणि सुब्रमन्यम स्वामी यांचे 1972 ते 1991 या कलावधीतील थकीत वेतन 18% व्याजणे देणे या दोन प्रमुख गोष्टींचा दबावामुळे राजीनामा देण्याचे कारणे म्हटले जात आहे.
राज्याच्या कृषी विभागाला केंद्राचा पुरस्कार :
- डाळींच्या उत्पादन वाढीसाठी राबवलेल्या मोहिमेसाठी राज्य सरकारला केंद्रीय कृषी मंत्रालयचा 1 कोटी रूपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
- त्यामुळे डाळींच्या उत्पादनात वाढ झाली आहे.
- या प्रयत्नाचा गौरव केंद्रीय कृषी विभागाकडून करण्यात आला आहे.
- डाळींच्या उत्पादकतेत 20 ते 30% वाढ झाली आहे.
ई-मेल सेवाही ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत :
- केंद्रीय दूरसंचार विभागाकडून प्रस्ताव.
- गूगल, याहू यांसारख्या कंपन्यांनी सुरू केलेली ई-मेल सेवाही आता ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे.
- भविष्यात आपल्याला ई-मेल सेवेसंदर्भातील तक्रारींबाबत ग्राहक न्यायालयात दादा मागता येणे शक्य होणार आहे.
‘ईबोला’ वर आता रक्ताधारित :
- संशोधकांनी या आजारावर आता रक्ताचा उपयोग करून उपचार करण्याची एक नवी पद्धती विकसित केली आहे.
- या आजारातून बचावलेल्या रुग्णांचा प्लाझमा रुग्णांना देण्याचा हा उपाय आहे.
- या प्लाझमामध्ये ईबोला विषानुविरुद्ध लढणारी प्रतिजैविके असतात.
दुसर्या पत्नीचाही निवृत्तीवेतनावर हक्क :
-
अनुच्छेद 15 नुसार केंद्रीय प्रशासकीय लवादाने 28 जानेवारी 2014 रोजी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत कार्यरत दिवंगत कर्माचार्यांच्या
-
पहिल्या व दुसर्या पत्नीला कौटुंबिक निवृत्तीवेतन समान भागात विभागून देण्याचा आदेश दिला आहे.
-
हायकोर्टने अन्य भागात नियम लागू करण्याची सूचना दिली आहे.
रणवीर, ऋचा ठरले ‘बॅचलर ऑफ ईअर’ :
- रणवीरसिंह आणि ऋचा चढा यांना 2014 चा ‘बॅचलर ऑफ ईअर‘ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- मुंबईच्या हार्डरॉक कॅफेमध्ये झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रदान करण्यात आला.